ॲव्होकॅडो फळ हे केवळ इन्स्टाग्राम पोस्ट किंवा इतर कॅफेत मिळणारा साधा नाश्ता नसून, व्यग्र दिवसात आपल्याला फ्रेश ठेवण्यासाठीचे संपूर्ण जेवण आहे. ॲव्होकॅडो हे एक असे फळ आहे; ज्यामध्ये फॅटी ॲसिड खूप प्रमाणात आढळते. पण, त्यामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी असते.

काही दिवसांपूर्वीच, वडोदरातील एका विक्रेत्याचा ताजे टोमॅटो, कांदे व ऑलिव्ह ऑइल टाकून ॲव्होकॅडो टोस्ट विकतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चर्चेचा मुद्दा बनला होता. ॲव्होकॅडो हे अत्यंत पौष्टिक आणि खनिजे व जीवनसत्त्वांनी समृद्ध फळ आहे. त्यात जास्त प्रमाणात प्रथिने, तसेच चरबी असते. त्यातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट निरोगी हृदय राखण्यासाठी महत्त्वाचे आहे. ॲव्होकॅडो केवळ आपल्या आरोग्यासाठीच नव्हे, तर आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. कारण- असलेले पोषक घटक त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. सोशल मीडियावर खवय्यांनी याला ट्रेंडिंग फूड बनवले होते. आहारतज्ज्ञ वेदिका प्रेमनानी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

Natasa Stankovic reacts On Divorce From Hardik Pandya
घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच नताशा हार्दिक पंड्याबाबत म्हणाली, “आम्ही अजूनही…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Mother Lakshmi loves people of these five zodiac signs
माता लक्ष्मीला प्रिय असतात ‘या’ पाच राशी! गरीब कुटुंबात राहूनही होतात कोट्याधीश-अब्जाधीश
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
Astrological Predictions Future of India 2024 and Narendra Modi Government in Marathi
Astrological Predictions India 2024 : ‘आर्थिक झळ ते मानसिक समस्यांमध्ये वाढ’; शनीची वक्रदृष्टी? भारताचे पुढे काय होणार? वाचा ज्योतिषांची भविष्यवाणी

आपल्या देशात दक्षिणेकडील राज्ये आणि सिक्कीममध्ये ॲव्होकॅडोचे पीक घेतले जाते. हे फळ आपल्याला परवडणारेही आहे; तसेच त्याचा रोज आहारात समावेश करण्याची गरज नाही. ॲव्होकॅडो टोस्ट हा टोस्ट केलेल्या ब्रेडचा तुकडा आहे; ज्याच्यावर मॅश केलेला किंवा कापलेला ॲव्होकॅडोचा तुकडा असतो. हे पचन सुधारण्यासाठीही चांगले मानले जाते. ॲव्होकॅडोचे फायदे जाणून घेऊ.

हेल्दी फॅट्स : ॲव्होकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात; जे
निरोगी हृदयासाठी आवश्यक मानले जातात. हे चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यास मदत करतात; जळजळ कमी होते आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

तंतुमय पदार्थ : ॲव्होकॅडो ब्रेड हा दोन्ही आहारांतील तंतुमय पदार्थांचा स्रोत आहे. त्यामुळे पचनास मदत होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.

जीवनसत्त्वे आणि खनिजे : ॲव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम व फोलेट यासह विविध आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे पोषक घटक संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात.

अँटिऑक्सिडंट्स : ॲव्होकॅडोमध्ये ल्युटीन, झेक्सॅन्थिन व विविध कॅरोटीनोइड्ससारखे अँटिऑक्सिडंट असतात; जे तणाव आणि आरोग्याचे नुकसान होण्यापासून संरक्षण देतात. हे अँटिऑक्सिडंट डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. काही जुनाट आजारांचा धोकाही यामध्ये कमी होतो.

शरीरातील चयापचय प्रक्रियेसाठी जीवनसत्त्वे महत्त्वाची असतात; जी चांगले आरोग्य राखण्यास मदत करते. ॲव्होकॅडोमध्ये असलेली अँटीऑक्सिडंट्स तुमच्या शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी उत्तम आहे; जे तुम्हाला आजारी पडण्यापासून वाचवते. व्हिटॅमिन सी त्वचेवरील वृद्धत्वाची चिन्हेदेखील कमी करते. ॲव्होकॅडोमध्ये आढळणारे व्हिटॅमिन बी त्वचेच्या नवीन पेशी तयार करण्यास मदत करते; तर जीवनसत्त्वे अ व ई तुमची त्वचा तरुण आणि केस गुळगुळीत करतात.

पचन आणि आतड्यांचे आरोग्य : ॲव्होकॅडो टोस्टमधील तंतुमय पदार्थ पचनास मदत करू शकते, तसेच आतड्यांचे आरोग्यही यामुळे सुधारते.

हेही वाचा >> पचन क्रिया सुधारण्यासाठी सकाळी नाश्त्याआधी करा ‘हे’ आसन, रात्रीपर्यंत राहाल एकदम फ्रेश 

ॲव्होकॅडोपासून तुम्ही स्वादिष्ट सँडविचही बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला ॲव्होकॅडो, चेरी टोमॅटो, रोझमेरी लीव्हज, बटर, चीज, मसाले अशा काही घटकांची आवश्यकता असेल. तुम्ही क्रीमी मिश्रण तयार करा आणि ते टोस्ट केलेल्या ब्रेडच्या तुकड्यावर पसरवा. अशा प्रकारे तुमचे हेल्दी सँडविच नाश्त्यासाठी तयार होईल.

Story img Loader