Bad Cholesterol Reducing Vegetables: शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिल्यास बहुतांश आजार आपल्यापासून चार हात लांबच राहण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉलहे शरीराच्या मेटाबॉलिज्मसाठी तसेच हार्मोन्स निर्मितीसाठी आवश्यक असते पण त्याचे प्रमाण गरजेहुन अधिक वाढल्यास शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ब्लड प्रेशर, रक्तातील साखर वाढणे असे अनेक त्रास या एकट्या कोलेस्ट्रॉलमुळे वाढीस लागू शकतात. याशिवाय किडनी, लिव्हर, पॅनक्रियाज या अवयवांना सुद्धा कोलेस्ट्रॉल घातक ठरू शकते. एक चांगली गोष्ट म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करणे हे ही आपल्याच हातात आहे. तुम्ही आहारात काही गोष्टींचा नियमित समावेश करूनही कोलेस्ट्रॉल कमी करू शकता, असाच एक मॅजिक पदार्थ म्हणजे भेंडीची भाजी.
भेंडी ही केवळ कोलेस्ट्रॉलसाठीच नाही तर मधुमेहींसाठी सुद्धा चांगली आहे. भेंडीची भाजी फायबरचा समृद्ध स्रोत आहे. यामुळे शरीराला सतत भूक लागले कमी होते. परिणामी साखरेचे सेवन सुद्धा मर्यादित होते. फायबर मुबलक प्रमाणात असल्याने पचनप्रक्रिया सुद्धा सुरळीत होते. यामुळे आतड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल व साखरेचे शोषण नियंत्रणात राहते.
जर्नल ऑफ फार्मसी अँड बायो अलाईड सायन्सेसमध्ये प्रकाशित २०११ च्या अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की, मधुमेह असणाऱ्या उंदरांना, वाळलेल्या भेंडीच्या साली आणि बिया खाल्ल्याने त्यांच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत घट झाल्याचे दिसून आले.
आहारतज्ज्ञ शालिनी गार्विन ब्लिस, मणिपाल हॉस्पिटल, व दीप्ती खातुजा, क्लिनिकल न्यूट्रिशनच्या प्रमुख, यांनी भेंडीचे सेवन करण्याचे फायदे आणि ते खाण्याची पद्धत स्पष्ट केली आहे.
भेंडी रक्तातील साखरेची पातळी कशी स्थिर करते?
प्रत्येकी १०० ग्रॅम भेंडींमध्ये ४ ग्रॅम फायबर्स असतात. ज्यांना पचण्यासाठी लागणारा वेळ अधिक असतो परिणामी रक्तामध्ये साखर शोषून घेण्याचा वेळ वाढतो. भेंडीमध्ये फायटोकेमिकल्स, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, लिनोलिक अॅसिड, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, प्रोटीन आणि फोलेट यांसारख्या इतर पोषक तत्वांचा मुबलक साठा असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियमित राहण्यास मदत होते. भेंडीचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असतो ज्यामुळे रक्तप्रवाहातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. भेंडीमध्ये कॅलरीज कमी असतात ज्यामुळे वजन नियंत्रणात मदत होते.
हे ही वाचा<< चेहऱ्यावरून ओळखा शरीरात कोलेस्ट्रॉल कमी आहे की जास्त? शरीराचे ‘हे’ संकेत ओळखा; करा ‘हे’ ५ उपाय
भेंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कसे कमी होते?
भेंडीमध्ये असणाऱ्या पेक्टिन एन्झाइममुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसेच आवश्यक आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढून हृदयाचे आरोग्य सुरक्षित होते. भेंडीमुळे कॅन्सरचा धोका कमी होतो तसेच हे अॅनिमियाला सुद्धा प्रतिबंधित करते. भेंडीचे चिकटपणामुळे यकृतातील विषारी पदार्थ व पित्त/आम्ल बाहेर पडते.
हे ही वाचा<< शौचावाटे लिव्हरमधील फॅट्स झपाट्याने काढून टाकतात ‘हे’ ५ पदार्थ? तज्ज्ञांनी सांगितली डिटॉक्सची पद्धत
भेंडीचे सेवन कसे करावे?
भेंडीचा चिकटपणा अनेकांना आवडत नाही यासाठी आपण भेंडीचे काप करून हलके तळून घेऊ शकता. डाळ व सूपमध्ये भेंडी टाकून सुद्धा खाता येते. भेंडीच्या शेंगांमध्ये असलेले जाड पातळ पॉलिसेकेराइड सूप आणि स्ट्यू घट्ट करण्यासाठी वापरले जाते. भेंडीची पाने सॅलड, भाज्या आणि लापशी तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.