For Animal, Bobby Deol gave up sweets for 4 months: अभिनेता बॉबी देओलच्या ‘ॲनिमल’ चित्रपटातील लुकची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. ५४ वर्षीच्या बॉबी देओलचा फिटनेस हा अत्यंत नैसर्गिक पद्धतीने वजन कमी केल्याचा प्रभाव असल्याचे त्याच्या सर्व फोटोंकडे बघून लक्षात येते. प्राप्त माहितीनुसार या पद्धतीची बॉडी तयार कारण्यासाठी बॉबी देओलने चार महिने गोड पदार्थांचे सेवन टाळले होते. तसेच स्नायूंना बळकट करण्यासाठी त्याने नियमित व्यायाम करण्यावर भर दिले होते. अशाप्रकारे गोड पदार्थ टाळून तुम्हीही वजन कमी करू शकता का हा प्रश्न बॉबी देओलच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. विशेषत: प्री-डायबिटीज व वजन ही भारतात झपाट्याने वाढणारी स्थिती असताना हा आरोग्यदायी बदल तुमच्या किती फायद्याचा ठरू शकतो हे आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोड खायचं नाही म्हणजे काय काय टाळायचं?

काही महिन्यांसाठी साखर वर्ज्य करणे म्हणजे प्रत्येक प्रकारे आपल्या आहारातून साखर काढून टाकणे असाच अर्थ होतो. फक्त मिठाईच नव्हे तर अगदी चहा- कॉफी, ज्यूस मध्ये सुद्धा तुम्हाला कोणतीही (पांढरी किंवा ब्राऊन) साखर खाता येणार नाही. हे कितीही कठीण वाटत असले तरी तुम्हाला खरोखरच वजन कमी करायचं असेल तर याची खूप मदत होऊ शकते असे, डॉ. अभिजित भोगराज सल्लागार, (एंडोक्राइनोलॉजिस्ट, डायबेटिस आणि थायरॉईड, मणिपाल हॉस्पिटल) सांगतात. डॉ. अभिजित यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, दिवसात तीन ते चार कप चहा आणि कॉफीमध्ये मिसळलेली साखर तुमच्या शरीरात ५०० – ७०० कॅलरीज वाढवू शकते. त्यात जर आपण शारीरिक हालचाल कमी करत असाल किंवा जेवणाचे भाग करून एका वेळच्या आहारावर नियंत्रण ठेवत नसाल तर या कॅलरीजचे प्रमाण वाढतच राहते.

तुम्ही पूर्णपणे साखर काढून टाकल्यावर एकाच महिन्यात साधारण २ ते ३ किलो वजन कमी होऊ शकते. एका महिन्यापेक्षा अधिक कला तुम्ही साखर सोडल्यास फक्त वजनच नाही तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग सुद्धा नियंत्रणात राहू शकतात. यामुळे आतड्यातील जळजळ कमी होऊन चांगले एन्झाइम्स वाढू शकतात. सतत पोट फुगणे, बद्धकोष्ठ किंवा अतिसार या आतड्यांसंबंधी आजारांपासून सुद्धा यामुळे सुटका मिळू शकते.

मिठाई टाळण्याचा फायदा का व कसा होतो?

मिठाईमध्ये केवळ साखरच नसते तर त्यामध्ये तूप किंवा तेलाच्या रूपात प्रचंड फॅट्स असतात. म्हणूनच अगदी कमी प्रमाणात जरी मिठाईचे सेवन केले तरी त्या कॅलरीज शरीरात पोहोचतात. इथे मुद्दा कॅलरीज सेवन करण्याचा नसून त्या बर्न न केल्या जाण्याचा आहे. काही वेळा तर लोकं दिवभरात अधिक प्रमाणात मिठाईचे सेवन करूनही हालचाल करणे टाळतात परिणामी वजन वाढतच जाते.

कॅलरीजचं गणित समजून घेऊया..

डॉ मोहन डायबेटीस स्पेशॅलिटी सेंटर, चेन्नईचे अध्यक्ष डॉ व्ही मोहन यांनी आपल्या रुग्णांच्या अभ्यासावर आधारित एक सूत्र तयार केले आहे. जर तुम्ही ८,००० कॅलरीज कमी केल्या तर तुमचे एक किलो वजन कमी होईल. तर आपण असे म्हणूया की आपण एका दिवसात सरासरी ४०० कॅलरीज कमी करता, २० दिवसांत आपण एक किलो वजन कमी करू शकता. दुसरीकडे, काही शारीरिक हालचालींसह एका दिवसात ८०० कॅलरीज कमी करा आणि तुम्ही तुमचे लक्ष्य १० दिवसात पूर्ण करू शकता. आता तुम्ही जर शारीरिक हालचाली (व्यायामाला) साखर कमी करून जोड दिली तर वजन कमी करण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होऊ शकते.

फक्त मिठाई नाही, ‘या’ गोष्टीकडे द्या लक्ष

डॉ.मोहन सांगतात की, आता तुम्ही मिठाईचे सेवन कदाचित टाळाल पण काहीवेळा कार्ब्सच्या माध्यमातून सुद्धा शरीरातील साखर वाढू शकते. उदाहरणार्थ तांदूळ- गहू हे कार्ब्स ग्लुकोज रूपात साखर वाढवणारे घटक आहेत. याची भर पोटावरील फॅट्समध्ये पडते. तुम्ही मिठाई सोडली याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे उच्च कार्ब सेवन चालू ठेवू शकता. तंदुरुस्त आणि फिट शरीर मिळविण्यासाठी, आपण संतुलित आहार घ्यावा ज्यामध्ये पुरेसे प्रथिने, फायबर आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा समावेश आहे. कॅलरी कमी करून तुम्ही चरबी कमी करू शकता परंतु तुमचे स्नायू तयार होणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला प्रथिने आणि व्यायामाची गरज आहे.

आपण नकळत व्यसन निर्माण करत आहोत का?

डॉ. भोगराज म्हणतात, भारतीय, आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात खूप मिठाई खातात, आपल्या मनाला आणि शरीराला त्यावर अवलंबून राहण्यासाठी प्रशिक्षण देतात. म्हणूनच आताही तुम्हाला वाचताना एवढे दिवस साखर खाऊन कसे चालेल असा प्रश्न पडला असू शकतो. म्हणूनच शरीराला साखरेवर अवलंबून न राहण्याचे प्रशिक्षण लहानपणापासूनच द्यायला हवे. याऐवजी आपण नैसर्गिक साखर, सुका मेवा, ताजी फळे (यात खनिजे, जीवनसत्त्वे आणि फायबर देखील असतात) आणि दालचिनी, जायफळ आणि व्हॅनिला सारख्या मसाल्यांचे सेवन करू शकता जे प्रत्यक्ष साखर न वापरता आपल्या रेसिपीमध्ये चव आणि गोडपणा वाढवू शकतात.

हे ही वाचा<< चिंपांझींचा मांसाहार, वानरांसह अनैसर्गिक संबंध, समलैंगिक संबंध.. HIV मानवी शरीरात नेमका आला कुठून?

तसेच हे ही लक्षात घ्या, फक्त मिठाई सोडून देऊन चालणार नाही शिस्तबद्ध जीवनशैलीचा अवलंब करा जी चांगली झोप आणि व्यायामासाठी पुरेसा वेळ देऊनही तुम्ही फिट शरीर मिळवू शकता.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bobby deol lost kgs in four months by removing sweets diet plan how skipping sugar may help to loose weight calorie maths svs
Show comments