वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण विविध प्रयत्न करताना दिसतात. कोणी व्यायाम करतं, कोणी धावतं, कोणी चालतं, कोणी आहारामध्ये विविध पथ्यांचे पालन करतं. असाच आहारातील बदल अनेक लोक कटाक्षाने पाळतात, तो म्हणजे सायंकाळी ७ च्या आधी जेवणे. संध्याकाळीच जेवण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. नुकतेच कॉमेडियन आणि अभिनेत्री भारती सिंगने तिच्या पॉडकास्टमध्ये याबाबत चर्चा केली. भारती सिंगने तिच्या जेवणाच्या वेळेत बदल केल्याने तिचे वजन ६-७ महिन्यांत कसे कमी झाले आणि तिने दिनचर्याचे पालन करणे थांबवले तेव्हा काय झाले याबद्दल सांगितले. “जेव्हा मी ६-७ महिन्यांसाठी संध्याकाळी ६.३० वाजता जेवण सुरू केले, तेव्हा माझ्या शरीराला त्याची सवय झाली. पण, ६.३० ऐवजी ९.३० वाजता जेवण करण्यास सुरू केले तेव्हा हा बदल माझे शरीर स्वीकारू शकत नव्हते. मला मळमळ जाणवत होती. जेव्हा हे २-३ वेळा घडले तेव्हा मला जाणवले की, माझे शरीर मला वेळापत्रकानुसार राहण्यास सांगण्याचा प्रयत्न करत आहे,” असे भारतीने तिच्या यूट्यूब पॉडकास्टवर अभिनेता गुरमित चौधरीशी झालेल्या संभाषणात सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा