Hina Khan : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने आजवर तिच्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. हिना सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट शेअर करीत असते. आज तिच्या एका पोस्टने चाहत्यांना धक्का बसला. हिनाने तिला स्तनाचा कर्करोग झाल्याची माहिती दिली. तिने पोस्टमध्ये लिहिलेय, “ती सध्या उपचार घेत असून, या आजारावर मात करण्यासाठी तयार आहे.”

हिना खानने पोस्टमध्ये लिहिलेय, “सर्वांना नमस्कार! काही अफवांवर मला बोलायचं आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझी काळजी करणाऱ्या सर्व लोकांबरोबर मला महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे. मला स्टेज-३ स्तनाचा कर्करोग असल्याचं निदान झालं आहे.
मी या आजारावर मात करण्यासाठी तयार आहे. माझे उपचार सुरू आहेत. मी खंबीर आहे आणि या आजाराचा सामना करण्यासाठी मी तयार आहे. या कठीण काळात माझ्या प्रायव्हसीचा आदर करा.”

kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
priyanka chopra 30 crore fee for movie
प्रियांका चोप्रा महेश बाबूच्या सिनेमातून करणार कमबॅक, पुनरागमनासाठी घेतलं तब्बल ‘इतकं’ मानधन; आलिया आणि दीपिकालाही टाकलं मागे
sonalee kulkarni
“ती माझ्या पाया…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू सोनाली कुलकर्णीबाबत म्हणाली…
Sridevi
श्रीदेवीची एक झलक पाहण्यासाठी न्यायाधीशांनी तिला कोर्टात…, ज्येष्ठ वकिलांनी सांगितला ‘तो’ किस्सा
rashmika mandanna fracture 1
“तीन फ्रॅक्चर अन्…” रश्मिका मंदानाने तिच्या पायाच्या दुखापतीबद्दल दिली अपडेट; म्हणाली, “गेल्या २ आठवड्यांपासून…”
riya sen ashmit patel leaked MMS controversy
दिग्गज अभिनेत्रीची नात, एका गाण्याने बनली स्टार; सलग १२ फ्लॉप चित्रपट, MMS लीक झाला अन्…
Aishwarya Narkar
अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांचा चाहत्यांना आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण सल्ला; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…

पाहा पोस्ट

छत्तीस वर्षीय हिना खान ही नामवंत टीव्ही अभिनेत्री आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या दीर्घकाळ चाललेल्या टीव्ही मालिकेलतून हिनाने साकारलेली अक्षरा ही भूमिका घरोघरी पोहोचली. ‘बिग बॉस’ व ‘खतरों के खिलाडी’ यांसारख्या रिॲलिटी शोमध्ये भाग घेऊन, ती प्रकाशझोतात आली. हिनाला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्याने आता सर्वांना धक्का बसला.

जेव्हा स्तनाच्या टिशूमध्ये (Tissue) अनियंत्रित पेशी वाढतात, तेव्हा स्तनाचा कर्करोग होतो. जागतिक स्तरावर महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पण, हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, जरी याचे प्रमाण स्त्रियांमध्ये विशेषत्वाने दिसून येत असले तरी पुरुषांनासुद्धा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.

स्टेज-३ कर्करोग नेमका काय असतो? स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे काय असतात, याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती दिली आहे.

स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर एका क्षणात व्यक्तीचे आयुष्य बदलते. कर्करोगाची स्टेज कोणती आहे यावर त्याचे उपचार अवलंबून असतात. स्टेज-३ स्तनाचा कर्करोग विकसित झालेला असतो. म्हणजेच कर्करोग ट्युमरच्या पलीकडे पसरला आहे; पण इतर अवयवांपर्यंत पोहोचलेला नाही, असा त्याचा अर्थ होतो. स्टेज-३ स्तनाचा कर्करोग असलेल्या स्त्रिया या आजारावर मात करून, दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकतात.

हेही वाचा : Hina Khan Cancer: अभिनेत्री हिना खानला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान, पोस्ट शेअर करत म्हणाली…

स्टेज-३ कर्करोग म्हणजे नेमके काय?

