Harms of Blowing Nose: सर्दी झाल्यावर सतत नाक ओढू नये (श्लेष्मा नाकात वर खेचू नये) त्यापेक्षा नाक शिंकरून स्वच्छ करावं ज्यामुळे नाक मोकळं होतं, असं सांगितलं जातं. पण याचा उलट प्रभाव आपल्या संपूर्ण शरीरावर होऊ शकतो असं मत डॉ. चंदर असरानी यांनी व्यक्त केलं आहे. इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना डॉ. असरानी यांनी सांगितले की, “नाकाचा कानाशी थेट संबंध असतो, या दोन्ही ज्ञानेंद्रियांमध्ये युस्टाचियन ट्यूब असते. जेव्हा आपण नाक शिंकरतो तेव्हा आपण आत ट्यूबच्या आत दाब किंवा व्हॅक्यूम तयार करतो आणि नाकाच्या आत असलेली सर्व सर्दी कानात शोषली जाते ज्यामुळे कानात संक्रमण (sic) होण्याचा धोका असतो.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, लखनऊचे वरिष्ठ सल्लागार ENT, हेड, नेक आणि कॅन्सर सर्जन, डॉ मनोज मिश्रा यांनी डॉ. असरानी यांच्या मताला सहमती दर्शवत सांगितले की, “नाक शिंकरल्याने घर्षणामुळे अनुनासिक परिच्छेद आणि सायनसच्या नाजूक अस्तरांना त्रास होऊ शकतो. यामुळे अनुनासिक रक्तसंचय वाढून जळजळ होऊ शकते. जेव्हा आपण जोरात नाक शिंकरता तेव्हा नाकातील द्रव सायनसमध्ये अडकू शकते, यामुळे सायनसवरील दाब वाढू शकतो ही स्थिती सायनुसायटिसची लक्षणे वाढवू शकतात.”

नाक जोरात शिंकरल्याने होणारा त्रास

डॉ मिश्रा म्हणतात, “सर्दीदरम्यान नाक स्वच्छ करणे आवश्यक आहे, पण अतिरिक्त गुंतागुंत टाळण्यासाठी नाक हळूवारपणे आणि प्रभावीपणे कस्वच्छ करायला हवे अन्यथा खालील त्रास वाढू शकतात.

युस्टाचियन ट्यूबमध्ये नाकातील स्त्राव पसरणे: जबरदस्तीने नाक शिंकरल्याने नाक व कानाला घशात जोडणाऱ्या युस्टाचियन ट्यूबमध्ये नाकातील स्राव अडकला जाऊ शकतो. यामुळे कान दुखणे किंवा आणि कानात रोगजनकांचा प्रवेश झाल्याने कानाचे संक्रमण (ओटिटिस मीडिया) असे त्रास होऊ शकतात.

बॅरोट्रॉमा: नाक शिंकरून जास्त दाब दिल्यास देखील बॅरोट्रॉमा होऊ शकतो, ज्यामुळे कानात वेदना होऊ शकतात.

नाकाच्या ऊतींचे नुकसान: जबरदस्तीने किंवा चुकीच्या पद्धतीने नाक शिंकरल्याने नाकातील लहान रक्तवाहिन्या फुटू शकतात, ज्यामुळे नाकातून रक्तस्त्राव होतो.

सायनसचा वाढलेला दाब: जास्त जोरात नाक शिंकारल्याने हवा आणि श्लेष्मा सायनसमध्ये परत येऊ शकतो, सायनसचा दाब आणि वेदना वाढतात.

संसर्गाचा प्रसार: जोराने नाक शिंकरल्याने हवेवाटे संसर्गजन्य घटक अन्य अवयवांमध्ये पसरू शकतात.

बंद नाक मोकळे करण्यासाठी काय उपाय करावा?

जोरात शिंकरण्याऐवजी, दुसरी नाकपुडी थोडीशी बंद ठेवून एकावेळी एक नाकपुडी हळूवारपणे शिंकरावी. ही पद्धत अनुनासिक परिच्छेद आणि सायनसमधील दाब कमी करते, जळजळ होण्याचा धोका कमी करते किंवा युस्टाचियन ट्यूबमध्ये द्रव ढकलते.

हे ही वाचा<< लादी- खिडक्या पुसणं, केर काढणं, घरगुती काम करताना किती कॅलरीज बर्न होतात? किती वेळ करावं ‘स्वच्छता रुटीन’?

नाक स्वच्छ करण्यासाठी खारट द्रावण वापरल्याने अनुनासिक परिच्छेदातील श्लेष्मा पातळ होतो व अगदी हळुवार शिंकरल्याने सुद्धा बाहेर पडतो. सलाईन रक्तसंचय कमी करून जबरदस्तीने नाक शिंकरण्याची गरज भासत नाही. वाफ घेणे, गरम पाण्याने अंघोळ करणे हा सुद्धा पर्याय फायद्याचा ठरू शकतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blowing nose can harm ears and throat how to clear congestion blocked nose without pain health expert suggest breathing ways svs
Show comments