Potato Face Pack Benefits : थंडीच्या दिवसांत आपल्याला त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण- या हंगामात त्वचा खूप कोरडी होते. तसेच चेहऱ्यावर पिंपल्स, सुरकुत्या, काळ्या डागांची समस्या वाढते. फक्त हिवाळ्यातच नाही, तर इतर ऋतूंमध्येही अनेकांना या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी चेहऱ्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी अनेक जण झटपट उपाय शोधत असतात. असे बरेचसे उपाय इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यातील एक उपाय म्हणजे बटाट्याचा फेस पॅक. या फेस पॅकने त्वचेच्या समस्या दूर होतात, अशी माहिती देणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. पण, बटाट्याच्या फेस पॅकने खरेच चेहऱ्यावरील काळे डाग, मुरमे, सुरकुत्या दूर होतात का? याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्वचारोग तज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
सध्या इन्स्टाग्रामवरील ब्युटी ब्लॉगर शालिनी यांनी बटाट्यापासून बनविलेल्या फेस पॅकविषयी माहिती दिली आहे. या बटाट्याच्या फेस पॅकमध्ये मुलतानी माती, लिंबाच्या रसाचे काही थेंब व अॅलोव्हेरा जेल अशा गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. हा फेस पॅक वापरल्याने चेहऱ्याची चमक वाढते, तसेच मुरमांची समस्या कमी होते, असे त्यांनी सांगितले आहे.
यात त्यांनी हा फेस पॅक कशा प्रकारे वापरायचा याविषयी सांगितले आहे. तुम्ही ब्रश किंवा कापसाच्या साह्याने हा पॅक चेहऱ्यावर लावा. त्यानंतर १५ मिनिटे तो तसाच राहू द्या आणि मग धुऊन टाका.
बटाट्याच्या फेस पॅकबाबत त्वचारोग तज्ज्ञांचे मत काय?
बटाट्यापासून तयार केलेला फेस पॅक स्किनकेअर रूटीनमधील लोकप्रिय उपाय आहे. त्यामुळे काळे डाग, मुरमे, सुरकुत्या अशा समस्या कमी होत असल्या तरी व्यक्तिपरत्वे याचा प्रभाव भिन्न असू शकतो.
बटाट्यामध्ये जीवनसत्त्व ‘क’चे प्रमाण जास्त असते; ज्यामुळे त्वचा उजळते आणि काळे डाग कमी होण्यास मदत होते. त्याव्यतिरिक्त बटाट्यांमधील नैसर्गिक एन्झाइम्समध्ये सॉफ्ट एक्सफोलिएटिंग गुणधर्म असू शकतात; ज्यामुळे सेल टर्नओव्हरला चालना देणे आणि मुरमांची समस्या दूर होण्यास मदत होते, असे द एस्थेटिक क्लिनिकच्या कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट व डर्मेटो सर्जन डॉ. रिंकी कपूर यांनी सांगितले आहे.
दररोज नारळाच्या पाण्यात ‘हा’ पदार्थ टाकून प्या; वाढत्या वजनासह बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर?
डर्मेटोलॉजिस्ट-ट्रायकोलॉजिस्ट-कॉस्मेटोलॉजिस्ट, लेझर स्पेशलिस्ट आणि स्कुची सुपर क्लिनिक डॉ. मेघना मौर यांनी सांगितले की, बटाटा त्वचा उजळ करणाऱ्या घटकांपैकी एक नैसर्गिक स्रोत आहे. जसे की, पोटॅशियम, जीवनसत्त्व क, कॅटेकोलेस एंझाइम व अझलेइक अॅसिड. पण, बटाट्याच्या फेस पॅकचा तुम्ही नियमितपणे चेहऱ्यावर वापर केल्यास काळे डाग, हायपरपिग्मेंटेशन, फ्रिकल्स व टॅनिंग कमी करू शकतात. त्याव्यतिरिक्त डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासही मदत होऊ शकते.
एक स्वतंत्र, पण पूरक उपाय म्हणून बटाट्याचा फेस पॅक वापरणे फायदेशीर ठरू शकते. काळे डाग आणि मुरमांची समस्या कमी करण्यासाठी बऱ्याचदा बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक असतो; ज्यामध्ये नियमितपणे स्किनकेअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे. तसेच योग्य स्वच्छता राखून, आवश्यक असल्यास आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असेही डॉ. कपूर म्हणाल्या.
परंतु, तुम्ही बटाट्याचा फेस पॅक वापरणार असाल, तर आधी तो तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे का, यामुळे तुमच्या त्वचेला काही त्रास तर होणार नाही ना याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे कोणतीही संभाव्य अॅलर्जी किंवा कोणत्याही प्रकारच्या अॅलर्जीपासून स्वत:ला आणि इतर कोणालाही वाचवण्यासाठी पॅच टेस्ट करा, तसेच योग्य आणि फायदेशीर स्किनकेअर रुटीनची गरज असेल, तर त्वचारोग तज्ज्ञांशी संपर्क करा. कारण- ते त्वचेशी संबंधित विशिष्ट समस्यांचे निकारण करण्याबरोबरच तुमच्या त्वचेचा प्रकार, इतिहास आणि तुमच्या समस्यांची तीव्रता या आधारे तुम्हाला वैयक्तिक सल्ला देऊ शकतात, असे डॉ. कपूर म्हणाल्या.