वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण विविध प्रयत्न करताना दिसतात. कोणी जीम करते, कोणी व्यायाम करते, कोणी धावते, कोणी चालते, कोणी आहारामध्ये विविध पथ्यांचे पालन करते. असाच आहारातील बदल अनेक लोक कटाक्षाने पाळतात, तो म्हणजे सायंकाळी ७ च्या आधी जेवण करणे. संध्याकाळी जेवण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. नुकतेच कॉमेडियन आणि अभिनेत्री भारती सिंगने तिच्या पॉडकास्टमध्ये चर्चा केली.
भारती सिंगने तिच्या जेवणाच्या वेळेत बदल केल्याने तिचे वजन ६-७ महिन्यांत कसे कमी झाले आणि तिने दिनचर्याचे पालन करणे थांबवले तेव्हा काय झाले याबद्दल सांगितले. “जेव्हा मी ६-७ महिन्यांसाठी संध्याकाळी ६.३० वाजता जेवण सुरू केले, तेव्हा माझ्या शरीराला त्याची सवय झाली. पण, जर ६.३० ऐवजी ९.३० वाजता जेवण करण्यास सुरू केले तेव्हा हा बदल माझे शरीर स्वीकारू शकत नव्हते. मला मळमळ जाणवत होती. जेव्हा हे २-३ वेळा घडले तेव्हा मला जाणवले की, माझे शरीर मला वेळापत्रकानुसार राहण्यास सांगण्याचा प्रयत्न करत आहे,” असे भारतीने तिच्या यूट्यूब पॉडकास्टवर अभिनेता गुरमित चौधरीशी झालेल्या संभाषणात सांगितले.
सायंकाळी ६ ते ७ दरम्यान जेवण करण्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत आणि भारतीने पुन्हा ९ वाजता जेवण्यास सुरुवात केली तेव्हा तिला त्रास का झाला? याबाबत डॉक्टर काय सांगतात हे जाणून घेऊ या…
नवी दिल्लीतील पीएसआरआय हॉस्पिटलमधील आहारतज्ज्ञ डी. टी. देबजानी बॅनर्जी म्हणाल्या की, सहा ते सात महिन्यांहून अधिक काळ संध्याकाळी ६:३० वाजता जेवण केल्याने शरीरात आरोग्याला चालना देणारे उल्लेखनीय बदल होऊ शकतात. “या सवयीशी संबंधित असंख्य आरोग्य फायदे आहेत, जे एकूणच आरोग्य सुधारू शकतात; ज्यामध्ये पचन सुधारणे, झोपेची गुणवत्ता वाढवणे, वजन व्यवस्थापन करणे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे, हृदयरोगाचा धोका कमी करणे, रक्तदाब कमी करणे, चयापचय सुधारणे आणि पित्ताची गुळणी येणे (अॅसिड रिफ्लक्स) रोखणे यांचा समावेश आहे,” असे बॅनर्जी म्हणाल्या.
आहारतज्ज्ञांच्या मते, “ते ऊर्जेची पातळी वाढवते आणि हार्मोनल संतुलन सुधारण्यासदेखील मदत करते. “संशोधनातून असे दिसून आले आहे की, “रात्रीचे जेवण लवकर खाल्ल्याने शरीराला झोपण्यापूर्वी अन्न पचवण्यासाठी अधिक वेळ मिळतो, यामुळे पोषक तत्वांचे चांगले शोषण होते आणि झोपेदरम्यान पचनाचा त्रास टाळण्यास मदत होते, ज्यामध्ये अपचन आणि पित्ताची गुळणी येणे (अॅसिड रिफ्लक्स) समावेश आहे, ज्यामुळे झोपमध्ये अडथळा येतो. याव्यतिरिक्त, झोपेच्या वेळी हलके पोट असेल तर पित्ताची गुळणी येणे (अॅसिड रिफ्लक्स) आणि अपचनाचा धोका कमी करून झोपेची गुणवत्ता सुधारते.”
लवकर जेवण केल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यातही मदत होते, असे बॅनर्जी यांनी सांगितले. “झोपण्यापूर्वी तुमच्या शरीराला कॅलरीज बर्न करण्यासाठी अधिक वेळ मिळतो, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास आणि जास्त खाण्यापासून रोखण्यास मदत होते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी चांगली नियंत्रित होते, कारण शरीराला विश्रांती घेण्यापूर्वी कार्बोहायड्रेट्सची प्रक्रिया आणि चयापचय करण्यासाठी अधिक वेळ मिळतो, यामुळे हृदयरोगाचा धोकादेखील कमी होऊ शकतो,” असे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
लवकर जेवण केल्याने चयापचयदेखील सुधारते. “चांगले कार्य करणारे चयापचय पित्ताची गुळणी येणे टाळते आणि इतर पचन समस्यांची शक्यता कमी करण्यास मदत करू शकते. याव्यतिरिक्त, लवकर जेवण केल्याने रात्री आणि दुसर्या दिवशी सतत ऊर्जा मिळते, ज्यामुळे चांगली उत्पादकता आणि मानसिक सतर्कता वाढते,” असे बॅनर्जी म्हणाल्या.
शेवटी, रात्रीचे जेवण लवकर केल्याने भूक, तृप्तता आणि तणावाशी संबंधित हार्मोन्ससह निरोगी हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते, जे एकूणच कल्याणात योगदान देते.
आणि संध्याकाळी ६:३० वाजता जेवणे सुरू केल्यानंतर, एखादी व्यक्ती जेवण सोडते तेव्हा काय होते?
भारती सिंग प्रमाणे, जर कोणी संध्याकाळी ६:३० वाजता जेवण्याची सवय लागल्यानंतर ते सोडले तर त्यांना पचनक्रियेत त्रास होतो, झोपेचा त्रास होतो आणि पचन आणि चयापचयासाठी पुरेसा वेळ नसल्याने वजन वाढण्याची शक्यता असते,” असे बॅनर्जी म्हणाल्या. “याचा रक्तातील साखरेचे नियमन आणि ऊर्जेच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतो,” असेही बॅनर्जी यांनी सांगितले.