बदलेलेल्या जीवनशैलीमध्ये सर्वात जास्त दुर्लक्ष आरोग्याकडे होते. अनेकांना व्यग्र शेड्युलमध्ये व्यवस्थित जेवायलाही वेळ नसतो. त्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर झालेला दिसून येतो. अगदी तरुण मंडळींनाही गंभीर आजारांना बळी पडत आहेत. यासाठी सर्वांनी आरोग्याची नीट काळजी घ्यावी असा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. आपण जे अन्नपदार्थ खातो त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो हे सर्वांनाच माहित असेल. पण काही पदार्थ कधी खावे आणि कधी खाऊ नये याबाबत देखील काळजी घेणे गरजेचे असते. जसे रिकाम्या पोटी काही पदार्थ खाल्ल्याने आरोग्यासाठी ते धोकादायक ठरू शकते. कोणते आहेत असे पदार्थ जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिकाम्या पोटी हे पदार्थ खाणे टाळा

आणखी वाचा : Heart Attack येण्यापुर्वी महिलांमध्ये दिसतात ही १२ लक्षणं; वेळीच व्हा सावध

सफरचंद
सफरचंद पचण्यासाठी १ ते २ तासांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खात असाल तर तुम्हाला अपचनाची समस्या उद्धवू शकते.

कॉफी/चहा
अनेकजणांना सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण रिकाम्या पोटी अशी पेयं पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिऊ नये, त्याआधी फळं किंवा इतर काही नाश्त्याचे पदार्थ खाऊ शकता.

लस्सी
काही जणांना चहा कॉफी ऐवजी सकाळी लस्सी प्यायला आवडते, पण रिकाम्या पोटी लस्सी प्यायल्याने आरोग्याशी निगडीत अनेक समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे रिकाम्या पोटी लस्सी पिणे टाळावे.

आणखी वाचा : सतत डोकं दुखतय का? ‘या’ पदार्थांमुळे होऊ शकतो डोकेदुखीचा त्रास, वेळीच करा बदल

सॅलेड
व्यायाम करणाऱ्या व्यक्ती तब्बेतीची विशेष काळजी घेतात, त्यामुळे ते सकाळच्या नाश्त्यातही तेलकट किंवा जंक फूड न खाता सॅलेड खाण्याला प्राधान्य देतात. पण रिकाम्या पोटी सॅलेड खाल्ल्याने पचनाशी निगडित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात सॅलेडचा समावेश करावा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avoid eating salad apple or drinking tea coffee on an empty stomach in the morning know its side effects pns