काही व्यक्तींना खूप जास्त घाम येतो. काही प्रमाणात घाम येणे हे शरीरासाठी चांगले असते. कारण जेव्हा शरीराची हालचाल होते तेव्हा घाम येतो आणि जितकी जास्त हालचाल होईल तितकी आरोग्यासाठी चांगली असते. व्यायाम केल्यानंतर किंवा उन्हात फिरल्यानंतर घाम येणे नैसर्गिक आहे. उन्हाळ्यात उष्णतेमुळे घामाचे प्रमाण वाढू शकते. पण काही जणांच्या बाबतीत असे आढळते की त्यांच्या घामातून दुर्गंध येत आहे. घामातून येणारी ही दुर्गंधी गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. कोणते आहेत ते आजार जाणून घ्या.
मधूमेह
घाम प्रत्येक व्यक्तीला येतो पण जर घामातून खूप दुर्गंध येत असेल तर ते मधूमेहाचे लक्षण असू शकते. मधूमेह झालेल्या रुग्णांच्या शरीरात इन्सुलिनची निर्मिती हवी तितक्या प्रमाणात होत नाही किंवा उपलब्ध असणाऱ्या इन्सुलिनचा योग्यरित्या वापर होत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते आणि घामातून दुर्गंधी येऊ शकते.
आणखी वाचा : वाटाणे खाणे ‘या’ आजारांवर ठरते गुणकारी; शरीराला मिळतात भरपूर फायदे
जेवणात जंक फूडचा समावेश
आपण जे अन्नपदार्थ खातो त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. आजकाल प्रत्येकाच्या जीवनात जंक फूडचा समावेश हा असतोच. असे खूप मसाले असणारे पदार्थ खाल्ल्याने घामातून दुर्गंधी येऊ शकते. जर तुम्हाला ही समस्या सतवात असेल तर आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
थायरॉइड
थायरॉइड अति सक्रिय म्हणजेच ओवर ऍक्टिव्ह झाल्यास त्यामुळे खूप घाम येऊ शकतो. तसेच घामातून दुर्गंधी येऊ शकते.
विविध आजारांवरील गोळ्या
अनेकांच्या वेगवेगळ्या आजारांवरील गोळ्या सुरू असतात उदा. उच्च रक्तदाब. या गोळ्यांमुळे आरोग्याला फायदा मिळतो पण त्यामुळे शरीराच्या वासावर परिणाम होऊ शकतो. अशा गोळ्यांमुळे घामातून दुर्गंधी येऊ शकते.
तणाव
ज्या व्यक्तींना तणाव आणि अँगझायटीचा त्रास असतो त्या व्यक्तींना खूप घाम येतो. तसेच त्यांच्या घामातून दुर्गंधीही येते. यासाठी तणावमुक्त होण्याचा प्रयत्न करा.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)