अनेकदा आपण ऐकलं असेल की, सकाळचा नाश्ता हा राजा सारखा असावा, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे असावे. कारण नाश्ता हा रात्री दीर्घ झोपेनंतर घेण्यात येणार पहिला आहार असतो. त्यामुळे सकाळच्या नाश्ता फार महत्वाचा असतो. सकाळी दिवसाची सुरुवात ही सकस आहाराने केली तर संपूर्ण दिवसाचे काम करण्यास ऊर्जा मिळते. पण बरेच जण सकाळी ऑफिसला किंवा कॉलेजला नाश्ता न करताच घराबाहेर पडतात. पण ही सवय आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप वाईट आहे. यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते.
सकाळचा नाश्ता कसा असावा
ट्रेन, ऑफिस किंवा ट्रेनमध्ये तुम्ही पाहिले असेल अनेक लोक खूप सुस्त दिसतात. यातील अनेकजण सकाळी काही न खाताच घराबाहेर पडलेले असतात. त्यामुळे उलटी, चक्कर, मळमळ असा समस्यांचा सामना करणारे लोकंही यात दिसतात. पण रोज सकाळचा नाश्ता करून जर तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला एक एनर्जी मिळते आणि पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. पण सकाळच्या नाश्त्यामध्ये नेमके कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत जाणून घेऊ….
सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम एक ग्लास पाणी प्या. यानंतर फ्रेश होऊन नाश्ता करा, या नाश्त्यामध्ये काजू आणि ट्रायफ्रूट्सचा समावेश करा. यामुळे दिवसभर तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल आणि थकवा नाहीसा होईल. तुम्ही रोज रात्री काजू आणि बदाम पाण्यात भिजत ठेवा सकाळी उठल्यानंतर ते खा. साधारण महिनाभर असे केल्यास तुमच्या शरीरात सकारात्मक बदल दिसून येतील.
सकाळी रिकाम्या पोटी करु शकता ‘या’ पदार्थांचे सेवन
१) मनुका
२) किशमिश
३) बदाम
४) सूर्यफुलाच्या बिया
५) फ्लेक्स बिया
६) खजूर
७) भोपळ्याच्या बिया
८) अक्रोड
९) काजू
१) मखना
हे पदार्थ सकाळी उपाशी पोटी खाल्ल्यास त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे होतील, तोंडाची चव वाढवण्यासाठी तुम्ही यात मध घालू शकता, आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार, तुम्ही हे पदार्थ दुधासोबतही सेवन करू शकता. यामुळे शरीरात कधीच अशक्तपणा जाणवत नाही.