तुम्हाला जर जास्त वाकून बसायची सवय असेल, तर हे वाचा! डिजिटल क्रिएटर शिवम अहलावत यांनी इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. त्यामध्ये दोन खूप सामान्य कारणांचा उल्लेख आहे; जी पाय दुखण्याची लपलेली कारणं असू शकतात. त्यामुळे सायटिका आणि स्कोलिओसिससारख्या मोठ्या समस्याही निर्माण होऊ शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या उदाहरणात, तो उभा असताना सगळं वजन एक पायावर ठेवतो आणि दुसऱ्या उदाहरणात, तो एका टेबलवर हात ठेवून उभा असतो आणि उर्वरित वजन त्याच्या कंबरेवर असतं. या रीलच्या कॅप्शनमध्ये अहलावत यांनी म्हटले, “जेव्हा सगळं काही व्यवस्थित असतं, तेव्हा तुम्हाला ते कळत नाही; पण काही काळानंतर जेव्हा काही समोर येतं, तेव्हा पश्चात्तापाखेरीज काही उरत नाही.”

हेही वाचा… Winter Skincare Routine: हिवाळ्यात ‘या’ तीन गोष्टी करणे टाळा, अन्यथा ठरू शकतात त्वचेसाठी धोकादायक; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत….

अशा दोन प्रकारे उभं राहण्यामुळे सायटिका (sciatica) आणि स्कोलिओसिससारखे (scoliosis) त्रास कसे होऊ शकतात, हे जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने एका आरोग्य तज्ज्ञांशी संवाद साधला आणि आपलं पोश्चर सुधारून यापासून कसे वाचू शकतो हे समजून घेतलं गेलं.

“अयोग्यरीत्या उभं राहणं; जसं की, वजन असमानतेनं बदलणं किंवा जास्त पुढे झुकलेली कंबर यांमुळे सायटिक नर्व्हवर दाब पडतो; ज्यामुळे सायटिकाचा (एक वेदनादायक स्थिती, जी कंबरेपासून पायांपर्यंत वेदना पसरवते) त्रास होऊ शकतो,” असे डॉ. धर्मेश शाह, होलिस्टिका वर्ल्डचे संस्थापक व संचालक म्हणाले.

हेही वाचा… तुम्हालाही बर्फ चघळण्याची सवय आहे? मग ही सवय ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक, तज्ज्ञ सांगतात…

त्यांनी हेही सांगितले की, चुकीचे पोश्चर, विशेषतः एकाच गोष्टीवर जोर देऊन उभे राहण्याची पद्धत स्कोलिओसिस (कंबरेची वाकलेली स्थिती) होण्यास कारणीभूत ठरू शकतात आणि त्यामुळे वेळोवेळी वेगवेगळ्या स्नायूंच्या ताणामुळे स्थिती अजून वाईट होऊ शकते.

सायटिका आणि स्कोलिओसिस म्हणजे काय?

सायटिका म्हणजे एक अशी स्थिती की, ज्यामध्ये सायटिक नर्व्हवर दबाव पडतो किंवा त्या नसवर पडणारा ताण वाढतो आणि त्यामुळे पायांत तीव्र वेदना, मुंग्या किंवा पाय सुन्न होणे यांसारखे त्रास होऊ शकतात. परिणामत: हालचालींवर मर्यादा येऊ शकतात आणि दीर्घकालीन वेदना होऊ शकतात.

स्कोलिओसिस म्हणजे कंबरेची बाजूला वाकलेली स्थिती आणि त्यामुळे पाठ दुखणे, फुप्फुसांची क्षमता कमी होणे आणि पोश्चरच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. गंभीर परिस्थितींमध्ये शस्त्रक्रियेची गरजदेखील पडू शकते.

अशा वेदना टाळण्यासाठी उभे राहण्याचे योग्य उपाय

डॉ. शाह यांनी आपल्या पोश्चरमुळे अतिरिक्त किंवा दीर्घकालीन वेदना होऊ नयेत यासाठी दिलेल्या ४ टिप्स खालीलप्रमाणे :

  • शरीराचे वजन दोन्ही पायांवर समान प्रमाणात ठेवा.
  • कंबरेची स्थिती सरळ ठेवा.
  • तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा, खांदे मागे ठेवा आणि हनुवटी सरळ ठेवा.
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Back pain and leg pain due to incorrect posture can lead sciatica or scoliosis dvr