Arjun Kapoor On BreakUp : नातेसंबंधात ब्रेकअप झाल्यानंतर अनेकनजण एकटे पडतात किंवा ते नैराश्यात जातात. हॉलीवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता अर्जुन कपूरने अभिनेत्री मलायका अरोराबरोबर ब्रेकअप झाल्याची कबुली देत भावनिक स्वातंत्र्याविषयी सांगितले आहे. यावेळी त्याने २०१४ मध्ये आईच्या निधनानंतर एकाकीपणाचा कसा सामना केला, हेसुद्धा सांगितले. यावेळी त्याची बहीण अंशुलाही दूर राहायची. अर्जुन सांगतो, “बहीण दिल्लीला होती आणि घर रिकामे होते. आईला गमावल्यानंतर मी एकटा परिस्थितीला सामोरा जात होतो.”

अर्जुन कपूरने त्याच्या अनुभवांवरूनही सांगितले. तो स्वत:ची काळजी घेण्यास अधिक प्राधान्य देत आहे. तो म्हणतो, “अशा वागण्याच्या बाबतीत किंचित चुकीच्या पद्धतीनं म्हणजे स्वार्थी आहे, असं गृहीत धरून पाहिलं जातं पण मला वाटते की, मी स्वार्थी नाही. फक्त इतर गोष्टींमुळे मी ठीक नव्हतो.”

Kamal Haasan said Sarika would be upset if he offered her money
“मला ती आवडली होती, पण..”, कमल हासन यांनी सारिकाबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिला खूप अपमानास्पद…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Natasa Stankovic reacts On Divorce From Hardik Pandya
घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच नताशा हार्दिक पंड्याबाबत म्हणाली, “आम्ही अजूनही…”
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

अर्जुन कपूरसाठी भावनिक स्वातंत्र्य खूप महत्त्वाचे आहे. नातेसंबंधात वैयक्तिक संघर्ष समोरच्यावर ढकलणे चुकीचे आहे. अर्जुन सांगतो, “नातेसंबंध तुम्हाला पूर्ण करतात; पण जर तुम्ही ठीक नसाल, तर तुम्हाला ते शोधून काढण्याची गरज असते. तुम्ही वैयक्तिक संघर्ष नातेसंबंध किंवा इतर लोकांवर ढकलू शकत नाही. त्यांना दोष देऊ शकत नाही.”

हेही वाचा : गर्भधारणेनंतर साखरेचं सेवन मर्यादित ठेवल्यानं आई आणि बाळाच्या आरोग्यावर काय परिणाम होतात? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

भावनिक आधार आणि भावनिक स्वातंत्र्य यांच्यात समतोल साधणे

दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मानसिक आरोग्य सल्लागार अनुकृती गर्ग सांगतात, “स्वातंत्र्य म्हणजे आपली वेगळी ओळख निर्माण करणे, निर्णय घेणे आणि वैयक्तिक ध्येये व महत्त्वाकांक्षा यावर काम करणे, होय. नातेसंबंधात स्वातंत्र्य जपताना सहकार्य आणि परस्परांबरोबर देवाणघेवाण अत्यंत महत्त्वाची आहे. एकमेकांना समर्थन, सहकार्य करणे आणि काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.”

नातेसंबंधात समतोल साधण्यासाठी एक निश्चित सीमा ठरविणे महत्त्वाचे आहे. सीमा आपल्याला नातेसंबंध आणि एकमेकांबरोबर संवाद साधताना मर्यादा आणि नियम तयार करण्याची परवानगी देते. त्यामुळे आपण कुठे थांबतो आणि समोरची व्यक्ती कुठे सुरू होते, हे ओळखण्यास मदत होते.

या सीमा तयार करण्यासाठी आणि निरोगी नातेसंबंध निर्माण करण्यासाठी त्या सांगतात, ” स्पष्ट आणि उत्तम संवाद राखणे आणि एकमेकांना वेळोवेळी वेळ देणं, एकमेकांबद्दल सहानुभूती बाळगणं, एकत्र वेळ घालवणं आणि कुठे आपण एकमेकांवर अवलंबून आहोत, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.”

वैयक्तिक संघर्षांचे ओझे जोडीदारावर ढकलू नये. त्याविषयी गर्ग सांगतात, “जीवनाच्या कठीण टप्प्यातून जात असताना अनेकदा आधाराची आवश्यकता भासू शकते. अशा वेळी आपण जवळचे मित्र, कुटुंबातील सदस्य, तसेच व्यावसायिक मानसिक आरोग्य तज्ज्ञ यांची मदत घेऊ शकतो.”

हेही वाचा : Heart Attack: हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वयाच्या विशीत अन् तिशीत ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; वाचा तज्ज्ञ काय सांगतात

“आपल्या मनातील विचार लिहिणं, आपल्या दैनंदिन जीवनात हालचालींना प्राधान्य देणं आणि आपल्याला आवडत असलेल्या गोष्टी करण्यात वेळ घालवणं इत्यादी गोष्टींद्वारे तुम्ही स्वत:ची काळजी घेऊ शकता,” गर्ग सांगतात.

अनुकृती गार्ग पुढे म्हणाल्या,”आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटतं की, आपल्या जीवनात एक रोमँटिक जोडीदार असावा; जो आपला एकटेपणा दूर करील. अनेकदा जोडीदार आपल्याबरोबर असतात; पण नेहमीच ते भावनिक आधार देण्यासाठी तयार नसतात. पण, आपण हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, ते आपला जोडीदार आपले ऐकून घेण्यास किंवा आपल्याला सहकार्य करण्यास सध्या उपलब्ध आहे का?”

Story img Loader