dark chocolate cinnamon coffee and green tea enough to reduce blood sugar : आजकाल सोशल मीडियावर कडू पॉलीफेनोल (bitter polyphenols) बद्दल अनेक गोष्टी पसरत आहेत. तर हे पॉलीफेनोल तुम्हाला डार्क चॉकलेट, दालचिनी, लवंग, तुळस, कॉफी आणि ग्रीन टी तसेच काही फळे, भाज्या, शेंगा, नट्स, बियांमध्ये आढळून येतात. तसेच हे पॉलीफेनोल मधुमेहाचा ( reduce blood sugar ) धोकासुद्धा कमी करून आतड्यांचे आरोग्यदेखील सुधारू शकतात. यामुळे हार्मोन्सचा स्राव सुरू होतो आणि एखाद्या व्यक्तीला टाइप २ मधुमेह, लठ्ठपणा होण्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सच्या एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉक्टर रिचा चतुर्वेदी यांच्याशी चर्चा केली.

डॉक्टर रिचा चतुर्वेदी यांच्या मते पॉलीफेनॉल किंवा वनस्पतीच्या सूक्ष्म पोषक घटकांमध्ये अँटिऑक्सिडंट, दाहक-विरोधी गुणधर्म तर चयापचय क्रियेतील अडथळा दूर करण्यास मदत होते. कडू पॉलीफेनॉल खरबुजात आढळतात,त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित (Blood Sugar) राहण्यास मदत होते. काही संशोधन असे सूचित करतात की, ही संयुगे इन्सुलिन संवेदनशीलता वाढवून किंवा कार्बोहायड्रेट पचन सुधारून ग्लुकोज चयापचय प्रभावित करू शकतात.
उदाहरणार्थ, कडू खरबूजमध्ये कॅरंटिन आणि पॉलीपेप्टाइड्ससारखी संयुगे असतात; जी इन्सुलिनच्या क्रियेची नक्कल करू शकतात किंवा ग्लुकोजच्या शोषणावर परिणाम करू शकतात. पण, हे परिणाम प्राण्यांच्या मॉडेल्समध्ये जास्त आढळून आले आहेत; मानवी अभ्यासात याचा मिश्रित परिणाम दिसून आला आहे.

penaut oil for diabetis patients?
शेंगदाण्याचं तेल डायबेटिस असणाऱ्यांनी वापरावं का?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
Nutrition Diet , Maharashtra School, Sweet Food ,
पोषण आहार बदल! साखर लोकांना मागा पण गोडधोड खाऊ घाला, अनुदान नाहीच
Benefits Of Eating A Lot Of Vitamin C
चंकी पांडेप्रमाणे रोज अधिक प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’चे सेवन केल्यास शरीरावर काय परिणाम होतात? ही सवय चांगली की वाईट, घ्या जाणून
cardamom water benefits
वेलचीचे अशाप्रकारे सेवन केल्यास शरीरात दिसतील ‘हे’ आश्चर्यकारक बदल, तज्ज्ञांनी सांगितले जबरदस्त फायदे
Does Eating Ghee Really Make You Fat
Eating Ghee Increases Obesity : तुपाचे सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…
Why radish leaves or mulyachi pane deserve a place in your winter diet
हिवाळ्यात तुमच्या आहारात मुळ्याच्या पानांचा समावेश का असावा? तज्ज्ञांनी सांगितले कारण…

रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) नियंत्रित राहते का?

मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी पॉलीफेनॉलच्या प्रभावाची तपासणी करणाऱ्या क्लिनिकल चाचण्या मर्यादित आहेत, त्यामुळे अनेकदा याचे अनिर्णित परिणामसुद्धा येऊ शकतात. काही अभ्यासात असे दिसून आले आहे की, पॉलीफेनॉल्स केवळ मधुमेहाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकतात, हे अगदी ठामपणे सांगण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत.

हेही वाचा…Fever : ताप आलाय? मग ‘हा’ घरगुती उपाय ठरेल जादुई; रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास होईल मदत

मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी कोणत्याही पोषक किंवा अन्न घटकाचा प्रभाव एखाद्या व्यक्तीच्या एकूण आहार पद्धती, जीवनशैलीपासून वेगळा करता येत नाही. कारण विविध पॉलीफेनॉलयुक्त पदार्थ चयापचय क्रियेस मदत करतात. कारण हे पदार्थ पौष्टिक आणि अँटिऑक्सिडंटने समृद्ध असतात.

याशिवाय, मधुमेह असणाऱ्या रुग्णांवर पॉलीफेनॉलची परिणामकारकता अनुवांशिक पूर्वस्थिती, जीवनशैली घटकांवर आधारित असते. कारण एखाद्या व्यक्तीसाठी जे कार्य करते ते दुसऱ्यासाठी कार्य करू शकत नाही, त्यामुळे या गोष्टीची काळजी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. मधुमेह आणि लठ्ठपणासाठी काम करणाऱ्या पॉलीफेनॉल्सपैकी कर्क्युमिन, हळदीमध्ये आढळणारे रेझवेराट्रोल, द्राक्षे, शेंगदाणे, बेरीमध्ये आढळणारे क्वेरसेटीन, कांद्यामध्ये आढळणारे कॅटेचिन, कोको आणि ग्रीन टीमध्ये आढळणारे कॅटेचिन आहेत.

कडू पॉलीफेनॉलयुक्त पदार्थ संतुलित आहारामध्ये समाविष्ट करणे हे निरोगी जीवनशैलीचा भाग असू शकते. पण, मधुमेहाविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केवळ या पदार्थांवर अवलंबून राहणे योग्य नाही. मधुमेह प्रतिबंधासाठी वजन कमी करणे, नियमित शारीरिक हालचाली करणे आणि विविध अन्न स्रोतांमधून विविध प्रकारच्या पोषक तत्वांचे सेवन करणे आदींचा समावेश असू शकतो.

Story img Loader