तोंडाचे बाह्य रूप छान राहावे म्हणून लोक नाना प्रयत्न करत असतात, पण “तुमच्या तोंडाचे आभ्यन्तर रूपसुद्धा महत्त्वाचं असतं आणि ते आतले स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी तुम्ही काय करता?”  असे विचारले तर प्रश्न ऐकूनच अर्धे लोक गोंधळून जातील. त्यातल्या अर्ध्या लोकांना तर तोंडाचे आभ्यन्तर स्वास्थ्य  म्हणजे काय हेच माहित नसेल. ज्यांना माहित आहे, ते म्हणतील “आम्ही रोज दिवसातून दोन वेळा दात घासतो की!” मौखिक आरोग्य-जतन हे लोकांनी रोजच्या दात घासण्यापुरतेच मर्यादित ठेवले आहे. मुळात आजचा दात घासण्याचा विधी जिथे दातांचे स्वास्थ्य धड सांभाळू शकत नाही, तिथे तोंडामधील जीभ, हिरड्या, गालफडं, लालाग्रंथींची मुखं वगैरे अंगांना त्यांचा लाभ होण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. उलट विविध केमिकल्सनी भरलेल्या आजच्या टूथपेस्ट तोंडामधील या अंगांना इजा करण्याची शक्यता अधिक. आयुर्वेदाने मात्र तोंडामधील विविध अंगांचे  स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी एक विशेष विधी सांगितला आहे,ज्याचे नाव गंडूष.

हेही वाचा >>> Health Special : लहान मुलांना दात येतात तेव्हा काय खायला द्यावं?

GBS Pune, GBS, bacteria , private tankers, pune,
पुणे : १५ ठिकाणी खासगी टँकरच्या पाण्यातच जीवाणू असल्याचे उघड !
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi
अस्सल झणझणीत खानदेशी शेव भाजी, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी
Which schools in Wardha district have water that is dangerous to drink
धोकादायक! ‘या’ शाळांतील पाणी पिण्यास घातक, जीवावर बेतणार…
Gut health expert claims taking 16 spoons of ghee daily keeps
“मी दिवसातून १६ चमचे तूप खातो”, आतड्याच्या आरोग्यतज्ज्ञांनी केला दावा; पण, हे खरंच योग्य आहे का? वाचा, पोषणतज्ज्ञांचे मत…
Nutritionist shares 5 tips to follow for good gut health know Experts opinion
“रोज आवळा खा अन् ताक प्या अन् आतड्यांचे आरोग्य सुधारा; आहारतज्ज्ञांनी सांगितलेले हे ५ खरंच उपयुक्त आहेत का?
do you know Why dogs eat their own poop sometimes expert Answered
श्वान कधीकधी स्वतःची विष्ठा का खातात? तज्ज्ञांनी सांगितले कारण….
toothbrush sanitisation
टूथब्रश साफ करणे खरंच गरजेचं आहे का? तज्ज्ञ काय सांगतात…

सामान्य भाषेमध्ये सांगायचे तर गंडूष म्हणजे गुळण्या. मात्र त्यात काही फरक आहे. एखादा द्रव तोंडामध्ये भरुन घेऊन जेव्हा तो तोंडातल्या तोंडात इथून-तिथे खुळखुळवता येतो, तेव्हा त्याला ‘कवल’ म्हणतात (तोंडामध्ये इकडून तिथे हलवता येतो तो घास म्हणजे कवल) , तर जेव्हा कोणताही द्रव तोंड संपूर्ण भरुन जाईल इतका घेतला जातो की तो तोंडामध्ये हलवता येत नाही, तेव्हा त्या विधीला गंडूष म्हणतात. हे उभय विधी आयुर्वेदाने मुख्यत्वे तोंड व तोंडामधील अंगांचे स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी सांगितले आहेत, जे नित्यनेमाने करणे अपेक्षित आहे. त्यातही हिवाळ्यामध्ये जेव्हा शरीराला अधिकाधिक स्नेहनाची गरज असते, तेव्हा तर रोज गंडूष करणे योग्य.

हेही वाचा >>> वायू प्रदुषणामुळे तुमच्याही डोळ्यांना त्रास होतोय? मग अशाप्रकारे घ्या काळजी, तज्ज्ञ सांगतात…

नित्यनेमाने गंडूष करण्यासाठी काय वापरावे?

नित्यनेमाने गंडूष करायचा झाल्यास तो नेमका कशाने करावा? याचे उत्तर अष्टाङ्गहृदयकार महर्षी वाग्भट देतात ‘तिळ तेल आणि मांसरस’.त्यातही जे वातप्रकृतीचे आहेत व ज्यांना कोरडेपणा वाढल्याचा त्रास होतो, जसे – तोंड कोरडे पडणे, तोंडामध्ये लाळ कमी प्रमाणात स्त्रवणे, हिरड्या-दात, गालफडं ओलसर न राहणे, वगैरे. अशा कोरडेपणा वाढल्याने संभवणार्‍या  समस्या असताना गंडूष करण्यासाठी तीळ तेलाचा उपयोग करावा, तर जे अशक्त, कृश, किडकिडीत शरीराचे आहेत, ज्यांना तोंडामधील जीभ, दात, हिरड्या, गालफडं यांची ताकद वाढवणे आवश्यक वाटते त्यांनी मांसरसाचा उपयोग करावा. वास्तवात वातप्रकृती व्यक्तीच सहसा कृश-किडकिडीत शरीराच्या असतात व त्यांनाच ताकद वाढवण्याची आवश्यकता असते. साहजिकच त्यांनी मांसरस व तीळ तेल यांचा आलटून-पालटून उपयोग करावा.

Story img Loader