Influenza Virus BJP Nilesh Rane: भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या ‘X’ (पूर्व ट्विटर) अकाऊंटवरून आपल्याला इन्फ्लुएंझा व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली. मी माझ्या खाजगी आयुष्याविषयी फार कधी ट्वीट करत नाही पण सगळ्यांना माहिती असावी म्हणून सांगत असल्याचे म्हणत राणे यांनी काल १३ सप्टेंबर २०२३ ला पोस्ट लिहिली होती. मागील काही वर्षातील या फ्लूची प्रकरणे पाहता, दरवर्षी जानेवारी ते मार्च तसेच पावसाळ्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत फ्लूबाधित रुग्णांचे प्रमाण वाढते.जगभरात, या वार्षिक महामारीच्या आजाराची सुमारे ३० ते ५० लाख प्रकरणे दिसून आली आहेत आणि सुमारे २,९०,००० ते ६,५०,००० जणांचे श्वसनाने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
इन्फ्लुएंझा व्हायरसच नव्हे तर सध्या निपाह व्हायरसचाही प्रादुर्भाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशात काळजी घेण्यासाठी आपण कोणत्या लक्षणांकडे लक्ष द्यायला हवे व त्यावर काय उपचार आहेत याविषयी जाणून घ्या.
निलेश राणेंनी सांगितली इन्फ्लुएंझा व्हायरसची लक्षणे
निलेश राणे ट्वीट करत लिहितात की, “१० तारखेला अचानक ताप भरला आणि हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर रिपोर्टमध्ये इन्फ्लुएंझा व्हायरस डिटेक्ट झाला. हा व्हायरस आणि होणारा त्रास हा फुफ्फुसावर हल्ला करतो ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होते. ताप येण्याअगोदर कसलेही लक्षण नाही, काही क्षणात ताप भरतो. दरम्यान ही लागण कशामुळे झाली याविषयी त्यांनी काहीही लिहिलेले नाही”
निलेश राणे ट्वीट
इन्फ्लुएंझा विषाणूची लक्षणे (Influenza Virus Signs)
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार इन्फ्लुएंझा व्हायरलमध्ये ताप, खोकला (सामान्यतः कोरडा), डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, तीव्र अस्वस्थता (अस्वस्थ वाटणे), घसा खवखवणे आणि नाक वाहणे ही लक्षणे दिसतात. खोकला तीव्र असतो आणि २ किंवा अधिक आठवडे टिकू शकतो. अन्य आजार असलेल्या लोकांना इन्फ्लुएंझाचा उच्च धोका असतो. अशा वेळी गंभीर स्थिती उद्भवू शकते किंवा मृत्यू होऊ शकतो.
इन्फ्लुएंझा विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावे? (Influenza Virus Precautions)
इन्फ्लुएंझा हा अर्थात संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे इन्फ्लुएंझाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात येणे टाळायला हवे.
इन्फ्लुएंझाबाधित रुग्ण खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर विषाणू हवेत पसरतात. इन्फ्लुएंझाचे विषाणू असतात. इन्फ्लुएंझाचा संसर्ग रोखण्यासाठी शिंकताना, खोकताना नाकाला आणि तोंडाला रुमाल लावणे गरजेचे आहे.
सतत हात धुवायला हवेत.
पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.
गर्दीच्या ठिकाणी जायचे असेल तर मास्क वापरावा.