Guillain Barre Syndrome : पुणे शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. केवळ एका आठवड्यात पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) ची ५० हून अधिक संशयित प्रकरणे नोंदवली गेली आहेत. पुणे महापालिकेच्या म्हणण्यानुसार, रुग्ण, मुले आणि प्रौढ दोघेही, दूषित अन्न आणि पाण्याशी संबंधित लक्षणांची तक्रार करतात, ज्यामुळे अतिसार आणि ओटीपोटात अस्वस्थता निर्माण होते. शहरातील अनेक रुग्णालयांनी पुढील तपासणीसाठी ICMR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV), पुणे यांच्यासोबत रक्त, मल, घशातील स्वॅब, लाळ, लघवी आणि सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF)चे नमुने शेअर केले आहेत. पण सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड म्हणजे काय आणि त्याची तपासणी का केली जाते? गुलेन बॅरी सिंड्रोम हा आजार काय आहे या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मुंबईच्या परेल येथील ग्लेनेगल हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. पंकज अग्रवाल यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराबद्दल अधिक जाणून घेऊ…
गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा विकार आहे; ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार कमी होते. या स्थितीमुळे अशक्तपणा, सुन्नपणा आणि गंभीर प्रकरणांमध्ये पक्षाघात होऊ शकतो. गुइलेन बॅरे सिंड्रोम कोणालाही प्रभावित करू शकतो. मात्र, त्याचे नेमके कारण समजलेले नाही. या आजारातून बरे होण्यासाठी प्रत्येक रुग्णाला वेगवेगळा वेळ लागू शकतो. बहुतेक व्यक्ती काही आठवड्यांत बरे होतात; तर काहींना महिनाभराचा कालावधी लागतो. तर गंभीर प्रकरणांमध्ये अर्धांगवायू होऊ शकतो,” असे न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. पंकज अग्रवाल यांनी सांगितले. या आजाराची लागण झालेले सुमारे ८० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात, १५ टक्के रुग्णांमध्ये काही काळ अशक्तपणा असू शकतो आणि पाच टक्के रुग्णांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. या विकारावर लवकरात लवकर उपचार घेणे गरजेचे असते.
वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजीचे विभागप्रमुख डॉ. पवन ओझा म्हणाले की, हा एक ‘न्यूरोलॉजिकल इमर्जन्सी’ विकार आहे ज्यामध्ये अचानक हात किंवा पायांत अशक्तपणा येणे आणि कधी कधी डोळ्यांच्या हालचाली, गिळणे व बोलण्यात अडचण येते. “त्यामुळे अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. बऱ्याच रुग्णांना प्रथम हात किंवा पायांत अशक्तपणाचा अनुभव येतो. त्यापैकी काही इतके अशक्त होतात की, ते अन्नही गिळू शकत नाहीत किंवा श्वासही घेऊ शकत नाहीत. रुग्णाची प्रकृती अचानक इतकी बिघडते की, त्याला एक किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांत श्वासोच्छ्वासासाठी व्हेंटिलेटरवरची गरज भासू शकते. तसेच बहुतेक प्रकरणांमध्ये लक्षणे दिसण्यासाठी सुमारे ४-५ दिवस लागतात,” असेही डॉ. ओझा यांनी अधिक माहिती देताना स्पष्ट केले.
गुलेन बॅरी सिंड्रोम कसा होतो?
पोल्ट्रीतील कोंबड्यांचे कच्चे किंवा कमी शिजलेले मांस खाल्ल्याने किंवा हाताळल्याने हा आजा होण्याची शक्यता आहे. हे विषाणू किंवा जीवाणूंना लक्ष्य करण्याऐवजी उलट आपल्या नसांनाच इजा करून रोगप्रतिकार शक्तीवर हल्ला करतात. त्यामुळे मज्जातंतू कमकुवत होऊ लागतात आणि कार्य करू शकत नाहीत,” डॉ. ओझा म्हणाले.
सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF) तपासणी का केली जाते?
विविध न्यूरोलॉजिकल रोगांचे निदान करण्यासाठी सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF) तपासणी आवश्यक आहे, असे हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलचे सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार सांगतात. ते पुढे म्हणाले, ”यामध्ये मेंदुज्वर आणि एन्सेफलायटिस यांसारख्या मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या संसर्गाचा समावेश होतो. जीबीएस हा संसर्गजन्य न्यूरोलॉजिकल आजार असतो आणि त्यामुळे अर्धांगवायू होतो.”
गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे
गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे सहसा अचानक दिसू लागतात. ही लक्षणे काही दिवसांत किंवा आठवडाभरात वेगाने वाढू लागतात. सामान्य लक्षणांमध्ये अशक्तपणा आणि हातापायांना मुंग्या येणे, अंग दुखणे, चालताना तोल जाणे, चेहरा सुजणे, चालताना व गिळताना त्रास होणे, हात-पाय लुळे पडणे यांचा समावेश आहे.
उपचार
उपचारामध्ये इंट्राव्हेन्स इम्युनोग्लोब्युलिन (IVIG) किंवा प्लाझ्मा एक्स्चेंज यांसारख्या इम्युनोथेरपीचा समावेश असतो. यामध्ये मज्जातंतूंचे नुकसान कमी करण्यासाठी या उपचारपद्धतीचा आधार घेतला जातो, असे डॉ. अग्रवाल म्हणाले.