त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, परंतु त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि तिचे काळजी घेणं अनेकांना अवघड वाटते. त्याचे कारण म्हणजे आपण त्वचेसाठी नेहमी बाह्य स्किनकेअर उत्पादनांवर अवलंबून राहतो. मात्र, आपण आपली त्वचा सुंदर आणि मुलायम ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे अनेक स्किनकेअर उत्पादनांचा वापर करतो. त्याऐवजी जर आपण आपल्या आहारात योग्य बदल केला तरी आपली त्वचा उजळू शकते. नितळ आणि चेहरा चमकदार दिसावा यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत.
सुंदर त्वचेसाठी 3 आवश्यक गोष्टी –
वनस्पती प्रथिने –
त्वचा सुंदर आणि मुलायम ठेवण्यासाठी फळे खाणे अत्यंत आवश्यक आहे. तसंच अनेक वनस्पतींमधून मिळणारी प्रथिने आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. त्याचप्रमाणे ती त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठीही खूप फायदेशीर मानली जातात. वनस्पतीमधील प्रथिने आपल्या शरीरातील हार्मोन्स संतुलित करून त्वचेसाठी चांगले कार्य करतात. याशिवाय तुमच्या झोपण्याची वेळ आणि झोप किती वेळ होते याचा देखील तुमच्या त्वचेवर आणि केसांवर परीणाम होतो.
हेही वाचा- दररोज २ सफरचंद खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात कमी होईल? सेवनाची पद्धत एकदा जाणून घ्या
आपल्या शरीराच्या नैसर्गिक केराटिन निर्माण करण्यास चालना देणारी अमीनो ऍसिड आणि या प्रक्रियेस मदत करणारी विशिष्ट जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले प्रथिनेयुक्त पदार्थ खाऊन आपण वनस्पती प्रथिने मिळवू शकतो. यासाठी भोपळा, रताळे, शेंगा आणि कच्चे गाजर अशा भाज्यांचा आहारात समावेश करु शकता. शिवाय तुम्ही विश्वासार्ह ब्रँडच्या सप्लिमेंट्सद्वारे देखील वनस्पती-आधारित प्रथिने मिळवू शकतो.
कोलेजन –
Collagen हे शरीरात आढळणारे सर्वात मुबलक प्रथिने म्हणून ओळखले जाते. ते त्वचेची याग्य निगा राखण्यात महत्वाची भूमिका बजावते. कोलेजेनच्या निर्मिती आणि ऱ्हास होण्यातील संतुलन बिघडल्याने त्वचेवर सुरकुत्या तयार होतात. कोलेजनचा ऱ्हास होण्याची प्रक्रिया खराब आहार आणि जास्त सूर्यप्रकाशामुळे होते. कोलेजन त्वचेचे वृद्धत्व कमी करण्यास मदत करते. आपल्या शरीरातील कोलेजनचे प्रमाण वयोमानानुसार कमी होत असल्याने, विविध स्त्रोतांद्वारे त्याचे आउटसोर्सिंग करणे महत्वाचे आहे. कोलेजन आज अनेक स्वरूपात उपलब्ध आहे. जे गोळ्या, पावडर, जेल इ. मधून ते आपणाला मिळू शकते.
ग्लुटाथिओन –
Glutathione, हा त्वचेला सर्वात जास्त उजळ करणारा घटक मानला जातो. त्याचे कमी आण्विक वजन थिओल-ट्रिपेप्टाइड इंट्रासेल्युलर रेडॉक्स संतुलन (intracellular redox balance) राखण्यात प्रमुख भूमिका बजावते. त्याच्या उल्लेखनीय अँटिऑक्सिडंट गुणधर्मांव्यतिरिक्त, त्वचा उजळ करण्याच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देण्याची त्याची क्षमतेसाठी ते प्रसिद्ध असून तो त्वचेसाठीचा एक आवश्यक घटक आहे. अनेक स्किनकेअर उत्पादनांमध्ये ग्लुटाथिओन आढळते. शिवाय अॅव्होकॅडो, अक्रोड, संत्री, शतावरी आणि टोमॅटोसारखे सामान्य खाद्यपदार्थ शरीरात ग्लूटाथिओनची पातळी वाढवण्यास मदत करतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, त्वचेसंदर्भातील अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)