अस्थमा किंवा दमा हा एक कॉमन आजार आहे. बऱ्याच लोकांना याचा त्रास असतो. दम्याचं दुखणं म्हणजे क्रॉनिक आजार असं समजलं जातं. म्हणजे खूप दिवसांपासून असलेला आजार. विशेषतः थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये आभाळ भरून आल्यावर दम्याचे अटॅक येत असतात. हिवाळ्यात हवा कोरडी असते, कोरड्या हवेमुळे श्‍वास घेताना अडथळा निर्माण होतो. मुळात दम्याच्या रुग्णांना श्‍वसनमार्गात सूज आल्यामुळे फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोचण्यास अडथळा येत असताना कोरड्या हवेमुळे हा त्रास बळावतो आणि दम्याचा झटका येण्याचे प्रमाण वाढते. आज आपण दम्याच्या रुग्णांनी हिवाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी, हे जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दम्याच्या रुग्णांनी हिवाळ्यात घ्या ‘अशी’ काळजी

उबदार कपडे घाला
दमाच्या रुग्णांनी हिवाळ्यात थंडी टाळण्यासाठी उबदार किंवा लोकरीचे कपडे घालावेत. घसरलेले तापमान आणि थंड वारे एकत्र येणे हिवाळ्यात आपल्या अडचणी वाढवतात, त्यामुळे त्यांच्यापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी उबदार कपडे घाला.

धूर टाळा
दमाच्या रुग्णांनी हिवाळ्यात शक्यतो धुरापासून दूर राहावे. अशा रुग्णांसाठी धूर अत्यंत घातक ठरू शकतो. तसेच तुमचा पलंग स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यावर धूळ अजिबात जमू नये.

कोमट पाणी प्या
हिवाळा सुरू होताच लोकांना सर्दी-खोकलाचा त्रास होऊ लागतो. अशा हवामानात नेहमी कोमट पाणी प्यावे. कोमट पाण्याने फक्त घशालाच फायदा होत नाही तर फुफ्फुसातील श्लेष्माच्या समस्येपासून बचाव होतो.

(आणखी वाचा : हृदय विकार आणि तुमचे मेटाबॉलिजम सुधारेल ​’हे’ औषधी गुणधर्म; जाणून घ्या अन्य आरोग्यदायी लाभ )

दारू आणि सिगारेटपासून दूर
सायनस आणि दम्याच्या रुग्णांसाठी दारू आणि तंबाखू दोन्ही विषासारखे आहेत. म्हणूनच हिवाळ्याच्या काळात लोकांनी या दोन्ही गोष्टींपासून लांब राहावे. थंडीत या गोष्टींचे सेवन केल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात.

घर सोडू नका
हिवाळ्यात पडणारे तापमान आणि थंड वारे टाळण्यासाठी शक्यतो घराबाहेर पडू नका. या ऋतूत सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर पडू नका. काही कारणास्तव घराबाहेर जावे लागले तर उबदार कपडे घाला. थंडीपासून पायांचे संरक्षण करण्यासाठी आपले कान झाकून ठेवा आणि उबदार शूज घाला.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asthma patients should take these precautions to stay fit and healthy in winter pdb