Ayurvedic Acidity Cure: अलीकडे पित्ताचा त्रास अनेकांना होत असतो. याचे मुख्य कारण म्हणजे जीवनशैलीतील व आहारातील अनियमितता. कामाच्या व्यापात आपण इतके व्यस्थ असतो की खाण्या-पिण्याच्या वेळा लक्षात राहत नाहीत. अनेकांना ठरवून उठल्या उठल्या चहा- कॉफी घ्यायची नसते पण डोळ्यावर येणारी झोप व कामाचा लोड यामुळे अनेकांचे हात कॉफीच्या मगकडे वळतात. कॉफीमुळे भूक मरते आणि मग काही खाल्लं जात नाही परिणामी पोटात गॅस्ट्रिक ऍसिड वाढू लागते आणि मग थोड्यावेळाने करपट ढेकर येऊ लागतात. पोटातील ऍसिड वाढल्यास डोकेदुखी सुद्धा होऊ शकते. उपाय म्हणून अनेकदा सोडा प्यायला जातो पण यामुळे ऍसिडिटीचा त्रास आणखी वाढू शकतो. आज आपण जगात प्रसिद्ध असा ऍसिडिटीवरील भारतीय आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत. प्रत्यक्ष अथर्वशीर्षातही या उपायाची माहिती दिलेली आहे.
अथर्वशीर्षातील श्लोक
यो दूर्वांकुरैंर्यजति
स वैश्रवणोपमो भवति।
यो लाजैर्यजति स यशोवान भवति।। स: मेधावान भवति।।
या श्लोकानुसार दुर्वा व लाह्यांचे महत्त्व सांगण्यात आले आहेत. अथर्वशीर्ष व भारतातील प्रख्यात वैद्य प. य. खडिवाले वैद्य यांच्या माहितीनुसार, धान्याच्या लाह्या या ऍसिडिटी कमी करण्यास सर्वोत्तम आहेत. लक्षात घ्या लाह्या म्हणजे कुरमुरे नव्हे. सहसा पूजेत अर्पण केल्या जाणाऱ्या लाह्यांविषयी आपण बोलत आहोत. या लाह्या पोटात जाताच अतिरिक्त ऍसिड शोषून घेतात. शिवाय या लाह्या पचनास सोप्या असल्याने शौचामार्फत हे ऍसिड शरीरातून बाहेर टाकतात. आयुर्वेदानुसारही दुर्वा खाल्ल्याने पोटदुखीवर आराम मिळू शकतो.
दरम्यान, लाह्या अनसेपोटी खाल्ल्यास भूकही क्षमण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्याच्या मोहिमेवर असल्यास मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी लाह्यांचा पर्याय विचारात घेऊ शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)