तोंडाचे बाह्य रूप छान राहावे म्हणून लोक नाना प्रयत्न करत असतात, पण “तुमच्या तोंडाचे आभ्यन्तर रूपसुद्धा महत्त्वाचं असतं आणि ते आतले स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी तुम्ही काय करता?” असे विचारले तर प्रश्न ऐकूनच अर्धे लोक गोंधळून जातील. त्यातल्या अर्ध्या लोकांना तर तोंडाचे आभ्यन्तर स्वास्थ्य म्हणजे काय हेच माहित नसेल. ज्यांना माहित आहे, ते म्हणतील “आम्ही रोज दिवसातून दोन वेळा दात घासतो की!” मौखिक आरोग्य-जतन हे लोकांनी रोजच्या दात घासण्यापुरतेच मर्यादित ठेवले आहे. मुळात आजचा दात घासण्याचा विधी जिथे दातांचे स्वास्थ्य धड सांभाळू शकत नाही, तिथे तोंडामधील जीभ, हिरड्या, गालफडं, लालाग्रंथींची मुखं वगैरे अंगांना त्यांचा लाभ होण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. उलट विविध केमिकल्सनी भरलेल्या आजच्या टूथपेस्ट तोंडामधील या अंगांना इजा करण्याची शक्यता अधिक. आयुर्वेदाने मात्र तोंडामधील विविध अंगांचे स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी एक विशेष विधी सांगितला आहे,ज्याचे नाव गंडूष.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा