दिवसेंदिवस बदललेली जीवनशैली, धावपळीचे जीवन, जेवणाची वेळ बदलत असल्याने, रात्री उशिरा जेवल्याने तसेच व्यायामाचा अभाव असल्याने तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच हल्ली बऱ्याच ठिकाणी वर्क फ्रॉम होमची सुविधा असल्याने अनेक जण घरूनच काम करतात. तासनतास बैठे काम, त्यामुळे शारीरिक हालचाल न होणे; अशी कारणे हृदयविकाराचा झटका येण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे तरुणाई हल्ली व्यायामासाठी, फिटनेससाठी जिम लावतात. सर्वांकडून वेगवेगळे सल्ले ऐकून नक्की काय केले पाहिजे, याबाबत तरुणांचा गोंधळ होतो. असेच काहीसे ३० वर्षीय शैलेश विश्वकर्माबरोबर घडले.
३० वर्षीय शैलेश विश्वकर्मा आपले वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाण्याचे प्लॅनिंग करत होते. त्यांना असलेला लठ्ठपणा हे कामाचे तास, बैठे काम, रात्री उशिरा खाणे आणि व्यायामाचा अभाव याचा परिणाम आहे. याचा परिणाम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच जिन्याच्या दोन पायऱ्या जरी चढल्या तरी आपल्याला धाप का लागते या चिंतेने त्यांनी जिमला जायचा निर्णय घेतला. जिममध्ये ट्रेनरने ट्रेडमिल टेस्टचा सल्ला दिला. वेगवेगळे सल्ले मिळाल्याने ते गोंधळून गेले. कारण हृदयरोगतज्ज्ञ सांगतात की रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करणे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी पुरेसे मार्कर आहेत. तसेच तुमचे मार्कर विस्कळीत झाल्यास काय करावे हे सांगण्यासाठी डॉक्टर हे सर्वोत्तम व्यक्ती आहेत.
हृदयाची स्थिती तपासण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्या लागतात?
डॉक्टर नेहमी सल्ला देतात की, प्रत्येक ३० वर्षे वय असणाऱ्या व्यक्ती खास करून पुरुषांनी कमीत कमी तीन मूलभूत मापदंड ज्यात रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीची चाचणी करावी. कारण जर या तीन गोष्टींची पातळी वाढली असेल तर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो. रात्रीच्या उपवासानंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी मोजणारी फास्टिंग ग्लुकोज टेस्ट प्रीडायबेटिस आणि मधुमेह दर्शवू शकते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. फास्टिंग रक्तातील साखरेची पातळी ९९ mg/dL किंवा त्याहून कमी असणे हे सामान्य आहे. १०० ते १२५ mg/dL किंवा त्याहून अधिक पातळी असेल तर ती मधुमेह सूचित करते. दुसरीकडे HbA1c टेस्ट गेल्या तीन महिन्यांतील सरासरी रक्तातील साखरेची पातळी दर्शवते. ती चार टक्क्यांपेक्षा कमी असावी.
हेही वाचा : करोनाची लागण झालेल्या व्यक्तींचा रक्तदाब वाढू शकतो का? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
कोलेस्ट्रॉल टेस्ट, ज्याला लिपिड पॅनल प्रोफाइलदेखील म्हटले जाते. ही रक्तातील फॅट्स मोजते. जेव्हा आपण आपल्या शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉलचे सेवन करतो तेव्हा कोलेस्ट्रॉल हृदयाच्या सभोवताली असलेल्या धमन्यांच्यामध्ये जमा होण्याची क्षमता ठेवते. वाईट कोलेस्ट्रॉल किंवा लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) आणि ट्रायग्लिसराइड्सच्या पातळीकडे लक्ष दिले पाहिजे. जर का LDL चे प्रमाण खूप जास्त असेल, तर डॉक्टर statins लिहून देऊ शकतात. सामान्य LDL पातळी १०० mg/dL पेक्षा कमी मानली जाते आणि सामान्य ट्रायग्लिसराइड पातळी १५० mg/dL पेक्षा कमी असते.
माझ्यासाठी कोणती चाचणी योग्य आहे हे मला कसे कळेल?
