नवी दिल्ली : दात चांगल्या स्थितीत असणाऱ्या व्यक्तींना डोके आणि मानेचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो, असे अनेक देशांनी एकत्र केलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. दंतवैद्याकडे नियमित तपासणी करणाऱ्या व्यक्तींना या आजाराच्या लक्षणांबाबत लवकरच माहिती होते. त्यांच्यावर उपचारही लवकर सुरू होतात, असेही या संशोधनात स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> आरोग्य वार्ता : कमी वेतन, कामाच्या तणावामुळे हृदयरोगाचा धोका

‘इंटरनॅशनल हेड अ‍ॅन्ड नेक कॅन्सर एपडेमिओलॉजी’द्वारे करण्यात आलेले हे संशोधन ‘कॅन्सर इन्स्टिटय़ूट जर्नल’मध्ये प्रकाशित झाले आहे.  या संशोधनासाठी डोके आणि मानेच्या कर्करुग्णांची माहिती एकत्र करण्यात आली होती. यामध्ये हिरडय़ातून रक्त येणे, माऊथ वॉशचा उपयोग, दात घासण्याच्या वेळा आणि मागील १० वर्षांत त्यांनी दंतवैद्यांकडून केलेली तपासणी आदींचा समावेश होता.  डोके व मानेच्या कर्करोगावर सध्या चांगले उपचार उपलब्ध आहेत. मात्र, त्यानंतरही हा आजार सर्वात धोकादायक कर्करोगांपैकी एक आहे. अमेरिकेत दरवर्षी या आजाराचे ६७ हजार रुग्ण आढळतात. संशोधनानुसार दात आणि तोंडाच्या स्वच्छतेमुळे या आजाराचा धोका कमी होतो.