Lower increased uric acid : कामाच्या ताणामुळे अनेकांच्या जीवनशैलीत आणि आहार पद्धतीत बदल झाला आहे. याचा परिणाम शरीरारवरही दिसून येत आहे. अयोग्य आहारामुळे शरीराला पौष्टिक तत्व तर मिळत नाहीच, उलट वजनही वाढते. पौष्टिक तत्वाच्या अभावाने रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि यामुळे शरीर विविध आजारांचे घर होऊ शकते. व्यायाम वाढलेले वजन कमी करण्यास मदत करू शकते. वजन वाढल्यास अनेक विकार होऊ शकतात. वजन वाढल्याने युरीक अॅसिड अनियंत्रित होते. शरीरात युरिक अॅसिडच्या उच्च पातळीला हायपरयुरिसिमिया म्हणतात.
शरीरात युरीक अॅसिडचे प्रमाण वाढल्यास संधिवात होऊ शकते. संधिवात ही अशी स्थिती आहे ज्यामुळे सांध्यांमध्ये वेदना, सूज आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी पर्यायी औषधी आणि जीवनशैलीमध्ये बदल करणे गरजेचे आहे. वाढलेले युरीक अॅसिड कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधीही रामबाण ठरू शकते. अश्वगंधा युरीक अॅसिड कमी करण्यात मदत करू शकते.
(कमी वयात दाढी पांढरी होण्यामागे ‘ही’ आहेत कारणे, जाणून घ्या उपाय)
हेल्थलाइननुसार, हायपरयुरिसिमिया असलेल्या अनेक लोकांना पर्यायी औषध आणि जीवनशैलीतील बदलांचा फायदा होतो. पर्यायी औषधींमध्ये आयुर्वेदचा समावेश आहे. अश्वगंधाला आयुर्वेदमध्ये खूप फायदेशीर मानले गेले आहे. अश्वगंधामध्ये अँटि इन्फ्लेमेटोरी गुण असतात ज्याने शरीराची वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होऊ शकते. अश्वगंधा शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण कमी करू शकते. याव्यतिरिक्त अश्वगंधा वजन कमी करणे, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणे आणि अश्कतपणा दूर करण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते.
असा करा वापर
वाढलेले युरिक अॅसिड कमी करण्यासाठी अश्वगंधाचे पावडर तुम्ही मधासोबत घेऊ शकता. तसेच एक चमचा अश्वगंधाचे पावडर दुधात मिसळून ते झोपण्यापूर्वी प्यायल्याने देखील फायदा होऊ शकतो. मात्र, अश्वगंधा किती प्रमाणात घ्यावे आणि कोणत्या पद्धतीने त्याचे सेवन करावे, याविषयी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण अधिक प्रमाणात अश्वगंधाचे सेवन शरीरासाठी हानीकारक ठरू शकते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. बातमीतील उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)