बंगळुरू येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या मेडिकल ऑन्कोलॉजी व हेमॅटो ऑन्कोलॉजीच्या संचालिका डॉ. नीती रायजादा सांगतात, “स्टेज-३ स्तनाच्या कर्करोगामध्ये ट्युमर हा पाच सेंमीपेक्षा मोठा असतो. जवळपास एका लहान लिंबाच्या आकाराएवढा असतो; जो १-३ लिम्फ नोड्समध्ये (Lymph nodes) दिसून येतो. या लिम्फ नोड्स मानेच्या आणि स्तनाच्या भागात दिसून येतात.

“अशा परिस्थितीत स्तन, त्वचेत बदल जाणवतात. स्तन दुखतात किंवा स्तनातून पांढरा, पिवळा, हिरवा किंवा लाल रंगाचे स्राव बाहेर पडतात इत्यादी लक्षणे स्तनाच्या कर्करोगामध्ये दिसून येतात.” बंगळुरूच्या एचसीजी कॅन्सर सेंटरच्या ऑन्कोलॉजिस्ट सल्लागार डॉ. श्रीनिवास बी. जे. सांगतात.

स्टेज-३ कर्करोग हा खालील श्रेणींमध्ये विभागलेला आहे (3A, 3B व 3C) कर्करोग कोणत्या श्रेणीत आहे हे ट्युमर लिम्फ नोडमध्ये किती प्रमाणात समाविष्ट आहे आणि इतर घटकांवर अवलंबून असते.

स्तनाचा कर्करोग का ओळखू येत नाही?

सुरुवातीच्या टप्प्यातील ट्युमर खूप लहान असतो आणि त्यामुळे लक्षात येण्याजोगी लक्षणे दिसून येत नाहीत, असे डॉ. रायजादा सांगतात. पण, नियमित स्वपरीक्षण केल्याने आणि मॅमोग्राममुळे आपण ओळखू शकतो.

डॉ. श्रीनिवास सांगतात, “ट्युमरचा आकार, लिम्फ नोडचा सहभाग आणि उपचारांना रुग्ण कसा प्रतिसाद देतो यावर रुग्ण बरा होऊ शकतो की नाही, हे ठरविता येते. वेळीच लक्षणे दिसून आली नाहीत, अनियमित तपासणी यांमुळे स्तनाचा कर्करोग स्टेज-१ किंवा २ पर्यंत निदान होऊ शकत नाही.

डॉक्टर रायजादा सांगतात, “वय, आनुवंशिकता, जीवनशैली इत्यादी घटकांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. काही स्त्रियांमध्ये आनुवांशिक जनुके (genes) आढळून येतात (BRCA1, BRCA2, PALB2 इत्यादी); ज्यामुळे याचा धोका वाढू शकतो.”

स्टेज-३ स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांनी कोणते उपचार घ्यावेत?

स्टेज-३ स्तनाच्या कर्करोगासाठी अनेक प्रकारच्या उपचारपद्धती आहेत आणि व्यक्तीच्या आजाराचा तपशील घेऊन, त्यानुसार उपचार केले जातात.

स्टेज-३ हा एक विकसित स्तनाचा कर्करोग आहे आणि त्यावर अतिशय वेगळ्या पद्धतीने उपचार केले जातात, असे डॉ. रायजादा सांगतात.

अनेकदा यावर कठोर उपचारसुद्धा केले जातात. त्यामध्ये शस्त्रक्रिया, कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी रेडिएशन थेरपी आणि संपूर्ण शरीराचा विचार केला, तर केमोथेरपीसारख्या उपचारपद्धतीची आवश्यकता भासते, असे डॉ. श्रीनिवास सांगतात.

डॉ. रायजादा पुढे सांगतात, “अनेकदा अशा प्रकरणांमध्ये स्तन वाचविण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यासाठी निओएडजुव्हंट केमोथेरपी (Neoadjuvant Chemotherapy) असते. तसेच ER, PR, Her2neu सारख्या ट्युमरवर वेगवेगळ्या प्रकारे उपचार केले जातात. अनेकदा रेडिएशनचीसुद्धा आवश्यक भासते.”

कर्करोगाविरुद्ध लढा देण्यासाठी त्याचे लवकर निदान होणे खूप महत्त्वाचे आहे. ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी नियमित शारीरिक तपासणी आणि मॅमोग्राम चाचणी करून घेणे महत्त्वाचे आहे. महिलांनो, जर तुम्हाला तुमच्या स्तनांमध्ये थोडा जरी बदल दिसला, तर जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका.

Story img Loader