Benefits Of Walking backwards: तुम्हाला तर माहीतच असेल साधारण अनेक गाड्यांमध्ये रिव्हर्स गिअर असतो. आपत्कालीन स्थिती किंवा गरजेनुसार स्वतःला एखाद्या ठिकाणी फिट करण्यासाठी हाच गिअर कामी येतो. त्याचप्रमाणे मानवी शरीरात पण मागे येण्याची क्षमता असते. माघार घेण्याने ज्या पद्धतीने तुम्हाला संकटाच्या स्थितीपासून लांब राहता येतं त्याच प्रमाणे मागे चालण्याने म्हणजेच उलट्या दिशेने चालल्याने तुमच्या आरोग्याला सुद्धा काही फायदे होऊ शकतात. उलट्या दिशेने चालणे हे डाव्या आणि उजव्या मेंदूच्या समन्वयासाठी, तसेच ३६० -डिग्री (पूर्णपणे) जागरुकतेसाठी सर्वोत्तम कार्य करते. तुमची प्रतिसाद, प्रतिक्रिया, विरोध किंवा स्वीकार करण्याची क्षमता सुधारण्यासाठी या पद्धतीने चालणे उपयुक्त ठरते. होलिस्टिक हेल्थ एक्सपर्ट डॉ मिकी मेहता यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

उलट्या दिशेने चालणे हे रेट्रो वॉक किंवा रिव्हर्स वॉक हे शारीरिक हालचालीचा समन्वय साधण्यासाठी मदतीचे ठरू शकते असे सिद्ध करण्यासाठी पुरेसे संशोधन आवश्यक आहे. पुढे चालण्याच्या तुलनेत पाठीमागच्या दिशेने चालल्याने स्नायू नीट सांधले जातात. यामुळे पायातील स्नायू सक्रिय आणि मजबूत होऊ शकतात. विशेषत: क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग, ग्लूट्स आणि पोटऱ्यांच्या स्नायूंच्या विकासामध्ये याची मदत होऊ शकते.

The young woman hit under the donkey's ear
पाठलाग करणाऱ्या गाढवाबरोबर तरुणीनं केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
How exercising for 2-3 days may help reduce risk of Alzheimer’s Alzheimer Disease exercise
व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितले व्यायाम प्रकार
Shocking viral video of a person broke his neck during a massage at a salon watch video
PHOTO: तुम्हीही सलूनमध्ये ‘फ्री हेड मसाज अन् मान मोडून घेताय? या तरुणाबरोबर जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
Apple new Share Item Location feature
Share Bag Location: प्रवासादरम्यान लगेज हरवलं? आता चिंता सोडा, तुम्हाला मदत करणार शेअर बॅग लोकेशन
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा

उलट चालण्याचे फायदे बघताना आपण उलट चालताना शरीराचे पोश्चर कसे असावे याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. एकार्थी अशा प्रकारच्या चालण्याने पोश्चर सुधारण्यासही मदत होऊ शकते. यामध्ये मुख्यतः मणक्यांचे स्नायू सक्रिय होत असल्याने मुद्रा सुधारण्यास मदत होऊ शकते. यामुळे तुमच्या शरीराचे संतुलन आणि समन्वयाचे कार्य सुधारू शकते. अशाप्रकारे चालताना एकाग्रता आवश्यक असते यामुळे मज्जासंस्था सक्रिय होण्यास मदत होते. उलटे चालणे सांध्यावर हलका आणि कमी ताण देते, तर गुडघे आणि घोट्यावर ताण पडत नाही. मुख्यतः सांध्यांची समस्या असलेल्या व्यक्तींसाठी किंवा दुखापतीतून बरे होणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

उलट्या दिशेने चालणे हे पुढे धावण्याइतके तीव्र नसले तरी ते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या तंदुरुस्तीमध्ये योगदान देते. हृदयाची गती आणि श्वसनाची लय सुधारण्यास यामुळे मदत होऊ शकते जी एकंदरीत ऑक्सिजनचा पुरवठा वाढवते. उलट्या दिशेने चालताना अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते तसेच रक्ताभिसरण प्रणालीला चालना मिळते यामुळे एकूणच फुफ्फुसांचे आरोग्य देखील सुधारू शकते.

अनेकदा दुखापत झाली असताना किंवा जखमांमधून बरे होत असताना अशा प्रकारचे चालणे उत्तम व्यायामाचा पर्याय म्हणून ओळखला जातो. तुमच्या व्यायामाचा एक भाग म्हणून अशा प्रकारचे चालणे रुटीनमध्ये समाविष्ट करणे फायद्याचे ठरू शकते यामुळे सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे एकसंधपणा टाळता येऊ शकतो आणि संभाव्य दुखापतीचा धोका कमी होऊ शकतो. तुमच्या स्नायूंना सुद्धा नियमित प्रकारांपेक्षा वेगळी हालचाल करता येऊ शकते.

काही खेळाडू त्यांच्या प्रशिक्षणच्या रुटीनमध्ये ‘उलट चालणे’ समाविष्ट करतात. यासह कंबरेची लवचिकता वाढवण्यासाठी सुद्धा आपण काही हालचाली समाविष्ट करू शकतात. यामुळे चपळता, संतुलन आणि एकूणच ऍथलेटिक कामगिरी सुधारते. त्यामुळे हे विशेषतः अशा खेळांसाठी उपयुक्त आहे ज्यात दिशेत वेगाने बदल होतात.

हे ही वाचा << १०० ग्रॅम बीटरूटच्या पोटात दडलंय काय? खाल्ल्याने कॅन्सर बरा होतो का? मधुमेह असल्यास खावं का? प्रश्न सोडवुया..

सोशल मीडिया ट्रेंड मनोरंजक आणि आकर्षक असू शकतात, तरीही सुरक्षितता आणि वैयक्तिक गरजांनुसार व्यायामाच्या प्रकारात बदल करावी जेणेकरून शरीराला अचानक कोणताही झटका बसणार नाही. आवश्यकता असल्यास तुमच्या वैद्यकीय सल्लागारांसह चर्चा करू शकता.