Monsoon Food & Health: पावसाळ्याचा गारवा जसा मनाला सुखावतो तसाच ऋतूबदलाने आजारांचा धोकाही वाढतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी या काळात निरोगी आहार महत्त्वपूर्ण असतो. या पावसाळ्यात तुम्हाला शरीर रोगमुक्त ठेवण्यास मदत करू शकणारे विशिष्ट पदार्थ व सेवनाची पद्धत अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

लिंबूवर्गीय फळे

मोसंबी, लिंबू आणि द्राक्षे यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. शिवाय हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकते. व्हिटॅमिन सी संसर्गाशी लढण्यास मदत करते आणि पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढवते, जे रोगप्रतिकारक संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण आहे. या फळांचे नियमित सेवन केल्यास सर्दी, फ्लू आणि व्हायरल इन्फेक्शन यांसारख्या पावसाळ्यातील सामान्य आजारांपासून संरक्षण मिळू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिटॅमिन सी तुमच्या शरीराला लोह शोषून घेण्यास मदत करते आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते.

health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Special Makar Sankranti Ukhane in Marathi
Makar Sankranti Ukhane : महिलांनो, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या एकापेक्षा एक हटके उखाणे, एकदा लिस्ट पाहाच
tribal students protest nashik
नाशिक : निकृष्ट भोजन निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन
Does Onion Juice really work for Stomach Aches
पोटदुखीपासून आराम मिळण्यासाठी खरंच कांद्याचा रस फायद्याचा आहे का? कुशा कपिलाने सांगितला वैयक्तिक अनुभव; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात?
Meal Plan For Winter
Meal Plan For Winter : सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत… थंडीत तुम्ही कसा आहार घेतला पाहिजे? वाचा, ‘ही’ आहारतज्ज्ञांनी दिलेली यादी
Here’s what happens to the body if you have ghee water on an empty stomach daily
Ghee: झोपेतून उठताच एक चमचा तुपाचे सेवन करण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क; खाण्याची पद्धतही नीट वाचा
Amla Water Benefits
सकाळीच नाही रात्रीदेखील आवळा खाण्याचे अनेक फायदे; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, मेथी यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. या भाज्या फोलेट आणि लोहाचे उत्तम स्रोत आहेत, जे निरोगी रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी आवश्यक आहेत. या भाज्या डिटॉक्सिफिकेशन आणि पचन सुधारण्यास देखील मदत करतात, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शनचा धोका कमी करतात. आपल्या आहारात विविध प्रकारच्या पालेभाज्यांचा समावेश केल्याने पावसाळ्यात वाढणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळू शकते. दरम्यान, पावसाळ्यात पालेभाज्या अळ्या व दूषित पाण्यामुळे रोगांचा धोका वाढवू शकतात त्यामुळे सेवन करण्यापूर्वी त्या पूर्णपणे धुवून वाफवून घ्या.

लसूण

लसणात प्रतिजैविक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे ऍलिसिन नावाचे एक संयुग असते. लसणाचे नियमित सेवन केल्याने पावसाळ्यात होणार्‍या सामान्य सर्दी आणि खोकल्यासह श्वसनाच्या संसर्गास प्रतिबंध करता येतो. आपल्या आहारात लसूण वापरू शकताच पण फायदे वाढवण्यासाठी लसणाचे कच्चे सेवन करा.

हळद व मसाले

हळद हा एक सोन्यासारखा मसाला आहे जो आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. हळदीत कर्क्यूमिन नावाचे सक्रिय संयुग असते, ज्यामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हळद रोग प्रतिकारशक्ती वाढवते, पचनास मदत करते आणि पावसाळ्यात वाढणाऱ्या आजारांना प्रतिबंधित करते. श्वसन संक्रमण आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकार सुद्धा हळदीने कमी होण्यास मदत होऊ शकते. तुमच्या रोजच्या स्वयंपाकात चिमूटभर हळद किंवा हळद-मिश्रित दूध पिणे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरू शकते. मिरीबरोबर हळद खाल्ल्यास अधिक लाभ मिळू शकतो. तसेच वेलची, दालचिनी आणि जायफळ हे सर्व मसाले अँटी मायक्रोबियल आणि अँटी फंगल आहेत.

दही

दही हे प्रोबायोटिक-युक्त अन्न आहे जे फायदेशीर जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देऊन निरोगी आतडे राखण्यास मदत करते. मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी मजबूत आतडे मायक्रोबायोम आवश्यक आहे. नियमितपणे दह्याचे सेवन केल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शनचा धोका कमी होतो तसेच संपूर्ण पचन आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. साधे, गोड न केलेले दही निवडा आणि अतिरिक्त पोषणासाठी हंगामी फळे किंवा फ्लेक्ससीड्स घालून दही खाऊ शकता.

हे ही वाचा<<भेंडी कोणत्या पद्धतीने खाल्ल्यास ब्लड शुगर व कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते? जाणून घ्या

सुकामेवा व बिया

मेथीदाणे, बडीशेप आणि अक्रोड यांसारख्या नट आणि बियांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि निरोगी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. विशेषतः ड्रायफ्रुट्स हे रिबोफ्लेविन आणि नियासिनने समृद्ध असतात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

दरम्यान, खाण्यापिण्याच्या सवयींसह या ऋतूमध्ये रोगांचा धोका कमी करण्यासाठी स्वच्छता राखणे खूप गरजेचे आहे, स्वच्छ पाणी पिणे आणि ताजे शिजवलेले अन्न खाल्ल्यास रोगांचा धोका अर्ध्याहून कमी होऊ शकतो.

Story img Loader