Gold Infused Ghee Health Benefits: बाजारात अनेक प्रकारचे तूप उपलब्ध आहे पण कधी तुम्ही सोन्याच्या तुपाविषयी ऐकलं आहे का? आयुर्वेद अभ्यासक डॉ. दिक्षा भावसार सावलिया यांनी इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना २४ – कॅरेट सोन्याने बनवलेल्या विशेष तुपाचे शरीरासाठीचे फायदे सांगितले आहेत. डॉ. दीक्षा सांगतात की, “हे तूप बिलोना पद्धतीने गीर-गाईच्या दुधाने बनवले जाते; आपण त्याला श्यामा म्हणतो (म्हणजेच जे श्यामाचे म्हणजेच कृष्णाचे आहे असे). भगवान श्रीकृष्णाचे गायींवर अतोनात प्रेम होते म्हणून या सोन्याने भरलेल्या तुपाचे नाव श्यामा असे ठेवण्यात आले आहे. आयुर्वेदानुसार, तूप ‘योगवाहि’ मानले जाते, याचा अर्थ त्यात औषधी गुणधर्म असतात अशातच त्यात सोन्याचे गुणधर्म जोडल्याने त्याची शक्ती द्विगुणित होऊ शकते.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता सोन्याचं तूप बनतं तरी कसं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे तूप बनवताना यामध्ये २४ -कॅरेट सोन्याचे नाणे टाकले जाते. या नाण्याचा अंश तुपात उतरतो व त्यातून स्वर्ण भस्म तूप तयार होते. आता आपण या तुपाचे फायदे सुद्धा पाहुयात.

स्वर्ण भस्माचे फायदे काय?

  • रोगप्रतिकारशक्ती सुधारते
  • कर्करोगास प्रतिबंध घालण्यासाठी
  • स्मरणशक्ती वाढते
  • मूड आणि ऊर्जा पातळी सुधारते
  • हार्मोनल समतोल राखण्यास मदत
  • शांत झोप
  • त्वचा आणि केसाचा दर्जा सुधारतो
  • पोषणाची कमतरता भरून निघते
  • शक्ती आणि कामवासना सुधारते
  • प्रजनन क्षमता वाढवते (स्त्री आणि पुरुष दोघांसाठी)
  • जळजळ कमी करते
  • क्षयरोग बरा होण्यास मदत होते
  • मानसिक आरोग्य सुधारते

डॉ. भावसार यांनी सुचवले की जेवणात किंवा साधारण दिवसभरातील सेवनात आपण १० – ३० मिली तुपाचे सेवन करू शकता. गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या सर्व जोडप्यांना, गर्भवती महिलांना आणि हार्मोनल असंतुलन असलेल्या महिलांना याचा फायदा होऊ शकतो. याशिवाय तणाव, खराब मानसिक आरोग्य आणि आतड्यांसंबंधी समस्या असणाऱ्यांना सुद्धा हे तूप खाण्याचा फायदा होऊ शकतो.

स्वर्ण भस्म तुपाविषयी ग्लेनिगल्स हॉस्पिटल्स परळ, मुंबईच्या इंटरनल मेडिसिनच्या वरिष्ठ सल्लागार डॉक्टर मंजुषा अग्रवाल यांनी सांगितले की, ही पद्धत वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाली नसल्यामुळे त्याविषयी ठोस दावा करता येणार नाही. आयुर्वेद प्रशिक्षक डॉ डिंपल जांगडा यांनी सांगितले की, “सोन्याने भरलेले तूप ‘स्वर्ण भस्म’ म्हणूनही ओळखले जाते. याला आयुर्वेदातील सुवर्ण द्रव म्हणून गौरवले जाते, याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही प्राचीन आयुर्वेदिक रेसिपी फायदेशीर ठरू शकते. पारंपरिक पद्धतीने तूप कढवून पारंपारिक तंत्रांचा वापर करून सोन्यावर काळजीपूर्वक प्रक्रिया करून भस्म बनवावे लागते.”

डॉ जांगडा यांच्या माहितीनुसार, स्वर्ण भस्माचे सेवन अश्वगंधासह केल्यास कामोत्तेजना मिळू शकते त्यामुळे लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. स्वर्ण भस्म दुधासह मिसळल्यास ताकद आणि प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. डोळ्यांचे आरोग्य, मेंदूचे आरोग्य आणि स्मरणशक्तीसाठी सुद्धा याची मदत होऊ शकतो.

हे ही वाचा<< ऑफिसच्या डब्यात ‘हे’ तीन पदार्थ असायलाच हवेत! पोषणतज्ज्ञांनीच सांगितला, काम करताना ऊर्जा वाढवण्याचा सोपा फंडा

स्वर्ण भस्म शुद्ध आहे का कसे ओळखावं?

पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘स्वर्ण भस्म’ शुद्ध असणे आवश्यक आहे. हे ओळखण्यासाठी या टिप्स वापरू शकता. सर्वात आधी तुपात वापरलेले भस्म अत्यंत बारीक असले पाहिजे, त्यात चमक नसावी, कारण भस्म तयार केल्यावर त्याची चमक कमी होते. ते अपरिवर्तनीय देखील असले पाहिजे, म्हणजे भस्माचे रूपांतर धातूमध्येच होऊ शकत नाही. तूप पाण्यात मिसळल्यावर भस्म पाण्यावर तरंगला पाहिजे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayurvedic remedies swarna bhasma all you need to know about gold infused ghee how to identify real ghee with gold power health news svs