Ayurvedic Remedies to Combat Heat Wave : जगभर उष्णतेची लाट उसळली आहे असे दिसते. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे वाढत्या उष्णतेच्या लाटेचे प्रतिकुल परिणाम आपल्या शरारीवर होत आहेत. त्यामुळे हे समजून घ्या जेव्हाउन्हाळ्याच्या ऋतूमध्ये तुमच्या शरीरात अति उष्णतेमुळे पित्त वाढते, तसेच त्यामुळे वात असंतुलन देखील होते कारण तुमच्या आसपासचे वातावरण खूप कोरडे असते. त्यामुळे पचनाच्या अनेक समस्या देखील उद्भवतात. तीव्र जळजळ, मळमळ, पोट फुगणे, सूज येणे आणि अगदी त्वचेवर पुरळ येणे अशा अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो.

या समस्या टाळण्यासाठी अथवा हातळ्यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपाय दिले आहेत. आयुर्वेद आणि आतडे आरोग्य प्रशिक्षक डॉ. डिंपल जांगडा यांनी याबाबत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. वाढत्या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी आयुर्वेदांनुसार कोणते पदार्थ उपयुक्त ठरू शकतात याची माहिती दिली आहे.

Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
betel leaves expensive, betel leaves,
विड्याची पाने का महागली ? जाणून घ्या, अतिवृष्टी, संततधारेचा परिणाम काय?
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
tasty wheat flour modak
Modak Recipe: एक वाटी गव्हाच्या पीठात झटपट बनवा उकडीचे मोदक; तांदळाच्या मोदकांपेक्षा लागतील भारी
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
  • आवळा – आवळा हा प्रत्येक घरामध्ये सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. उन्हाळ्यामध्ये आवळा खाण्याचे अनेक फायदे आहेत पण उष्णतेच्या लाटेचा सामान करण्यासाठी आवळ्याचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी ठरते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे, तसेच त्यामध्ये शरीराला थंडावा देणारे काही गुणधर्म देखील आहेत.
  • नारळ पाणी – नारळ पाणी हे उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. त्याची चव गोड तर असतेच पण त्याशिवाय त्यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्परस आणि सोडियम असे अनेक पोष्टिक घटक असतात. तसेच नारळाच्या पाण्यामध्ये ९४ टक्के पाणी असते जे तुमच्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण करू शकते. नारळ्याच्या आतील मुलायम मलई देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरते त्यामध्ये नैसर्गिक क्षारयुक्त गुणधर्म असतात.
  • गुलकंद – गुलकंद हे गुलाबांच्या पाकळ्यांपासून तयार केले जाते. त्यामुळे शरीराला थंडावा देणारे गुणधर्म असतात. उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुम्ही गुलकंदाचे सेवन करू शकता.
  • ताक – ताक हे प्रत्येक घरामध्ये सहज उपलब्ध होऊ शकते. वात, पित्त आणि कफाची समस्या असलेल्या प्रत्येकासाठी ताक हे आरोग्यदायी आहे. ताक हे पाचक रस म्हणून उत्तम पेय आहे आणि ते चयापचय सुधारण्यास मदत करते. दुपारच्या जेवणानंतर घ्या.
  • लिंबूपाणी – लिंबू पाणी हे उन्हाळ्यात आरोग्यासाी त्यात थोडे मीठ, थोडी मिरपूड आणि थोडी साखर टाकून त्याचे सेवन करू शकता.


हेही वाचा : उष्णतेच्या लाटेचा मानवी शरीरावर कसा होतो परिणाम? डॉक्टरांकडून जाणून घ्या, त्याची लक्षणे आणि प्रथमोपचार

उष्णेतेच्या लाटेमुळे होणाऱ्या समस्यांचा सामना करण्यासाठी हे ५ पदार्थ उपयूक्त ठरू शकतात याबाबत सहमती दर्शविताना पुण्यातील सर्वाय आयुर्वेद क्लिनिकच्या डॉ. स्नेहल जाधव यांनी सांगितले की, ”उष्णतेचा सामना करण्यासाठी नारळपाणी, गुलकंद, ताक, आवळा आणि लिंबूपाण्याचे सेवन करू शकता. उष्णतेसाठी आवळ्यापेक्षा मोरावळा जास्त उपयूक्त ठरू शकतो पण मधुमेहाची समस्या असलेल्या रुग्णांनी आवळ्याचे सेवन करावे.” तसेच त्यांनी उष्णतेचा सामना करण्यासाठी आणखी काही पदार्थांचे सेवन करण्याची शिफारस केली आहे.

  • दुर्वा कल्प – दुर्वा कल्प म्हणजे दुर्वा स्वरसा मध्ये साखरेची प्रक्रिया केली जाते. दुर्वा शरीरातील पित्त कमी करते आणि स्थिरता आणि शक्ती देते. त्यात साखर असल्याने मधुमेहाच्या रुग्णांनी ते टाळावे आणि ज्यांना वजन वाढवायचे, ताकद वाढवायची आहे त्यांनी दूध किंवा पाण्याबरोबर सेवन करावे. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी याचे सेवन टाळावे. गरोदर स्त्रिया, लहान मुले, उष्णतेमुळे होणारे नाकातून रक्त येत असलेल्यांनी दुर्वा कल्प घ्यावा.
  • सोलकढी – सोलकढी ही कोकम आणि नाराळाच्या दुधापासून तयार केली जाते. सोलकढी चयापचय क्रिया सुधारण्यास आणि पित्त कमी करून हायपर अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी मदत करते.
  • ताडगोळे (आईस अ‍ॅपल) – ताड गोळे या नावच सर्वकाही सांगते. हे पाण्याचे हे गोळे शरीराला खूप थंडवा देतात आणि आरोग्यासाठी पोषक असतात.
  • उसाचा रस – उन्हाळ्यामध्ये उसाचा रस बरेच जण घेतात पण त्याचे आयुर्वेदीक फायदे फार कमी लोकांना माहित असतात. उसाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंटचा चांगला स्रोत असतो. तसेच उसाच्या रस शरीरातील ऊर्जा वाढवतो आणि पचन आणि यकृताच्या समस्यांसाठी फायदेशीर ठरतो. उसाचा रस प्या आणि या कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा द्या.
  • कैरीचे पन्हे – कैरी आणि गूळपासून तयार केलेले हे पेय आहे. कैरीचे पन्हे सेवनाचे काही प्रमुख आरोग्य फायदे म्हणजे ते बद्धकोष्ठतेच्या समस्यांवर उपचार करण्यास मदत करते, रक्त विकार बरे करते, त्वचेची गुणवत्ता तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारते. हे निर्जलीकरण प्रतिबंधित करते, शरीराची प्रतिकारशक्ती किंवा बॅक्टेरियाचा प्रतिकार वाढवते.