Benefits Of 100 Gram Chavali or Black Eyes Peas: वजन कमी करायचं असो किंवा रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवायचं असो, फॅन्सी दिसणाऱ्या व बेचव भाज्याच खाव्या लागतील असा एक गैरसमज अलीकडे निर्माण झाला आहे. पण खरं सांगायचं तर वजन, डायबिटीज ते अगदी हाडांच्या आरोग्यासाठी सुद्धा आपल्या पारंपरिक भाज्या उत्तम प्रभाव दाखवू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर कडधान्यांचा भाग असलेली चवळी, ज्याला इंग्रजीमध्ये ब्लॅक आय पीज असे म्हटले जाते ही भाजी चवीला आणि आरोग्याला खूप फायदे देऊ शकते. पूर्वी गावाकडच्या लग्नांमध्ये बसणारी पंगत या चवळी-बटाट्याच्या भाजीशिवाय अपूर्णच असायची. आज आपण अवघ्या १०० ग्रॅम चवळीचे सुद्धा तुमच्या आरोग्याला मिळू शकणारे फायदे जाणून घेणार आहोत. ज्यामुळे पुढच्या वेळी किराणा सामानाच्या यादीत किंवा गावावरून येताना तुम्ही हे कडधान्य आणल्याशिवाय राहणार नाही.

एकता सिंघवाल, आहारतज्ज्ञ, उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स यांनी इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना, चवळीच्या जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरच्या साठ्याविषयी माहिती देत १०० ग्रॅम चवळीचे आरोग्याला मिळणारे संभाव्य फायदे नमूद केले आहेत.

A glass of milk a day could help keep bowel cancer away
Milk: रोज एक ग्लास दूध प्यायल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो का? वाचा काय सांगतात डॉक्टर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Amla kadha benefits
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा खरंच फायदेशीर आहे का?
सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
Makar sankranti 2025 special bhogi bhaji recipe in marathi and health benefits everyone should know
“भोगीची भाजी” एकदम चमचमीत आणि पारंपारिक रेसिपी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
Special Makar Sankranti Ukhane in Marathi
Makar Sankranti Ukhane : महिलांनो, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या एकापेक्षा एक हटके उखाणे, एकदा लिस्ट पाहाच

१०० ग्रॅम चवळीच्या भाजीत दडलंय काय?

  • कॅलरी: १२०
  • कार्ब्स : २१.४५ ग्रॅम
  • फायबर: ६.७ ग्रॅम
  • साखर: ४.४ ग्रॅम
  • प्रथिने: ८.३ ग्रॅम
  • चरबी: ०.९ ग्रॅम
  • व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स (B1, B2, B3 आणि B5 सह)
  • कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, मँगनीज
  • अँटिऑक्सिडंट्स: चवळीमध्ये पॉलिफेनॉल, फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिनसह विविध अँटिऑक्सिडंट्स असतात, जे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात.

चवळीचे आरोग्याला काय फायदे आहेत? (Benefits Of Chavali)

  • हृदयाचे आरोग्य: चवळीमध्ये फायबरचा मोठा साठा असतो ज्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. याव्यतिरिक्त, त्यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.
  • पाचक आरोग्य: चवळीमधील फायबर निरोगी पचनास प्रोत्साहन देते, बद्धकोष्ठता कमी करून आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
  • वजन नियंत्रण : चवळीत चरबी आणि कॅलरी कमी असतात परंतु प्रथिने आणि फायबर जास्त असतात, ज्यामुळे चवळी खाल्ल्यावर बराच वेळ पोट भरल्याची जाणीव राहते, यामुळे वारंवार विनाकारण खाणे कमी होऊन वजन नियंत्रणाच्या प्रवासात मदत होऊ शकते.
  • रक्तातील साखरेचे नियंत्रण: चवळीमध्ये असणारे विरघळणारे फायबर साखरेचे शोषण कमी करते, रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास आणि अचानक होणारी वाढ टाळण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी चवळी फायदेशीर ठरते.
  • हाडांचे आरोग्य: चवळीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात, जी मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

मधुमेह असल्यास चवळी खावी का? (Can Diabetes Patient Eat Chavali)

सिंघवाल सांगतात की, मधुमेह असलेल्या व्यक्ती संतुलित आहाराचा भाग म्हणून चवळीचे सेवन करू शकतात. यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि उच्च फायबर असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.

गर्भवती महिलांसाठी चवळी सुरक्षित आहे का? (Can Pregnant Women Eat Chavali)

प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांसह उच्च पौष्टिक मूल्यांमुळे गर्भवती महिलांसाठी चवळी फायदेशीर ठरू शकते. पण, गर्भवती महिलांनी आजारांचा धोका टाळण्यासाठी चवळी पूर्णपणे शिजवल्याशिवाय खाऊ नये.

चवळीची भाजी खाताना ‘या’ गोष्टींचे असुद्या भान!

१) तुम्हाला या भाजीची ऍलर्जी आहे का हे ओळखा. यासाठी भाजी खाल्ल्यावर सदृश्य व अदृश्य बदलांकडे बारकाईने लक्ष द्या. काहींना त्वचेवर प्रतिक्रिया दिसू शकतात किंवा काहींना ऍसिडिटी होऊ शकते, हे बदल नीट तपासा.

२)इतर सर्व पदार्थांप्रमाणेच पोर्शन कंट्रोलचा नियम चवळीला सुद्धा लागू होतो. प्रमाणात सेवन करा.

हे ही वाचा<<दिवसभरात बटाटा, पोळ्या, भात व साखरेच्या रूपातील कार्ब्स किती प्रमाणात खावं? प्रमाण वाढताच ‘हे’ त्रास वर काढतात डोकं

३)अनेकदा चवळीच्या गटातील भाज्यांमुळे ऑक्सलेट वाढून मुतखडा होण्याची भीती असते पण हे पूर्ण सत्य नाही. आपण संतुलित आहाराचा भाग म्हणून चवळी खाल्ल्यास आपल्याला त्रास होण्याची शक्यता कमी असते. तरीही गरज भासल्यास आपण आपल्या वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा करून तुमच्या शरीराला साजेसा निर्णय घेऊ शकता.

Story img Loader