Rosemary Water Benefits: हल्ली सोशल मीडियावर केसांच्या मजबुतीसाठी विविध घरगुती उपाय सांगितले जातात. त्यातीलच सध्या खूप चर्चेत असलेला उपाय म्हणजे रोझमेरीचा. परंतु, रोझमेरीची पाने, रोझमेरी वॉटर व रोझमेरी ऑइल साठवण्याची आणि ते वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का? कटेंट क्रिएटर अस्मी यांनी इन्स्टाग्रामवर या संदर्भात मार्गदर्शन केले आहे; ज्याची आम्ही एका तज्ज्ञ व्यक्तीद्वारे पडताळणी केली.

अस्मी यांच्या मते, रोझमेरी वापरताना तुम्ही या चुका करणे थांबवले पाहिजे:

What is water intoxication
Water Intoxication : त्वचा चमकदार दिसण्यासाठी खूप पाणी पिताय? मग थांबा! ‘या’ समस्येला तुम्हालाही द्यावे लागेल तोंड; डॉक्टर म्हणतात…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Tea that will solve problem of pimples hairfall dark spots skin tea but know this expert advice
चहा ठरेल पिंपल्स, केसगळती आणि काळे डाग घालवण्यासाठी सर्वोत्तम उपाय! कॉन्टेन्ट क्रिएटरच्या ‘या’ रेसिपीवर तज्ज्ञ म्हणाले…
A single cigarette costs men 17 minutes of their life and women
एका सिगारेटमुळे पुरुष गमावतात आयुष्यातील १७ मिनिटे आणि महिला २२ मिनिटे; संशोधनातून धक्कादायक खुलासा….
What happens to the body when you sleep at 8 PM and wake up at 4 AM? health tips
जर तुम्ही रात्री ८ वाजता झोपला आणि पहाटे ४ वाजता उठला, तर शरीरावर काय परिणाम होईल? वाचा डॉक्टर काय सांगतात
MS Dhoni Fitness Secret
MS Dhoni Fitness Secret : “मी पूर्वीसारखा फिट नाही” महेंद्रसिंह धोनीने दिली कबुली; तंदुरुस्त राहण्यासाठी धोनी काय करतो? जाणून घ्या सविस्तर
What is the Leidenfrost effect
Leidenfrost Effect : जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरताय? मग नक्की जाणून घ्या ‘या’ हॅकबद्दल
yoga poses to relieve gas
Health Special: पोटातील गॅसवर योगासनांचा जालीम उपाय; नेमके काय कराल? – भाग २

उकळताना काळजी घ्यावी

जर तुम्ही रोझमेरीची पाने पाण्यात आवश्यक तितका वेळ उकळली नाहीत, तर त्याचे फायदेशीर गुणधर्म पूर्णपणे पाण्यात उतरू शकणार नाहीत. तेव्हा रोझमेरीच्या पाण्याचे फायदे मिळवण्यासाठी एखाद्या टोपासारख्या भांड्यात थोडा वेळ पाणी उकळू द्या. मग त्यात रोझमेरीची ताजी किंवा वाळलेली पाने टाकून, पाणी किमान २० मिनिटे उकळू द्या.

रोझमेरीचे पाणी गरम असताना वापरू नका

रोझमेरीचे पाणी तयार केल्यानंतर केसांना लावण्यापूर्वी ते खोलीच्या तापमानाइतके थंड होऊ द्या. रोझमेरीचे गरम पाणी लावल्याने केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते आणि त्यामुळे कोरडेपणा निर्माण होऊ शकतो.

रोझमेरी इसेंन्शियल ऑईल वापरणे टाळा

इसेंन्शियल ऑईल थेट रोझमेरी पाण्यामध्ये मिसळणे टाळा. पाणी आणि तेल मिसळत नसल्यामुळे आवश्यक तेल वर तरंगते.असे चुकीच्या रीतीने केलेले मिश्रणयुक्त तेल डोक्याला केल्याने तुमच्या टाळूवर तेलाचे जास्त प्रमाणात डाग पडू शकतात आणि त्यामुळे चिडचिड किंवा इतर समस्या उद्भवू शकतात.

रोझमेरीचे पाणी लावल्यानंतर केस धुऊ नका

रोझमेरीचे पाणी लावल्यानंतर केस धुण्याची गरज नाही. केसांना दिवसभरात त्याचे फायदे मिळावेत यासाठी ते तसेच ठेवावेत.

जास्त काळ साठवणूक करू नका

रोझमेरीचे पाणी जास्तीत जास्त सात दिवस फ्रिजमध्ये ठेवा. रेफ्रिजरेशनशिवाय ते तीन दिवसांपर्यंत ठेवता येते. ते जास्त काळ ठेवल्याने खराब होण्याचा धोका वाढतो.

हेही वाचा: तज्ज्ञांनी सांगितलेली ही उशी तुमचे घोरणे कमी करू शकते? जाणून घ्या…

रोझमेरी पाणी लावल्यानंतर लगेच झोपू नका

रोझमेरी पाणी लावल्यानंतर लगेच झोपू नका. ओल्या केसांनी झोपल्याने कोंडा होण्याचा धोका वाढतो. कारण- ओलसर टाळू डोक्यातील कोंडा निर्माण करणाऱ्या जीवाणूंसाठी एक आवश्यक वातावरण तयार करते. झोपण्यापूर्वी तुमचे केस कोरडे असल्याची खात्री करून घ्या.

सीरमचा वापर करा

रोझमेरी पाण्याचा नियमित वापर केल्यास कोरडेपणा वाढू शकतो. ते टाळण्यासाठी दररोज तेल किंवा सिरमचे १-२ थेंब मध्यम लांबीपासून केसांच्या टोकापर्यंत लावा.

अभिवृत एस्थेटिक्सचे सह-संस्थापक, कॉस्मेटोलॉजिस्ट व त्वचा तज्ज्ञ डॉ. जतीन मित्तल म्हणाले की, रोझमेरीचे पाणी उत्तेजक व प्रतिजैविक गुणधर्मांमुळे केसांसाठी लोकप्रिय आहे. शॅम्पू लावून केस धुतल्यानंतर शेवटी केस धुताना रोझमेरी पाण्याचा वापर करा. “रोज टाळूवर स्प्रे करा किंवा त्यात मसाज करा. त्यामुळे केसांची वाढ होण्यास आणि कोंडा कमी होण्यास मदत होते,” असे डॉ. मित्तल म्हणाल्या.

Story img Loader