High Cholesterol & Bad Breath: शरीराला कोलेस्ट्रॉलची गरज आहे हे खरं असलं तरी त्या गरजेची मर्यादा ओलांडली की हेच कोलेस्ट्रॉल शरीराला आजारांचा विळखा घालू शकते. वाढीव कोलेस्ट्रॉलमुळे उद्भवणाऱ्या आजारांपैकी एक मोठा धोका म्हणजे हृदय विकार! कोलेस्ट्रॉल हे हृदयासाठी सायलेंट किलर म्हणूनही ओळखले जाते. कोलेस्ट्रॉलचे अंश एखाद्या चिकट मेणासारखे तुमच्या रक्त वाहिन्यांमध्ये जमा होत असतात.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काही व्यक्ती उच्च कोलेस्ट्रॉलसह अनेक वर्षे जगू शकतात पण काही वेळा अगदी क्षुल्लक आजारातही कोलेस्ट्रॉल वाढलेला असणे ही एक मोठी जोखीम ठरू शकते. हा धोका टाळायचा तर वेळीच योग्य कोलेस्ट्रॉलचे प्रमाण व नियंत्रणात आणण्याची पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहित आहे का केवळ हात- पाय चेहऱ्यावर नव्हे तर आपल्या श्वासातूनही कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत शरीर देत असते.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
4 Essential Tests Every Woman Over 20 Should Do
हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी विसाव्या वर्षापासून प्रत्येक महिलेने कराव्यात ‘या’ चार चाचण्या; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात… –
Which of the raw and pasteurized milk is beneficial
कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…
Coconuts Are Not Allowed On Planes
Coconuts Are Not Allowed On Planes : विमान प्रवासात नारळ घेऊन जाण्यावर का आहे बंदी? वाचा नियम, तोटे अन् तज्ज्ञांचे मत
mayonnaise food poisoning banned
‘या’ राज्याने मेयोनीजवर बंदी का घातली? मेयोनीज शरीरासाठी खरंच घातक आहे का?
Make malpuwa at home
घरच्या घरी ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा मालपुवा; वाचा साहित्य आणि कृती

जर्नल लॅरिन्गोस्कोपमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, वाढणारे कोलेस्ट्रॉल आणि श्वासाची दुर्गंधी यांचा थेट संबंध आहे.अभ्यासात असे म्हटले आहे की तोंडाला येणारी दुर्गंधी हृदयाशी संबंधित समस्यांचे प्रमुख लक्षण असू शकते. हा वास साधारण करपल्यासारखा असू शकतो

२०११- २०१४ मध्ये राष्ट्रीय आरोग्य आणि पोषण परीक्षा सर्वेक्षणाने संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये क्रॉस-विभागीय डेटा संकलित केला होता. यामध्ये ४०- वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ७,४१७ प्रौढांचा अभ्यास केला होता. अभ्यासानुसार सहभागींनी स्ट्रोकच्या वैद्यकीय इतिहासासह रक्तवहिन्यासंबंधीच्या परिस्थितीचा अहवाल दिला. या सर्व प्रौढांमध्ये कोलेस्ट्रॉलच्या उच्च पातळीचे निदान झाले होते व तब्बल ७६ टक्के प्रौढांना तोंडाच्या दुर्गंधीचा त्रास सुद्धा होता.

हे ही वाचा<< किडनी पूर्ण निकामी करू शकतात ‘या’ दोन भाज्या; चुकूनही कच्च्या खाऊ नका, जाणून घ्या शिजवण्याची पद्धत

जर आपल्यालाही तोंडाच्या दुर्गंधीचा वारंवार व विनाकारण त्रास होत असेल तर आपणही वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. याशिवाय आपण काही घरगुती उपायांनी कोलेस्ट्रॉल नियंत्रण व परिणामी तोंडाच्या दुर्गंधीवरही उपाय करू शकता.

  • हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी उच्च फायबरयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट करायला हवेत.
  • कोलेस्ट्रॉलच्या प्लेकची निर्मिती कमी करण्यासाठी हळद गुणकारी सिद्ध होऊ शकते.
  • आवळा हे व्हिटॅमिन सीचे पॉवरहाऊस आहे आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठी त्याचे दररोज सेवन केले पाहिजे.
  • ग्रीन टीमध्ये कॅटेचिन आणि इतर अँटिऑक्सिडंट पदार्थ असतात जे शरीरातील एलडीएल आणि एकूण कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात
  • धुम्रपान व मद्यपान प्रकर्षाने टाळा.