नवी दिल्ली : मेंदूशी संबंधित स्मृतिभ्रंश हा आजार असून स्मरणशक्ती गमावण्याबरोबर या आजाराच्या रुग्णांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या आजारावर ठोस उपचार शोधण्यासाठी संशोधक अथक प्रयत्न करत आहेत. त्यांना काही प्रमाणात यश आले आहे. विशेष म्हणजे या आजारावर एक लसही विकसित करण्यात येत आहे.

बोस्टनमधील ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’च्या संशोधकांनी स्मृतिभ्रंशावर एक लस विकसित करण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यासाठी संशोधकांनी उंदरांवर प्रयोग केले असून ते यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. टोक्योमधील ‘ज्युटेंडो युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मेडिसिनने’ही या विकारावर मात करण्यासाठी संशोधन केले आहे. यासाठी वृद्ध उंदरांमध्ये आढळणाऱ्या आजाराचा अभ्यास करण्यात आला. या वेळी विशेषत: उंदरांच्या स्मृतिभ्रंशावर लस विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

Success Story An inspiring journey from selling balloons
Success Story: रस्त्यांवर फुगे विकण्यापासून ते करोडोंची कंपनी उभी करण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
rbi focuses on making upi rupay truly global says rbi governor shaktikanta das
‘यूपीआय – रूपे’च्या जागतिकीकरणावर रिझर्व्ह बँकेचा भर
rbi launch unified lending interface
कर्जाच्या सुलभ प्रवाहासाठी आता ‘यूएलआय’; ‘यूपीआय’च्या धर्तीवर रिझर्व्ह बँकेकडून नवीन कर्ज मंच
Employees right not to work after office hours What would Australias Right to Disconnect law look like
कार्यालयीन वेळेनंतर काम न करण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार… कसा असेल ऑस्ट्रेलियातील ‘राइट टू डिस्कनेक्ट’ कायदा?
Car Driving Tips
चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणे पडेल महागात; ‘या’ टिप्स वाचून वेळीच व्हा सावध!
Town Park, Thane, Town Park proposal Thane,
ठाण्यात टाऊन पार्कच्या उभारणीसाठी हालचाली, पार्कसाठी पालिकेने तयार केला आरक्षण बदलाचा प्रस्ताव
Loksatta chip charitra Taiwan government plans to make Morris Chang a global chip manufacturing hub
चीप-चरित्र: ‘फाऊंड्री मॉडेल’ची पायाभरणी….

या वेळी ‘सेनेसीन असोसिएट ग्लायकोप्रोटीन’ हे विकसित करण्यात आले. या लशीमुळे अ‍ॅथेरोस्क्लेरोसिन आणि टाइप दोन प्रकारच्या मधुमेहासह अनेक आजारांवर चांगले परिणाम झाल्याचे दिसून आले. संशोधकांच्या म्हणण्यानुसार ही लस स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांसाठी दिलासादायक ठरण्याची अधिक शक्यता आहे.