तुमच्यापैकी अनेक जण पिझ्झा, बर्गर, कॉफ क्रीमर, तळलेले पकोडे, मफिन, पॉपकॉर्न, बिस्किटे, फिंगर चिप्स असे पदार्थ आवडीने खात असतील; पण तुम्हाला माहीत आहे की, तुम्ही खात असलेल्या या पदार्थ्यांमध्ये ट्रान्स फॅट्सचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरीही आज अनेकांच्या आहारात या पदार्थांचा वापर सर्रास होताना दिसतो. विशेषत: शाळा, कॉलेजात जाणारे तरुण-तरुणी या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करताना दिसतात. पण या पदार्थांमुळे आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा दावा आता जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. WHO ला असे आढळून आले की, भारतातील कोरोनरी ह्रदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ४.६ टक्के मृत्यू हे ट्रान्स फॅटी ॲसिडशी संबंधित असण्याची शक्यता आहे. ट्रान्स-फॅटचे सेवन एकूण ऊर्जेच्या सेवनाच्या एक टक्‍क्‍यापेक्षा कमी प्रमाणात असले पाहिजे. म्हणजे दिवसाला २,००० कॅलरी आहारासह २.२ ग्रॅमपेक्षा कमी ट्रान्स-फॅटचे सेवन केले पाहिजे.

ट्रान्स-फॅट्सच्या सेवनामुळे हृदयरोग, स्ट्रोक, टाईप २ मधुमेह आणि जळजळ होण्याचा धोका वाढतो; ज्यामुळे कर्करोग , संधिवात किंवा इतर चयापचयाशी संबंधित विकार होऊ शकतात. ट्रान्स फॅट्सचे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास प्राणघातक हृदयविकाराचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो.

behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
actress Bhagyashree shared recipe of unpeeled potato
‘मैने प्यार किया’फेम भाग्यश्री म्हणते, “न सोललेल्या बटाट्यांमुळे कमी होतो क्रॅम्प्सचा त्रास” खरंच हे शक्य आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
RSS Mohan Bhagwat, pune,
देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन
Plaster of Paris, eco-friendly Ganesh idol, POP,
विश्लेषण : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पर्यावरणास हानिकारक कसे ठरते? पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे शक्य आहे का?
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…
risk of cancer from bakery products marathi news
बेकरीजन्य पदार्थांमुळे कर्करोगाचा धोका; भंगारातील फर्निचरमधून उत्सर्जित होणारी रसायने आणि वायू हानिकारक

ट्रान्स-फॅट्स म्हणजे काय?

चंदिगडमधील ‘पीजीआयएमईआर स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’च्या आरोग्य व्यवस्थापनाचे प्राध्यापक डॉ. सोनू गोयल यांच्या मते, ट्रान्स-फॅट्स हे असंतृप्त चरबीचे एक प्रकार आहेत आणि ते नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत. नैसर्गिक ट्रान्स-फॅट्सचे स्रोत दूध, लोणी, चीज व मांस उत्पादने आहेत; तर कृत्रिम ट्रान्स-फॅट्सचे स्रोत वनस्पती, मार्जरीन आणि पॅकेज केलेले स्नॅक्स आहेत.

कृत्रिम ट्रान्स-फॅट्स; ज्यांना औद्योगिकरित्या उत्पादित केले जाते. कृत्रिम ट्रान्स-फॅट्सना अंशतः हायड्रोजनेटेड फॅट्स म्हणूनही ओळखले जाते, जे पदार्थांचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी वापरले जातात. यात हायड्रोजनेटेड तेल २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून अनेक पदार्थांमध्ये वापरण्यात येत आहे.

हायड्रोजनयुक्त वनस्पती तेलामध्ये ट्रान्स-फॅटचे प्रमाण सर्वाधिक असते. केक, कुकीज, पाई, शॉर्टनिंग, मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न, रेफ्रिजरेटेड पीठ, बिस्किटे, डोनट्स, नॉन-डेअरी कॉफी क्रीमर, स्टिक मार्जरीन आणि अगदी तळलेले पदार्थ हे हायड्रोजनयुक्त वनस्पती तेलावर आधारित पदार्थ आहेत.

