Diabetes Control Tips 4 Ayurvedic: भारतातील अनेक जण हे मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह हा जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढणारा आजार आहे. दुर्दैवाने यावर कोणताही इलाज नाही. एकदा का मधुमेहाची लागण झाली तर तुम्हाला त्याच्यासोबतच जगावं लागतं. मधुमेह असलेल्या लोकांना विशेषत: उच्च किंवा कमी रक्तातील साखरेचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, अयोग्य वेळा आणि शारीरिक कष्टाचा अभाव; यामुळे मधुमेहासारखे आजार मागे लागतात. मात्र, डायबिटिजवर नियंत्रण ठेवल्यास चांगले जीवन जगता येते.
मधुमेह हा एक चयापचयाशी संबंधित विकार आहे, ज्यामध्ये शरीर ग्लुकोज वापरण्यास असमर्थ आहे, ज्यामुळे हायपरग्लिकेमिया (उच्च रक्तातील साखरेची पातळी) आणि ग्लाइकोसुरिया (रक्तातील जास्त ग्लुकोज) म्हणतात. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. असे काही आयुर्वेदिक उपाय आहेत, जे उच्च रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास उपयुक्त मानले जातात. आपल्या आजूबाजूच्या बर्याच आयुर्वेदिक गोष्टी उच्च साखरेची पातळी कमी करण्यात प्रभावी ठरतात. काही लोक मधुमेहासाठी घरगुती उपचारांचा प्रयत्न करतात, जे अत्यंत प्रभावी असू शकतात. डॉ. स्मिता नरम यांनी आयुर्वेदिक काही उपाय सांगितले आहेत. या उपायांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते, असे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
डॉक्टर सांगतात, आयुर्वेद ही भारतातील एक प्राचीन औषध प्रणाली आहे. आयुर्वेदातील अनेक गुणकारी औषधांमुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेही रुग्णांसाठी गुणकारक असलेल्या औषधी वनस्पतींची यादी पाहूयात…
(हे ही वाचा : हिमोग्लोबीन वाढविणारे बीट ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक; तुम्हाला आहेत का असे त्रास?)
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी खालील उपाय करा
१. मेथीचे दाणे
दोन चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने तुमच्या ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते. तुम्ही मेथीच्या बियांची पावडर रोज गरम किंवा थंड पाण्यासोबत किंवा दुधासोबत घेऊ शकता.
२. हळद पावडर आणि आवळा
आवळा पावडर आणि हळद फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. हे इन्सुलिनचे प्रमाण संतुलित करण्यासदेखील मदत करते. दोन्हीचे मिश्रण मधुमेहींसाठी खूप फायदेशीर आहे. आवळा आणि हळदीच्या मिश्रणाने टाइप २ मधुमेह कमी करता येतो. सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा हळद पावडर आणि एक चमचा आवळा पावडर एकत्र करून घ्या.
३. दालचिनी
दालचिनीच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते, ज्यामुळे टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते फायदेशीर ठरते. दालचिनी इन्सुलिनची क्रिया उत्तेजित करून रक्तातील साखरेची पातळीदेखील नियंत्रित करू शकते. कोमट पाण्यात अर्धा चमचा दालचिनी मिसळा आणि दररोज एकदा सेवन करा.
(हे ही वाचा : केसांच्या वाढीसाठी आल्याचा चहा खरंच फायदेशीर? उपाय करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञाचा सल्ला )
४. ताजी फळे
सफरचंद, पेरू आणि चेरी यांसारखी ताजी फळे खा; हे रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करतात. सफरचंद व्हिटॅमिन सी, विरघळणारे फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असतात. सफरचंदात आढळणारे पेक्टिन शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी, हानिकारक कचरा आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि इन्सुलिन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
याशिवाय, एखाद्या व्यक्तीने संतुलित आहाराचे पालन करून किमान सात ते आठ तास झोपणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे आणि जंक आणि साखरयुक्त पदार्थ टाळून जीवनशैलीत काही बदल केले पाहिजेत, असेही डॉ. स्मिता यांनी नमूद केले.