तुळशीमध्ये औषधी गुण असतात, त्यामुळे ती विविध आजारांवर फायदेशीर ठरू शकते. तुळस रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यात मदत करते. ती जीवनसत्व क आणि झिंकचे मोठे स्त्रोत आहे. हे पोषक घटक शरीराला निरोगी ठेवण्यात मदत करतात. तुळशीचे पान खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. तुळशीची ४ पाने रोज खाल्ल्याने कोणते फायदे मिळतात? याबाबत जाणून घेऊया.
१) बद्धकोष्ठता दूर करते
तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते. उपाशी पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पचन क्रिया देखील सुधारू शकते. तुळशीच्या सेवनाने अतिसारापासून देखील आराम मिळू शकते.
(नाक बंद झाले? ‘हे’ ४ घरगुती उपाय ठरू शकतात फायदेशीर)
२) हाडे बळकट करू शकते
तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशियम आणि फोलेट सारखे पोषक तत्व असतात जे हाडांना मजबूत करण्यासाठी मदत करतात. तुळशीच्या ४ पानांचे रोज सेवन केल्याने हाडे बळकट होण्यात मदत होऊ शकते.
३) सर्दी खोकल्यावर गुणकारी
हिवाळ्यात सर्दी खोकल्याची समस्या वाढते. या समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांपासून बनवलेला चहा किंवा काढ्याचे सेवन करू शकता. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.
४) हृदयविकारांपासून देऊ शकते सुरक्षा
हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुळस उपयुक्त ठरू शकते. तुळशीत अँटि-ऑक्सिडेंट असतात जे फ्री रॅडिकल्सपासून होणारे नुकसान टाळतात. उपाशीपोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने हृदयासंबंधी समस्यांपासून आराम मिळू शकते.
(निट झोप येत नाही? खाण्यापिण्याच्या ‘या’ सवयी असू शकतात जबाबदार, तज्ज्ञांनी सांगितला उपाय)
५) ताण दूर करू शकते
व्यस्त जीवनशैली आणि वाढलेल्या कामामुळे अनेक लोक तणावात असतात. तुळस चिंता आणि ताण दूर करण्यात मदत करू शकते. उपाशीपोटी तुळशीच्या सेवनाने तणावापासून आराम मिळू शकते.
६) श्वासाची दुर्गंधी
श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुळशीच्या पानांची मदत होऊ शकते. तुळशीचे सेवन केल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होऊ शकते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)