सात्म्य म्हणजे अनुकूल आणि असात्म्यज म्हणजे प्रतिकूल. जे-जे शरीराला अनुकूल होत नाही ते-ते असात्म्यज म्हणजेच प्रतिकूल. ऋतुसंधिकाळ हा असा काळ आहे ,जेव्हा आरोग्याला अनुकूल अशा गोष्टी होत नाहीत. ऑक्टोबरच्या उष्ण वातावरणामध्ये उष्मा सहन होत नाही, म्हणून तुम्ही शीत आहारविहारामध्ये (अन्न, पाणी, वारा, कपडे, व्यायाम, व्यवहार वगैरेमध्ये) बदल करून सर्व थंड गोष्टी स्वीकारता. डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाली म्हणजे उष्ण आहारविहाराचा स्वीकार करता. फेब्रुवारीपर्यंत थंडीचा आनंद घेत असताना शरीराला प्रिय वाटेल अशा उष्ण गोष्टींचा स्वीकार तुम्ही केलेला असतो, मात्र मार्चमध्ये तिरप्या उन्हाच्या झळा लागू लागल्या की तुम्हाला शीत गोष्टी हव्याहव्याशा वाटू लागतात. तिथपासून मेच्या शेवटापर्यंत तुम्ही थंड स्वीकारता आणि मग पाऊस सुरू झाला म्हणून पुन्हा तुम्हाला उष्ण आवडू लागते.

वास्तवात ऋतू बदलला म्हणून आहारविहारामध्ये बदल करणे योग्यच आहे, शास्त्राला धरूनच आहे, मात्र ते अचानक होता कामा नये. आधीच्या ऋतूमध्ये ज्या आहारविहाराची (अन्नपाणी, कपडे, वारा, व्यायाम, व्यवहार वगैरेची) सवय तुम्हाला झाली होती, त्याचा अचानक त्याग करणे, शरीराला सात्म्य होत नाही व असात्म्यज रोग होतात, असे शास्त्राने सांगितले आहे. असे का होते? शरीराचे आतले वातावरण (internal environment) व निसर्गातले बाहेरचे वातावरण (external environment) यामध्ये असणारा फरक व त्या फरकामुळे त्या दोहोंमध्ये असणारा विरोध हे ऋतुसंधिकाळाचे वैशिष्ट्य म्हणायला हवे. या विरोधामुळेच मुख्यत्वे या दिवसांमध्ये आजार बळावतात. बाहेरच्या वातावरणामध्ये होणारा बदल हा शरीरातल्या आतल्या वातावरणाला काही सहजी अनुकूल (सात्म्य) होत नाही आणि त्याचमुळे असात्म्यज रोग होतात.

painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
Tourists unaware of public holiday rules crowd in front of Veermata Jijabai Bhosale Park
सार्वजनिक सुट्टीच्या नियमाबाबत अनभिज्ञ पर्यटकांची राणीच्या बागेसमोर गर्दी
chatura loksatta marathi news
स्त्री आरोग्य : नववर्षाचा संकल्प; फिट राहा!
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी

हेही वाचा… दुधी भोपळ्याचे सेवन करताना कोणती काळजी घ्यावी, ते कसे करावे? जाणून घ्या, काय सांगतात डॉक्टर…

बाहेरच्या वातावरणानुसार शरीराने आपले आतले वातावरण अनुकूल करून घेतलेले असते. जसे की, उन्हाळ्यात मूत्रविसर्जनाचे प्रमाण खूप कमी होते, श्वसनावाटे बाष्प बाहेर फेकणेसुद्धा कमी होते, घामाचे प्रमाण मात्र वाढते, याउलट हिवाळा आला की शरीर मूत्रविसर्जनाचे प्रमाण वाढवते, घाम येणे तर जवळजवळ बंद होते, मात्र श्वसनावाटे बाष्प फेकणे मात्र वाढते. हा सर्व शरीराचे तापमान सांभाळण्याचा प्रयत्न असतो. शरीराची संपूर्ण यंत्रणा ऋतूनुसार स्वतःमध्ये बदल करते. ऋतू बदलला की यंत्रणासुद्धा बदल करते. मात्र ऋतूमध्ये होणारा हा बदल सावकाश होणे अपेक्षित असते.

