Benefits Of Eating Watermelon: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वात जास्त मान आंब्याला असला तरी कलिंगडाची फॅन फॉलोईंग सुद्धा कमी नाही. तुम्हालाही कलिंगड आवडतो का? आवडत असो किंवा नसो, यंदाच्या उन्हाळ्यात तुम्ही आवडीने कलिंगड खाल असे काही फायदे आज आपण तज्ज्ञांकडून जाणुन घेणार आहोत. केअर हॉस्पिटल्स, बंजारा हिल्स, हैदराबाद येथील सल्लागार व क्लिनिकल डाएटिशियन डॉ. जी. सुष्मा यांनी इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना साधारण ६ किलो वजनाच्या कलिंगडातील पोषणाची टक्केवारी सांगितली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एका कलिंगडामध्ये किती पोषण असते?
- कॅलरीज: १२००
- कार्ब्स : ३०० ग्रॅम
- प्रथिने: ३० ग्रॅम
- चरबी: ० ग्रॅम
- फायबर: १२ ग्रॅम
- जीवनसत्त्वे आणि खनिजे: व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लाइकोपीन
उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे फायदे
- हायड्रेशन: कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, उष्ण वातावरणात शरीराला हायड्रेट राहण्यासाठी कलिंगडाची मदत होते. यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यासही हातभार लागतो.
- इलेक्ट्रोलाइटचा पुरवठा: कलिंगडामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स असतात ज्यामुळे मज्जातंतूंचे आणि स्नायूंचे कार्य सुधारण्यास मदत होते.
- कूलिंग इफेक्ट: कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीराला नैसर्गिकरित्या थंड करण्यासाठी. थोडक्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी याची मदत होते. उष्णतेमुळे होणारे त्रास (त्वचेवर फोड/घामोळे येणे, लाल रंगांचे चट्टे उमटणे) यामुळे कमी होतात.
- वजन नियंत्रणात ठेवणे: कलिंगडामध्ये कॅलरी आणि फॅट कमी असते तर पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. तुमच्या आहारात कलिंगडाचा समावेश केल्याने तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि वजन नियंत्रणात मदत होते.
- पचनास मदत: कलिंगड हा आहारातील फायबरचा चांगला स्रोत आहे, जो पचनास मदत करतो आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते.
- अँटिऑक्सिडंट्स आणि रोगप्रतिकारक शक्ती: कलिंगडामध्ये व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीन यांसारख्या अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीराच्या पेशींना मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात आणि रोगप्रतिकारक शक्तीची वाढ करतात.
- हृदयाचे आरोग्य: कलिंगडामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयविकार टाळण्यास मदत करते.
- डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य: कलिंगडातील व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेचे चांगले आरोग्य राखण्यासाठी योगदान देते
- व्यायामानंतर स्नॅक्स: कलिंगडामध्ये सिट्रुलीन, हे एक अमीनो ऍसिड असते जे स्नायूंचे दुखणे कमी करण्यास आणि व्यायामानंतर शरीराला स्थिर ठेवण्यास मदत करते. सिट्रुलीनचे शरीरात आर्जिनिनमध्ये रूपांतर होते, जे रक्तवाहिन्यांचे आकुंचन, प्रसरण सुरळीत होते व रक्त प्रवाह सुधारण्यात भूमिका बजावते.
- दाहक-विरोधी गुणधर्म: कलिंगडामध्ये दाहक-विरोधी घटक असतात, जसे की क्युकर्बिटासीन ई आणि लाइकोपीन. याचा उपयोग जळजळ कमी करण्यास आणि संधिवात सारख्या परिस्थितीची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात.
मधुमेही रुग्ण किती प्रमाणात कलिंगड खाऊ शकतात?
मधुमेही रुग्ण कलिंगडाचे सेवन करू शकतात, परंतु त्यात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने सेवन कमी प्रमाणात करावे. सुष्मा म्हणाल्या की, “मधुमेहाच्या रूग्णांनी अंदाजे एक कप किंवा १५० ग्रॅम कलिंगड खावे, ज्यामध्ये सुमारे ७ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी पोर्शन कंट्रोल आणि एकूण कार्बोहायड्रेटचे प्रमाण विचारात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी प्रभावीपणे नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
हे ही वाचा<< ६० टक्के कार्यरत किडनीसह IPL खेळतोय RCB चा ‘हा’ स्टार खेळाडू; किडनीच्या सुदृढतेसाठी काय खावं, काय नाही?
कलिंगड खाताना या गोष्टी लक्षात ठेवाच
- पिकलेले कलिंगड निवडा.
- कलिंगड कापण्याच्या आधी साध्या (खोलीच्या) तापमानात ठेवा व कापल्यावर फ्रीजमध्ये ठेवू शकता.
- कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स अधिक असतो. त्यामुळे काही लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते.
- कलिंगड खाल्ल्याने जठराला त्रास होऊ शकतो. सूज येणे किंवा अतिसार असेही त्रास होऊ शकतात.