हल्ली ‘पीसीओस’ हा शब्द खूपदा कानावर पडू लागला आहे. आजकाल बऱ्याच तरुण मुलींमध्ये पॉलीसिस्टिक ओव्हरीज सिंड्रोम (PCOS) ची मोठी समस्या दिसते. जीवनशैलीमुळे तर पीसीओएस (PCOS) होतोच पण अनेकदा काहींना अनुवांशिक घटकांमुळे होतो. आई होण्याची इच्छा असलेल्या अनेकींना पीसीओएसमुळे गर्भधारणेस अडचणी येतात. ते कशामुळे होते. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

PCOS म्हणजे काय?

पीसीओएस ही महिलांमध्ये प्रजननक्षमतेच्या अंतःस्रावी समस्या आहे. PCOD हा एक हार्मोनल प्रॅाब्लम आहे. ज्यामुळे गर्भाशयात लहान मोठ्या गाठी तयार होतात. त्याचाच परिणाम म्हणून पिरीयड्स (मासिक पाळी) अनियमित होतात. वजन वाढतं, प्रेग्नेन्सीमध्ये अडचणी निर्माण होतात, गर्भधारणा होत नाही किंवा झाल्यास त्यात अनेक अडचणी उद्भवतात. या आणि अशा अनेक समस्या PCOD मुळे निर्माण होणाच्या शक्यता आहेत. सुरुवातीच्या काळात ही समस्या ३०-३५ च्या स्त्रियांना जाणवत होती. मात्र, आता हाच PCOD चा त्रास १८ ते २० वर्षांच्या मुलींनादेखील व्हायला लागला आहे.

अहिल्या करमरकर या ३२ वर्षीय महिलेला पीसीओएस ही समस्या जाणवली असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. तिचे वजन ८७.५० किलो होते. जे जास्त होते. तिला नियमित मासिक पाळी येत नव्हती आणि तिला कायमचे वंध्यत्व असल्याचे निदान झाले होते. तिच्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी तिला PCOS औषधोपचार करताना १५ किलो वजन कमी करण्याचा सल्ला दिला. स्त्रीरोगतज्ज्ञांनी तिला सकस आहार घेण्याचा सल्ला दिला आणि सहा महिन्यांत ते लक्ष्य गाठले आणि त्यानंतर ती गर्भवती झाली.

(हे ही वाचा : दुपारी झोपणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट? वामकुक्षीबाबत तज्ज्ञ सांगतात, ”जेवल्यानंतर डुलकी घेणं…” )

जास्त वजन वाढणे हे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमच्या लक्षणांपैकी एक आहे आणि अनेक आरोग्य समस्यांशी संबंधित आहे.  तथापि, नियमितपणे व्यायाम केल्याने PCOS ची लक्षणे कमी होतात. इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी होते.

संतुलित आहारा घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

तज्ज्ञांनी सांगितले, PCOD होऊच नये यासाठी सगळ्यात आधी आहारात एक बदल करायचाय तो म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल, हाय कॅलरीज आणि हाय कार्बोहायड्रेट्स असणारे खाद्य पदार्थ कमी करायचे शक्य झाल्यास ते टाळायचे. सिगरेट स्मोकींग आणि अल्कोहोल कंसंम्पशनपासून लांब रहा.

पीसीओएसग्रस्त महिलांसाठी संतुलित आहाराची नेहमी शिफारस केली जाते. बाजारातील फास्टफूडपेक्षा घरातील जेवण सर्वोत्तम पर्याय ठरतो. प्रक्रियायुक्त आणि हवाबंद खाद्यपदार्थांचा वापर नेहमी टाळायलाच हवा. पहिल्यांदा सकाळी एक ग्लास गरम पाणी नियमित प्या. तुम्ही त्यामध्ये लिंबू देखील टाकू शकतात. तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्याबरोबरच उर्जेचा पुरवठा करण्यास देखील सहाय्यक ठरू शकतो.

(हे ही वाचा : कोणते ड्रायफ्रूट्स भिजवूनच खावे, कोणते न भिजवता? आरोग्यासाठी फायदेशीर कोणते? जाणून घ्या पटकन! )

PCOS चा त्रास जाणवत असेल तर फास्ट फूड बंद करुन आहारात सकस व पौष्टिक पदार्थांचा समावेश केला पाहिजे. त्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, भाजणीचे थालीपीठ, हिरव्या मुगाचं घावण, दलिया यांचा समावेश करावा. मुगाच्या डाळीचं वरण, एखादी फळ भाजी, पालक, टोमॅटो, मशरूम, मिरी, ब्रोकोली आणि फ्लॉवर सारख्या पालेभाज्या खा, पोळी किंवा ज्वारीची भाकरी, गाजर किंवा काकडीचं सॅलड. दुपारच्या जेवणातून भात वर्ज्य करुन टाका. परंतु, भात खायची इच्छा असेल तर तांदूळ भाजून घ्यावेत मग त्याचा भात करावा. प्रथिनेयुक्त शेंगा घ्या. फळामध्ये ताजी फळं खावीत.

पीसीओएसमुळे मनावर ताण येऊ शकतो. अशावेळी सकारात्मक विचार, योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली सांभाळून लक्षणं कशी कमी करता येऊ शकतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best foods for polycystic ovary syndrome pcos decoding how mediterranean diet aids weight loss pdb