हल्लीची भारतातील तरुणाई अनेक आजारांचा सामना करत आहे. त्यांना स्वतःला चाचण्यांची आवश्यकता आहे का? दिल्ली येथील एम्समधील कार्डिओलॉजीचे प्रोफेसर डॉ. राकेश यादव यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले, २० किंवा ३० वर्षांच्या तरुणांनी चाचण्या केल्या पाहिजेत. त्यांचे म्हणणे आहे, ”याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही; कारण चाचण्यांमध्ये मृत्यूदर कमी झाल्याचे दिसून आलेले नाही.” तरुणांना हृदयविकाराचे झटके येण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे आणि अनेक लोकांना माहिती नाही की त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीचा फोकस फक्त तीन पॅरामीटर्सवर असावा असे डॉ. यादव यांचे म्हणणे आहे.
”आपल्याला एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब, रक्तातील ग्लुकोज आणि कोलेस्ट्रॉलची पातळी जाणून घेणे आवश्यक आहे. फक्त तीन चाचण्या या लोकांना त्यांच्या स्थितीबद्दल जाणीव करून देण्यासाठी आणि आवश्यक असल्यास औषध सुरु करण्यासाठी पुरेशा आहेत.” ते म्हणतात, ईसीजी (ECG), इकोकार्डियोग्राम (echocardiogram) किंवा ट्रेडमिल चाचणी यांसारख्या चाचण्यांची आवश्यकता नाही. या चाचण्या केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विशिष्ट परिस्थितींचे निदान करण्यासाठी केल्या पाहिजेत, असे त्यांना वाटते.
हेही वाचा : Health Special: लहान मुलांना होणाऱ्या डायबेटिसविषयी तुम्हाला माहितेय का?
मार्कर चाचणीनंतर व्यक्तीला पाच वर्षांसाठी दुसरी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करण्याची आवश्यकता नाही. ”३० व्या वर्षानंतर प्रत्येकाला पाच वर्षातून एकदा या तीन पॅरामीटर्सची चाचणी केली पाहिजे. वयाच्या ४० किंवा ४५ वयानंतर या चाचण्या प्रत्येक दोन ते तीन वर्षांनी कराव्यात. वयाच्या ६० वर्षानंतर दरवर्षी या चाचण्या केल्या पाहिजेत”, असे डॉ. यादव यांचे म्हणणे आहे. मधल्या काळात तुम्हाला त्रास निर्माण झाल्यास हृदयरोगतज्ज्ञ किंवा वैद्यकीय सल्ला घेणे फायदेशीर ठरते.
तिन्ही स्थितीचे लवकर निदान आणि पॅरामीटर्सवर लक्ष ठेवल्यास हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि अन्य त्रास होण्याचा धोका कमी होऊ शकतो. प्रतिबंधात्मक चाचण्यांच्या अभावामध्ये लोक वर्षानुवर्षे निदान करू शकत नाहीत. निदान झाल्यावरदेखील तिन्ही पॅरामीटर्स नियंत्रित करणे सोपे नाही. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या ICMR च्या अभ्यासात असे आढळून आले की, ज्या लोकांना आधीच मधुमेहाचे निदान झाले होते त्यापैकी केवळ ७.७ टक्के लोक हे तीन घटक नियंत्रणात ठेवू शकले आहेत.
प्रतिबंधात्मक आरोग्य चाचण्यांमागील विचार केवळ जीवघेणी परिस्थिती लवकर ओळखणे नाही, तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या सामान्य आरोग्याबद्दल आणि मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित परिस्थिती टाळण्यासाठी त्यांनी घेतलेल्या खबरदारीबद्दल माहिती देणे आहे. नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसीनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरंजित चॅटर्जी यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले, “एक प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी रोग आणि ट्रिगर्स लवकर शोधण्यात मदत करू शकते, जिथे कदाचित जीवनशैलीत बदल केल्याने यात बदल होऊ शकतो. यामुळे आम्हाला कळेल की, आम्हाला आमच्या शरीराची काळजी कशी घ्यायची आहे.”