Avocado or Egg Toast : चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला चांगल्या आहाराची खूप आवश्यकता असते, पण अनेकदा धावपळीच्या आयुष्यात आपण आहाराकडे लक्ष देत नाही. जर सकाळी पोषक नाश्ता केला तर तुम्ही दिवसभर उत्साही राहू शकता. याविषयी न्यूट्रिशनिस्ट सुमन अग्रवाल त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सांगतात, “बरेच लोक अंडी खाणे सोडतात आणि ॲव्होकॅडो खातात? पण, तुम्हाला या दोन पैकी कोणते चांगले आहेत हे माहिती असायलाच पाहिजे.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या सांगतात, “एका ॲव्होकॅडोमध्ये २४० कॅलरी असतात, तर एका अंड्यामध्ये ७० कॅलरी असतात. एका ॲव्होकॅडोमध्ये ३ ग्रॅम प्रोटिन असते, तर एका अंड्यामध्ये ६ ग्रॅम प्रोटिन असते. एका ॲव्होकॅडोमध्ये १३ ग्रॅम कर्बोदके असतात, तर एका अंड्यामध्ये कर्बोदके एक ग्रॅमपेक्षाही कमी असतात. त्यामुळे तुमचा नाश्ता विचारपूर्वक निवडा.”

हेही वाचा : तुम्ही रोज दुधाचा चहा प्यायला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा

ॲव्होकॅडो की अंडी; कोणता पर्याय चांगला?

हैदराबाद येथील केअर हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जी. सुषमा द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “दोन्ही पर्याय पौष्टिक आहेत, पण हे पदार्थ वेगवेगळ्या आहाराच्या गरजा पुरवतात.”

अंडा टोस्ट

सुषमा सांगतात, “अंडा टोस्ट हा एक उत्तम नाश्त्याचा पर्याय आहे. प्रोटिनयुक्त असलेला हा नाश्ता आपले आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. अंड्यामध्ये जीवनसत्त्वे ए, डी, इ आणि बी १२ असतात. या पोषक घटकांबरोबरच यामध्ये लोह आणि खनिजे असतात. अंड्यामधील प्रोटिन्स स्नायूंना वाढण्यास मदत करतात, जे नियमित व्यायाम करतात त्यांनी अंडा टोस्ट नाश्त्यात खावा.”

याशिवाय अंड्यामध्ये कोलीन असतात, जे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. “अंडा टोस्ट खाल्ल्याने तुम्हाला भूक लागत नाही आणि त्यामुळे दिवसभर स्नॅक्सपासून तुम्ही दूर राहता. तुम्ही धान्यांपासून बनवलेला ब्रेड निवडून पौष्टिक मूल्य आणखी वाढवू शकता, ज्यामुळे तुमच्या आहारात फायबरचा समावेश होतो. फायबर हे पचनक्रियेस मदत करते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते”, असे सुषमा पुढे सांगतात.

ॲव्होकॅडो टोस्ट

गेल्या काही वर्षांत ॲव्होकॅडो टोस्ट हा लोकप्रिय नाश्ता झाला आहे. अनेक पोषक आहार घेणारे लोक ॲव्होकॅडोचा नाश्त्यात समावेश करतात. सुषमा सांगतात, “ॲव्होकॅडोमध्ये चांगले मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. याशिवाय पोटॅशियमसह के, सी आणि ई सारखी विविध जीवनसत्त्वेसुद्धा असतात. ही जीवनसत्त्वे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.”

ॲव्होकॅडो हा एक स्वादिष्ट आणि पोषक आहार आहे. “ॲव्होकॅडो टोस्टदेखील फायबरचा एक चांगला स्रोत आहे, जो पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतो आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतो. ॲव्होकॅडोमध्ये असलेले चांगले फॅट्स तुम्हाला संपूर्ण दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत करतात”, असे सुषमा सांगतात.

हेही वाचा : मिलिंद सोमण आठवड्यातून एकदा करतो दोन किमी स्विमिंग; पण खरंच याने आरोग्याला काही फायदा होतो का? वाचा फिटनेस ट्रेनरचे मत

अंडा टोस्ट आणि ॲव्होकॅडो टोस्टमधील कोणता पदार्थ नाश्त्यासाठी निवडावा, हे आपल्या पौष्टिक गरजा आणि चव प्राधान्यांवर अवलंबून आहे. सुषमा पुढे सांगतात, “जर तुम्ही भरपूर प्रोटिनयुक्त आहाराचा पर्याय शोधत असाल, जो स्नायूंना बळकट करण्यास आणि मेंदूच्या आरोग्यास चांगला आहे तर तुम्ही अंडा टोस्ट हा पर्याय निवडू शकता. याशिवाय जर तुम्हाला हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास व रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करणारे फायबर आणि चांगले फॅट्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करायचा असेल, तर तुम्ही ॲव्होकॅडो हा पर्याय निवडू शकता.”

अंडा टोस्ट आणि ॲव्होकॅडो टोस्ट हे दोन्ही नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहेत, जे संतुलित आहार घेण्यास मदत करतात. तुमच्या आहाराच्या गरजा लक्षात घेऊन पौष्टिक नाश्त्याने दिवसाची सुरुवात करावी.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avocado toast or egg toast which one is better for breakfast know ideal breakfast option ndj
Show comments