दिवाळीची चाहूल लागली तसेच आणखी एका गोष्टीची चाहूल लागते ती म्हणजे हिवाळ्याची आणि याच हिवाळ्याच्या दरम्यान आपल्या घरामध्ये सूप किंवा भाज्यांचे सूप खाणाऱ्यांची-पिणाऱ्यांची संख्या वाढू लागते. आपण आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूप्सचे प्रमाण वाढवणे खरंच आवश्यक आहे का ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूप प्यायल्यामुळे फायदे होतात का ?याबद्दल आजच्या लेखात थोडेसे. कोणत्याही भाज्यांचा अर्क काढणं म्हटलं की त्यातला थोडासा त्यातल्या पाच ते दहा टक्के जीवनसत्व आणि पोषणमूल्य प्रमाण कमी होतं. तुम्ही दिवसातून किमान एकदा तुमच्या आहारात समाविष्ट केलेत तर यातून होणारे फायदे अनेक आहेत एक तर सूप हे पचायला अत्यंत हलकं असतं, दुसरं म्हणजे त्यातील मिठाचं प्रमाण अतिशय कमी असतं तिसरं म्हणजे तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात आर्द्रता देऊन योग्य प्रमाणात जीवनसत्वे देण्याची कला. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाज्यातील तंतुमय पदार्थ तुमच्या शरीराला मुबलक प्रमाणात पोहोचवण्याचं काम सुप करू शकते एका वेळेला योग्य प्रमाणात भूक भागवणे आणि पोटाचे विकार असल्यास ते कमी करून किंवा पोटाला कोणताही त्रास न होता पचण्यास हलके म्हणून सुख हे अत्यंत महत्त्वाचे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : झटपट वजन कमी करण्यासाठी ग्रीन कॉफी खरंच फायदेशीर? एक्सपर्टनी दिलं उत्तर…

सूप या शब्दाचा संस्कृत अपभ्रंश सु म्हणजेच सकस आणि प म्हणजेच पोषक आहे. त्यामुळे सूप तुमच्या आहारात असणं सकस आणि पोषक आहे. त्यातील भाज्यांचे प्रमाण त्याची घनता याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कोणत्याही फळभाजीचे सूप बनवताना ती कडू तर झालेली नाही ना याकडे लक्ष देणं आवश्यक आहे .कोणतीही भाजी कुकरला शिजवून घेऊ त्यानंतर तसेच सूप तयार करताना त्याला खूप वेळ ब्लेंड करू नये किंवा खूप वेळ ग्राइंड करून किंवा खूप वेळ मिक्सरमध्ये फिरवू नये त्यातून त्याच्या सगळ्या पोषक तत्वांचा ऱ्हास होतो. हिवाळा जवळ आलेला असताना दुधीचं सूप, भोपळ्याचं सूप, फ्लॉवरचे सूप, कोबी सूप यांसारखे सूप तुमच्या आहारात नियमितपणे समाविष्ट केल्यास तुमची भूक तर भागतेच आणि तुम्हाला भुकेचा नेमका अंदाज यायला देखील मदत होते. ज्यांना काही भाज्या आवडत नाहीत त्यांच्यासाठी मिश्र भाज्यांचे सूप हा अतिशय उपयुक्त प्रकार आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पचनासाठी हलकं होण्यासाठी लहानांपासून ते थोरांपर्यंत सूप हा अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे. ज्यांना श्वसनाचे विकार आहेत किंवा दातांचे विकार आहेत त्यांच्यासाठी सूप अत्यंत उपयुक्त आहे. फॉस्फरस, पोटॅशियम यांसारख्या खनिजांची भरपूर असणारे सूप रक्त दाब, दमा असणाऱ्यांवर साठी औषधासमान आहे.

तोंडाला चव नसणे, भूक मंदावणे अशा विकारांवर सूप उपायकारक आहे.
विशेषतः मांसाहार करणार्‍यांसाठी चिकन सूप , पाया सूप अत्यंत गुणकारक आहे.
हाडांची घनता वाढवणे. भुकेच्या संप्रेरकांचा योग्य समतोल साधून भूक मंदावली असेल तर त्याला उत्तम प्रेरणा देणं.
झोपेचे नियोजन करणे, शरीराची झीज भरून काढणे यासारख्या गोष्टी करण्यासाठी भाज्या किंवा फळांची सूप अत्यंत उपयुक्त असते.
कोणतेही सूप तयार करताना प्रथम भाजी स्वच्छ धुऊन घेणे आणि त्यानंतर ती थोडावेळ चिरून ठेवणे किंवा त्याला हलके मिठाच्या पाण्यात ठेवणे हे फार महत्त्वाचे असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूप खूप जास्त वेळ मिक्सरला ग्राइंड न करणे.

हेही वाचा : Mental Health Special: कस्टमर केअर नंबरवरुन फ्रॉड्स कसे होतात? काय काळजी घ्यावी?

सूप मंद आचेवर करावे आणि खूप जास्त आज ठेवून सूप शिजवू नये. शक्यतो सूप तयार करताना त्यावर झाकण ठेवणे अतिशय आवश्यक असते. फळभाज्यांचे सूप केल्यास त्यामध्ये जास्तीत जास्त पोषण तत्त्वांचे प्रमाण राहते. पालेभाज्यांचे सूप करताना त्याच्यामध्ये विविध फळभाज्या एकत्र करून तसेच सूप करावे तर ते जास्तीत जास्त उपयुक्त होते. मटार कडधान्य किंवा बेसन यासारख्या पिष्टमय पदार्थांचा थोडासा वापर सूप तयार करताना नक्की करावा. या हिवाळ्यामध्ये कंदमुळांचे प्रमाण बाजारात भरपूर असते त्यामुळे जर तुम्ही सूप तयार करत असाल तर त्याच्यामध्ये थोडसं कंदमुळे किसून टाकल्यास तुमच्या सुपाला उत्तम घनता येऊ शकते आणि ते पचायला देखील आणखी हलके होऊ शकते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits of drinking different types of soups in winter hldc css
Show comments