Best Ayurvedic Oils for Joint Pain: थंडीच्या दिवसांमध्ये सांधेदुखी व मांसपेशींची दुखणी प्रचंड त्रासदायक ठरतात. थंडीच्या दिवसांमध्ये हाडे सुद्धा जखडल्यासारखी वाटतात याचे मुख्य कारण म्हणजेच ल्युब्रिकेशनची कमतरता. तरुण वयात यामुळेच अचानक शरीरात क्रॅम्प येणे, पायाला सतत मुंग्या येणे इथपासून त्रास सुरु होऊ शकतात. तर अगदी तिशीत- चाळीशीत सुद्धा साधारण हालचाल करतानाही हात पाय दुखू लागतात. अशा समस्या इतक्या नियमित असतात की प्रत्येक वेळी यासाठी डॉक्टरकडे जाणेही नको वाटते, परिणामी काही घरगुतीच उपाय करता येईल का याचा सर्वजण शोध घेत असतात. आज आपण हाडांच्या स्वास्थ्यासाठी तसेच सांधेदुखी, मसल्स दुखणे यावर एका तेलाचा उपाय पाहणार आहोत. अवघ्या १० रुपयात तुम्ही हा उपाय करून पाहू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अंतर्गत प्रकाशित एका लेखाच्या माहितीनुसार, हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी गुणसत्व असत यामुळेच हळद घातलेलं साधं खोबरेल तेल सुद्धा तुमचं स्नायूंच्या मजबुतीसाठी प्रचंड उपयुक्त ठरू शकते. याशिवाय हळदीमुले तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास सुद्धा मदत होते. आयुर्वेद सांगते की हळद ही निर्जंतुकीकरणाचा उत्तम स्रोत आहे. यामुळेच तुमच्या त्वचेवरील फंगस, व्हायरस व किटाणू काढून टाकण्यासाठीही या तेलाची मालिश मदत करू शकते.

संशोधक तज्ज्ञांच्या माहितीनुसार हळदीचे तेल हे त्वचेवरील काळवंडलेला थर दूर करण्यात मदत करतात, त्वचेवर व त्वचेच्या आत जाऊन स्नायूंवर सुद्धा हळदीचे तेल गुणकारी ठरते. तेल व हळद एकत्र येताच यात करक्युमिन हे सत्व तयार होते यामुळेच आपल्याला हाडांचे स्वास्थ्य मजबूत होण्यास मदत होते.

हे ही वाचा<< वॉशरूमला जाण्यासाठी करंगळीच का दाखवली जाते? शास्त्रात सांगितलं आहे ‘हे’ कारण

हळदीचे तेल कसे बनवाल?

दरम्यान,हळदीचे तेल तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता यासाठी गावठी हळदीची मुळं थोडी वाटून घेऊन मग एका कपड्यात बांधून गाळून घेऊ शकता. ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ वाटत असल्यास आपण सोपा उपाय म्हणजे हळदीच्या शुद्ध पावडरमध्ये खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल टाकून नीट मिसळून घ्यावे एनसीबीआईमध्ये प्रकाशित माहितीनुसार, बाजारात विशिष्ट हळदीचे तयार तेल सुद्धा मिळते त्याचा जेवणात वापर केला जाऊ शकतो. यामुळे शरीराची पचन क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते, मात्र तुमच्या खाजगी आरोग्याच्या तक्रारीनुसार आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल .

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayurvedic oil for knee pain turmeric oil relief from stiff joints in winter how to make turmeric oil at home svs