Best Rice For Weight Loss, Diabetes: शतकानुशतके तांदूळ हा भारतीय पाककृतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून अबाधित राहिला आहे. भाताच्या शेकडो जाती आढळतात. तुम्हाला पांढऱ्या आणि ब्राऊन तांदळाची माहिती आहे, अनेकदा वजन कमी करण्यापासून ते डायबिटिजपर्यंत अनेक स्थितींमध्ये नेमका कोणता तांदूळ आरोग्यदायी ठरेल यावरून चर्चा होत असतात. यात अनेकांना माहित नसलेला पण बहुगुणी असा एक तांदळाचा प्रकार म्हणजे नवरा किंवा नजावरा तांदूळ.

नजावरा तांदळाच्या भाताचे फायदे (Benefits Of Rice)

तांदळाच्या याच जातीबद्दल बोलताना, डॉ. स्वाती रामामूर्ती, हेड (संशोधन आणि विकास) हर्बी एंजेल सांगतात की, “नजावरा तांदूळ हा तांदळाचा एक पारंपारिक प्रकार आहे ज्याचे मूळ केरळमध्ये आहे. पेरणीनंतर ६० दिवसांत पीक काढणीस येते. त्यामुळे याला शास्तिका शाली म्हणजेच ६० दिवसांत उगवणारा तांदूळ असेही म्हणतात. हा पॉलिश न केलेला तांदूळ असतो, जो लालसर तपकिरी रंगाचा असतो. या तांदळाला आयुर्वेदात फक्त अन्न म्हणूनच नव्हे तर औषध म्हणूनही वापरले गेले आहे. उच्च पौष्टिक मूल्यांमुळे हे पारंपारिक सुपरफूडपैकी एक मानले जाते.”

Boondi curry recipe in Marathi how to make Boondi curry recipe
रोज काय भाजी करावी सुचत नाही? घरात असलेल्या बुंदीची करा “बूंदी करी”; झक्कास होईल बेत
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
tushar suryavanshi conversation with padamashri sabarmatee
आपल्याला काय हवे? सकस आहार, की दुर्धर आजार?
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi
अस्सल झणझणीत खानदेशी शेव भाजी, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी
nikki tamboli and samir choughule
Video: निक्की तांबोळी आणि समीर चौघुले यांनी सांगितली चमचमीत बटाटावड्याची रेसिपी; पाहा व्हिडीओ
subhash sharma padma shri award
नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते सुभाष शर्मा यांना ‘पद्मश्री’, यवतमाळ जिल्ह्याला प्रथमच…
Why You Should Avoid Reheating Rice - Expert's Warning Reheating rice cause food poisoning
महिलांनो रात्री शिल्लक राहिलेला भात सकाळी पुन्हा गरम करून खाता का? ‘हे’ गंभीर परिणाम ऐकून धक्का बसेल

“चरक संहितेनुसार, नजावर भात किंवा नवरा तांदूळ हा आयुर्वेदातील सर्वोत्तम धान्यांपैकी एक मानला जातो. तांदळाची ही विविधता शरीराला त्वरित ऊर्जा आणि पोषण देते. शिवाय, रक्त, हाडे, स्नायू, पुनरुत्पादक ऊतक यांना मजबूत करून सर्व ३ दोषांचे संतुलन देखील करते. तापातून बरे झालेल्या रुग्णांसाठी तसेच मधुमेही रुग्ण आणि गर्भवती महिलांसाठी या भाताची पेज उत्तम काम करते.

डॉ. राममूर्ती सांगतात की, “या तांदळात फिनोलिक संयुगे, अँथोसायनिन्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात यामुळे या भाताचे सेवन पौष्टिक, दाहक-विरोधी, वेदनाशामकशक्ती वाढवते. आयुर्वेदानुसार, या भाताचे रोज सेवन केल्यास संधिवात, अर्धांगवायू यांसारख्या न्यूरोमस्क्युलर स्थितींवर उपचारात मदत होऊ शकते. दुसरीकडे , केरळ कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या चमूने केलेल्या अभ्यासात, स्तनाच्या कर्करोगावर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रथिनाची काही अंशी उपस्थिती असल्याचे आढळून आले होते.

नजावारा तांदळाचे सेवन कसे करावे? (How To Eat Rice)

आयुर्वेद डॉक्टर रेखा राधामोनी यांनी नजावरा तांदळाच्या अनेक फायद्यांविषयी भाष्य केले.आजारातून बाहेर पडत असणाऱ्या रूग्णांना उर्जेची पातळी राखण्यासाठी आणि पोषण त्वरित मिळण्यासाठी पोस्ट-ट्रीटमेंट म्हणून या तांदळाची पेज देणे प्रभावी ठरत असल्याचेही त्यांनी इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे.

नजावारा तांदूळ सेवन करण्याचा एक मार्ग म्हणजे पेज. डॉ राधामोनी यांच्या माहितीनुसार, आपण फक्त तांदूळ धुवून तीनपट पाण्याने शिजवावे आणि उकळावे. तांदूळ मऊ झाल्यावर पाणी गाळून घ्या, हिमालयीन गुलाबी मीठ (सैंधव मीठ) आणि चवीनुसार थोडी ठेचलेली मिरची घाला व या भाताचे सेवन करा.

नजावारा तांदळाचे सेवन कोणी करू नये? (Who Should Avoid Rice)

वरिष्ठ आहारतज्ज्ञ, मणिपाल हॉस्पिटल्स, विजयवाडा येथील स्वाती यांनी सांगितले की, “ग्लूटेन संवेदनशीलता किंवा सेलिआक रोग असलेल्या व्यक्तींनी नजावरा तांदूळ खाणे टाळावे कारण यामध्ये ग्लूटेनचे प्रमाण अधिक असते याव्यतिरिक्त, मधुमेही व्यक्तींनी हा तांदूळ कमी प्रमाणात खावा कारण त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आहे आणि शिवाय भाताच्या सेवनानंतर रक्तातील साखरेच्या प्रमाणाचे निरीक्षण केले पाहिजे. शिवाय ज्यांना भाताची ऍलर्जी किंवा संवेदनशीलता आहे त्यांनीही हा भात टाळावा.

हे ही वाचा<< फोडणीसाठी मोहरी वापरण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क; पावसाळ्यात होईल खूप मदत

स्वाती यांच्या माहितीनुसार, नजावरा तांदूळ तुमच्या आहारात विविध प्रकारे समाविष्ट केला जाऊ शकतो.

दलिया किंवा मऊ खिचडी तयार करण्यासाठी हा भात वापरून पाणी किंवा दुधात शिजवता येऊ शकतो, या भाताची खीर बनवायची असल्यास गूळ किंवा मध घालून गोड करता येते आणि दालचिनी आणि वेलची सारख्या मसाल्यांनी चव दिली जाऊ शकते.

बिर्याणी, पुलाव किंवा रिसोट्टो यांसारख्या पदार्थांमध्ये नियमित भाताला पर्याय म्हणून नजावरा तांदूळ वापरला जाऊ शकतो

Story img Loader