हे पदार्थ बहुतेकदा मोनो आणि डायग्लिसराइड्स या दोन प्रकारचे फॅटी ॲसिड म्हणून सूचीबद्ध केले जातात. दरम्यान, डोनट्स, पेस्ट्री, आइस्क्रीम आणि ब्रेडसह अनेक उत्पादनांमध्ये अशा प्रकारचे ट्रान्स-फॅट्स मोठ्या प्रमाणात आढळते. पण अनपॅक केलेले पदार्थ पदार्थ्यांमध्ये याचे प्रमाण किती असेल निश्चित सांगता येत नाही, अशी माहिती डॉ. गोयल यांनी दिली आहे.

दूध, लोणी आणि चीजमध्ये कमी प्रमाणात नैसर्गिक ट्रान्स-फॅट्स असू शकतात (दुग्धजन्य पदार्थांमध्ये २-६ टक्के आणि गोमांस व बकरीचे पिल्लू ३-९ टक्के). या फॅट्सचे सेवन हानिकारक मानले जात नाही, असे डॉ. गोयल म्हणाले.

ट्रान्स-फॅट्सचा आरोग्यावर परिणाम

डॉ. गोयल यांच्या मते, ट्रान्स-फॅट्स रक्तातील लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात; जे संतृप्त चरबीच्या तुलनेत दुप्पट धोकादायक असते. पण हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतात. हाय एलडीएलमुळे रक्तदाब वाढतो आणि कोरोनरी हृदयरोगाचा धोकाही वाढतो. ट्रान्स-फॅटमुळे जळजळ आणि एंडोथेलियल डिसफंक्शन (रक्तवाहिन्यांचे अस्तर कमकुवत होणे) या आजारांचा धोका वाढतो. त्याशिवाय गर्भधारणेदरम्यान इन्सुलिन प्रतिरोध आणि गुंतागुंत होऊ शकते, गर्भाच्या विकासाशी तडजोड होऊ शकते, अगदी वंध्यत्वदेखील येऊ शकते. औद्योगिकरीत्या उत्पादित ट्रान्स-फॅट्सचे कोणतेही आरोग्यदायी फायदे नाहीत.

मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलमधील क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स विभागाच्या डॉ. सोनिया गांधी म्हणाल्या की, हायड्रोजनेटेड तेलापासून बनवलेल्या प्रत्येक पदार्थाच्या लेबलवर ट्रान्स-फॅट्सचे प्रमाण लिहिलेले नसते. त्यामुळे हे पदार्थ खाण्यासाठी सुरक्षित असल्याचे आपल्याला भासवले जाते. अशा वेळी कोणतेही लेबल नसलेले उच्च ट्रान्स-फॅट्स असलेले पदार्थांचे तुम्ही सेवन करता तेव्हा तुम्ही शिफारस केलेली सुरक्षित मर्यादा ओलांडता.

मोहालीमधील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरीचे वरिष्ठ संचालक डॉ. दीपक पुरी यांच्या मते, ट्रान्स-फॅट्स आपल्या शरीरासाठी विषारी असतात; जे कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ट्रान्स-फॅट्सचे हानिकारक परिणाम दोन दशकांहून अधिक काळ ज्ञात आहेत. तरीही २०२३ साठी WHO ने ठरवून दिलेल्या एकूण निर्मूलनाच्या लक्ष्यापर्यंत आपण अद्याप कुठेही पोहोचलेलो नाही.

आशियातील फक्त दोन देशांनी ट्रान्स-फॅट्ससंबंधित मार्गदर्शक तत्त्वे गांभीर्याने स्वीकारली आहेत; ज्यात २०१८ मध्ये थायलंडचा आणि २०२१ मध्ये भारताचा समावेश झाला आहे. भारताने अनुज्ञेय ट्रान्स-फॅटचे प्रमाण दोन टक्के निश्चित केले आहे; तर बहुतेक विकसित देशांनी हे प्रमाण ०.५ टक्क्यापेक्षा कमी निश्चित केले आहे.