Liver Detox Food: लिव्हर म्हणजेच यकृत हा मानवी शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. खरंतर संपूर्ण शरीर हे ज्या चयापचय क्रियेवर अवलंबून असतं त्याचे काम सांभाळणे ही यकृताची जबाबदारी असते. ज्या प्रमाणे आपलं हृदय सर्क्युलेटरी सेंटर मानले जाते, मेंदू न्यूरॉलॉजिकल केंद्र असतो त्याचप्रमाणे आपले यकृत हे मेटाबॉलिक केंद्र म्हणून ओळखले जाते. जेव्हा आपण शरीरासाठी घातक अशा पदार्थांचा सतत मारा करतो तेव्हा लिव्हरची कार्यक्षमता कमी होऊ लागते. वारंवार मद्यपान करणे, तळलेले पदार्थ खाणे या सवयी अगदी काहीच वर्षांमध्ये लिव्हर निकामी करू शकतात. यकृत हेल्दी ठेवण्यासाठी शरीराला डिटॉक्स करणे खूप महत्त्वाचे असते. आज आपण तज्ज्ञांकडून असेच काही लिव्हर डिटॉक्स करणारे पदार्थ जाणून घेणार आहोत.

एम्सचे माजी सल्लागार व साओल हार्ट सेंटरचे संस्थापक डॉ बिमल झांजेर यांनी लिव्हर डिटॉक्स करणारे काही पदार्थ सांगितले आहेत. याचे सेवन आपण कसे करायला हवे हे पाहुयात..

prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
vidya balan reveals her weight loss struggle in one interview
विद्या बालनने कसं घटवलं वजन? अनुभव सांगत म्हणाली, “मी जितका व्यायाम केला तितकी जास्त जाड…”
sanjay bangar son gender transformation
आर्यन झाला अनाया: क्रिकेटर संजय बांगर यांच्या मुलाने केलेली ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी’ची प्रक्रिया कशी होते? त्याचे दुष्परिणाम काय?
Moringa or drumstick
Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी

लिव्हर डिटॉक्ससाठी कोणत्या भाज्या खाव्यात?

खरंतर सर्वच पालेभाज्या या लिव्हरसहित संपूर्ण शरीराचे डिटिक्स करण्यासाठी उपयुक्त असतात पण पालक, मेथीचे सेवन हे रक्तातील कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी करण्यास मदत करते. या भाज्या शक्यतो अन्य मसाल्यांशिवाय खाल्ल्यास अधिक फायदा होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो पालेभाजी बनवताना लसूण व जिऱ्याची साधी फोडणी द्यावी. याशिवाय ब्रोकोली, कोबी व फ्लॉवरचे सेवन सुद्धा लिव्हरचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

लिव्हर डिटॉक्ससाठी चहा..

अनेकांना दिवसातून किमान दोन वेळा चहा प्यायची इच्छा होतेच. अशावेळी आपण चहाला पर्यायी ग्रीन टी किंवा हर्बल टीचे सेवन करू शकता. किमान दिवसातून एकदा तरी शरीराला ही सवय लावा. यामुळे केवळ लिव्हरच नाही तर अन्य अवयव सुद्धा सुदृढ राहण्यास मोठी मदत होऊ शकते. अशा प्रकारचा चहा हा शरीरातील अनावश्यक फॅट्स विरघळून लघवी व शौचावाटे शरीराच्या बाहेर काढतो. परिणामी फॅटी लिव्हरचा धोका सुद्धा कमी होण्यास मदत होते.

लसूण (Garlic For Liver Detox)

लसणामध्ये अनेक औषधीय गुणसत्व असतात. विशेषतः लसणातील सेलेनियम व अँटी ऑक्सिडंट्समुळे लिव्हरमधील टॉक्सिन्स शरीरातून बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. फार नाही तर निदान दिवसातून एक- दोन लसणा जेवणात समाविष्ट करू शकता.

हे ही वाचा<< चेहऱ्यावरून ओळखा शरीरात कोलेस्ट्रॉल कमी आहे की जास्त? शरीराचे ‘हे’ संकेत ओळखा; करा ‘हे’ ५ उपाय

हळद (Turmeric For Liver Detox)

लिव्हरच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी हळदीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. लिव्हरला सूज येण्यासाठी कारण ठरलेल्या मॉलिक्यूलला कमी करण्यासाठी हळदीचे अँटी इंफ्लेमेटरी सत्व कामी येतात. हळदीतील करक्यूमोनोएड्स नामक सत्व लिव्हरला सुदृढ ठेवतात. हळदीचे गरम पाणी किंवा दुधातून सेवन करू शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)