Asana for the spine: एक काळ असा होता की, लोकांना सर्व्हिकल स्पॉन्डिलायटिससारख्या समस्येचे नावदेखील माहीत नव्हते; पण आजकाल ही समस्या खूप सामान्य झाली आहे. गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये ही समस्या वाढली आहे. इतकेच नाही, तर कधी कधी सर्व्हिकल स्पॉन्डिलायटिसची समस्या किशोरवयीन आणि लहान मुलांमध्येही दिसून येते. मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये घालवलेले तास, चुकीच्या मार्गाने बसणे, चुकीच्या पद्धतीने झोपणे, व्यायाम न करण्याची सवय, तणाव इ. याची प्रमुख कारणे आहेत. याबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
सर्व्हिकल स्पॉन्डिलायटिसवर कोणतेही अचूक उपचार नाहीत. कारण- हा जीवनशैलीचा आजार आहे. परंतु, जीवनशैलीत बदल करून आणि काही योगासनांच्या मदतीने हा आजार नियंत्रित केला जाऊ शकतो. धनुरासनामुळे सर्व्हिकल स्पॉन्डिलायटिसवर थोडा आराम मिळू शकतो. या आसनामुळे मानेच्या वरच्या भागाला आराम मिळतो. धनुरासन, सर्पासन, द्विकोनासन इत्यादी सोप्या पद्धतींद्वारे या त्रासापासून आपण सुटका मिळवू शकतो.
अशा त्रासाने ग्रस्त असलेल्यांनी पुढच्या दिशेने वाकणारी कोणतीही आसने करू नयेत. तसेच दैनंदिन कामात पुढे वाकणे टाळावे. सतत मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करू नका. मान वारंवार हलवत राहा. त्याशिवाय काही वेळा तज्ज्ञ गळ्यात कॉलर लावण्याचीही शिफारस करतात.
धनुरासन फायदे –
धनुरासन हे असे आसन आहे की, ज्यावर शरीराची मुद्रा धनुष्यासारखी दिसते. म्हणूनच त्याला धनुरासन, असे म्हणतात. हे आसन पाचक प्रणाली मजबूत करते आणि हाडांच्या स्नायूंचे तापमान वाढवते. त्याशिवाय ते पाठीच्या हाडांमध्ये लवचिकता आणते. धनुरासनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मधुमेहाप्रमाणेच पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आणि मांड्यांच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी ते फायदेशीर आहे.
धनुरासनामुळे पाठीचा कणा आणि हाडे मजबूत होतात. धनुरासन केल्याने भूक वाढते. धनुरासनाचे फायदे बघता, ते सर्वांसाठीच योग्य आहे; पण ज्यांना कंबरदुखी, पाठदुखी, अर्धशिशी, डोकेदुखी, उच्च किंवा कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी हे आसन करणे टाळावे, तसेच गरोदर महिलांनी हे आसन करू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
धनुरासन कसे करावे –
हे आसन करण्यासाठी पोटावर झोपावे. हात बाजूला ठेवून पाय सरळ ठेवावेत. नंतर आपले गुडघे मागे वाकून, आपले पाय नितंबांच्या जवळ आणा. मग हळुवारपणे आपले घोटे हातांनी धरा. लक्षात ठेवा की, हे आसन करताना तुमचे नितंब आणि गुडघे एकाच जागी असावेत. तुम्ही तुमचे पाय तुमच्या धडाच्या जवळ आणता, तेव्हा तुमच्या मांड्या जमिनीपासून किंचित वर करा. लक्षात ठेवा की, तुमचे डोके आणि छाती दोन्ही अवयव एकाच वेळी उंचावले पाहिजेत. चार-पाच श्वासांसाठी थांबा. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर हलके स्ट्रेच केल्याने आराम मिळू शकतो. जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल, तर तुम्ही हे आसन सोडू शकता.
हेही वाचा – प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करायचेय? तज्ज्ञ सांगतात ‘तूप’ खा, जाणून घ्या रोज किती चमचे तूप खावं?
जे लोक हे आसन पहिल्यांदा करीत आहेत, त्यांनी सुरुवातीला फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास घ्या आणि श्वास सोडा.