Avoid these food items eating with tea: जगात करोडो चहा प्रेमी आहेत. चहा हे असे पेय आहे, ज्याशिवाय अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. ब्लॅक टी, ग्रीन टी, हर्बल टी असे चहाचे अनेक प्रकार आहेत. पण भारतातील सर्वात आवडता चहा म्हणजे दुधाचा चहा. या चहामध्ये पाणी, आले, वेलची आणि दालचिनी वापरली जाते. अनेक जण दिवसातून दोन-तीन कप चहा पितात. चहासोबत अनेकांना बिस्किट, खारी, टोस्ट इत्यादी खायला आवडते. पण चहासोबत काही पदार्थांचे सेवन करणे टाळावे. चहासोबत या पदार्थांचे सेवन करणं टाळा. सकाळ असो वा संध्याकाळ, अनेक भारतीय घरांमध्ये नाश्त्यासोबत चहा पिणे ही एक परंपराच आहे. आणि बहुतेकवेळा नाश्त्याला तळलेले पदार्थ असतात. हे तळलेले पदार्थ आधीच आरोग्यासाठी हानिकारक म्हणून ओळखले जातात, परंतु चहासोबत ते खाल्ल्याने पचन आणि पोषक तत्वांच्या शोषणावर अधिक परिणाम होऊ शकतो. मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमधील क्लिनिकल पोषणतज्ज्ञ वेदिका प्रेमानी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
चहा आणि पकोडे एकत्र खावे की नाही?
पोषणतज्ज्ञ सांगतात की, योग्य प्रमाणात चहा पिणे हाणीकारक नाही पण त्यासोबतच तळलेले पदार्थ खाणे शरिरासाठी हाणीकारक ठरु शकतात. चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट असतात जे लोह आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या अन्न स्रोतांसह सेवन केल्यास त्यांचे शोषण कमी होते. शिवाय, वारंवार गरम केलेल्या तेलात तळलेले पकोडे खाल्ल्याने ट्रान्स फॅटी अॅसिडचे उत्पादन होते,”
चहासोबत असे काही पदार्थ आहेत का जे टाळावेत?
चहासोबत अनेकजण बिस्किटे आणि कुकीज खातात. ज्यामध्ये चरबी आणि साखरेचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.चहासोबत खाल्ला जाणारा आणखी एक लोकप्रिय नाश्ता म्हणजे समोसा ज्यामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते.ब्रेडसारखे इतर बेकरी उत्पादने देखील चहासोबत खाणे योग्य नाही कारण त्यात सोडियम, साखर आणि फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. मात्र आरोग्यदायी नाश्त्याच्या पर्यायांमध्ये तुम्ही ढोकळा, मखाना, चना चाट आणी खाकरा यासह रागी चिप्सचा समावेश करु शकता.
डेअरी प्रोडक्ट्स – चहासोबत दूध, पनीर किंवा मलई इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने चहामध्ये आढळणारे पॉलीफेनॉलचा परिणाम शरीरावर होत नाही.
लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावे – चहा पिताना हिरव्या पालेभाज्या, मसूर, धान्ये यांसारखे लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला या पदार्थांमधून लोह शोषण्यापासून रोखतात.
आरोग्यदायी चहाचे प्रकार
कॅमोमाइल चहा: हा चहा त्याच्या गुणधर्मांसाठी खूप प्रसिद्ध आहे.
हळद आणि आल्याची चहा: सामान्य चहाला पर्याय म्हणून, हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. नियमित चहामध्ये काळी मिरी आणि वेलची पावडर घालूनही आरोग्यदायी बनवता चहा येतो.