हेही वाचा… Health Special: आपल्या वेदनेशी संबंधित ‘SIMS आणि DIMS’ आहेत तरी काय?

थंडीचे रूपांतर जसजसे उन्हाळ्यात होईल तसतसा शरीरामध्येही अनुकूल बदल होऊ लागतो आणि उन्हाळ्याचा जोर वाढेपर्यंत शरीराने स्वतःला त्या ऋतूसाठी अनुकूल बनवलेले असते. या हळूहळू होणार्‍या बदलाला आपणसुद्धा साथ देणे अपेक्षित असते. हिवाळ्यातला तुम्हाला सोयीस्कर वाटणारा असा आहारविहार उन्हाळा आला म्हणून त्यामध्ये अचानक बदल करता कामा नये. उन्हाळ्यातला तुम्हाला प्रिय झालेला आहारविहार पाऊस सुरू झाला म्हणून अचानक थांबवता कामा नये. हा अकस्मात बदल शरीराला अनुकूल (सात्म्य) होत नाही आणि असात्म्यज रोगांना आमंत्रण मिळते. ते कसे?

ऋतुसंधिकाळ आणि अस्वास्थ्य

ऋतूमध्ये होणारा अकस्मात बदल’ हे काश्यपसंहितेने शरीर-संचालक वात-पित्त-कफ या तीन दोषांमध्ये विकृती होण्याचे एक महत्त्वाचे कारण सांगितले आहे आणि ते आयुष्य क्षीण करण्यास कारणीभूत होते असेही म्हटले आहे. ऋतुसंधिकाळामध्ये शरीर एकीकडे पहिल्या ऋतूच्या मार्गिकेवरून पुढच्या ऋतूच्या मार्गिकेवर कसे जायचे, या चिंतेमध्ये बाहेर बदलणार्‍या वातावरणाशी जुळवून घेण्यात व्यस्त असते. त्यात तुम्ही जेव्हा आहारविहारामध्येही अकस्मात बदल करता तेव्हा तो बदल तर शरीराला अजिबात अनुकूल होत नाही.

शरीराची अपेक्षा ही की निदान आहारविहार तरी अनुकूल होईल तर माझे बाहेरच्या वातावरणाशी लढण्याचे काम सुलभ होईल. पण तुम्ही आहारविहारात घाईगडबडीने बदल करून अजून काम बिघडवून ठेवता. उन्हाळा सुरू झाला की लगेच चालले आइसस्क्रीम खायला, लागलीच थंडगार पाणी प्यायला सुरुवात, गार पाण्याची आंघोळ सुरू; पाऊस सुरू झाला की लगेच गरमागरम चहा, गरम भजी, गरम पाण्याची आंघोळ हे आहारविहारामध्ये केलेले अकस्मात बदल तुम्हाला कितीही सुखावह वाटत असले तरी ते शरीराच्या तापमान नियंत्रण यंत्रणेमध्ये बिघाड करतात, चयापचय बिघडतो, अग्नी मंदावतो, एकंदरच आरोग्य खालावते.

थोडक्यात, तुम्ही ऋतुसंधिकाळामध्ये आहारविहारामध्ये केलेला बदल शरीराला अनुकूल तर होत नाहीच, मात्र त्याच वेळी तो रोगजंततूंना मात्र अनुकूल ठरतो व रोगजंतूंचा शरीरामध्ये प्रवेश सुकर होतो. जे घटक एरवी रोगजंतूंना शरीरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करतात, ते घटक दुर्बल झालेले असल्याने रोगजंतूंचा शरीरामध्ये सहजी प्रवेश होतो आणि त्यांची वाढ व प्रसारही झपाट्याने होते. बाहेरचे वातावरण प्रतिकूल, आतले वातावरण अनुकूल नाही आणि त्यामध्ये शरीरामध्ये रोगजंतू वाढलेले. काय होणार या स्थितीमध्ये? शरीराचे स्वास्थ्य खालावून आजार बळावणारच ना!

Story img Loader