‘मिस्टर तामिळनाडू’ खिताब आपल्या नावी करणारा बॉडी बिल्डर योगेशचं नुकतंच जिममध्ये हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. तामिळनाडूमधील ४१ वर्षीय फिटनेस ट्रेनर आणि बॉडी बिल्डर योगेशच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. योगेशनं गेल्या वर्षीच मिस्टर तामिळनाडूचा खिताब जिंकला होता. आता जिममध्ये होत असलेल्या एकामागून एक आकस्मिक मृत्यूंमुळे व्यायामाबाबत अनेक चिंताजनक प्रश्न निर्माण झाले आहेत.

काही वर्षांपासून योगेश कोराटूर बसस्थानकाजवळ असलेल्या एका जिममध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. रविवारी तासभर व्यायाम केल्यानंतर योगेश जिममधून बाहेर आला आणि त्याने आपल्या मित्राला सांगितले की, त्याला थकवा जाणवत आहे आणि स्टीम बाथ करून आराम करायचा आहे. अर्धा तास उलटूनही योगेश बाथरूममधून बाहेर न आल्याने मित्राने काळजीत पडून बाथरूमचे दार ठोठावले. आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला, त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. योगेश जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याला ताबडतोब जवळच्या सरकारी केएमसीएच रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या मृत्यूने पुन्हा एकदा फिटनेस आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य यांच्यातील दुव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नऊ वेळचा चॅम्पियन योगेश असा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावल्याने खळबळच उडाली. जास्त वेळ व्यायाम केल्यानंतर असं तातडीनं स्टीम बाथ घेणं आपल्या शरीरासाठी योग्य आहे का…? जास्त वेळ व्यायाम केल्यानंतर आणि त्यानंतर लगेच स्टीम बाथमुळे शरीर डिहायड्रेट होतं आणि स्पर्धेच्या २४ तासांपूर्वी शरीरसौष्ठवपटू पाणीही पित नाही. यामुळे शरीराला खरंच धोका आहे.,? नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मुंबईचे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, डॉ. राजीव भागवत आणि मणिपाल हॉस्पिटल बेंगळुरूचे सल्लागार, कार्डिओलॉजिस्ट डॉ. संदेश प्रभू यांनी इंडियन एक्स्प्रेसला व्यायाम केल्यानंतर काय करावे आणि काय करू नये, याविषयी माहिती दिली आहे. चला तर, डाॅक्टरांचा सल्ला जाणून घेऊया…

(हे ही वाचा : फॅट बर्न करण्यासाठी ‘या’ पाच स्टेप्स नक्की फॉलो करा; डाॅक्टर सांगतात, झपाट्याने होऊ शकते वजन कमी )

डॉक्टर सांगतात, अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हा धोका खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे वाढला आहे. जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येतो, जो सावरण्याची संधीही देत ​​नाही आणि लोकांचा मृत्यू होतो. आजकाल तरुणांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढलं आहे.  जिम किंवा डान्स करताना शरीरात ऑक्सिजनची मागणी वाढते, ज्याचा हृदयावर परिणाम होतो. जिममध्ये व्यायाम करताना अचानक हार्ट अटॅक आल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. 

डिहायड्रेशनमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का?

वर्कआउट करताना किंवा नंतर अनेक लोकं पाणी पिणे टाळतात. खरंतर वर्कआउट केल्यानंतर शरीराला पाण्याची जास्त गरज असते. डॉक्टरांच्या मते, शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरातील रक्त घट्ट होते आणि तुमच्या रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि याचा तुमच्या हृदयावर ताण येऊ शकतो. यामुळे हृदयाच्या धमन्या ब्लॉक होतात आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. वजन उचलण्यासारखा स्थिर व्यायाम करताना तुमचा श्वास रोखून ठेवल्याने रक्तदाब अचानक वाढू शकतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी अधिक खबरदारी घ्यावी लागते, असेही ते सांगतात. 

खूप वर्कआऊट केल्यानंतर स्टीम रूममध्ये प्रवेश करणे चांगलं वाटते, पण ते हानिकारक आहे. व्यायामानंतर लगेचच जास्त उष्णता समाविष्ट केल्याने शरीरावर आणि प्रतिकारशक्तीवर ताण येऊ शकतो. स्टीम बाथचा वापर स्वतःच्या सावधगिरीसह करता आला पाहिजे, असे मत डॉ. संदेश प्रभू मांडतात. कोणीही स्टीम रूममध्ये १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहू नये. आधीच हृदयाच्या समस्या किंवा लक्षणे असलेल्या आणि ज्यांना खूप कमी किंवा खूप उच्च रक्तदाब आहे, त्यांनी स्टीम रूम वापरणे टाळावे, असाही त्यांनी सल्ला दिला.

तरुणांमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका हा तणावाचा परिणाम असू शकतो, ज्याला ‘स्ट्रेस कार्डिओमायोपॅथी’ म्हणतात. आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक तणावाशी झुंजत असतात. झोप अपुरी होणे किंवा आजार असणे अशा शारीरिक कारणांमुळे, तर जवळच्या व्यक्ती गमावणे अशा भावनिक कारणांमुळेही ताण वाढतो. हा ताण सतत राहिला तर मात्र शरीरावर याचे परिणाम होतात. त्याचप्रमाणे तणाव वाढल्यामुळे शरीरात स्रवणाऱ्या कॅटेकोलामाइन्समुळे रक्तदाब वाढतो. यामुळे हृदयविकार होण्याचा आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. त्यामुळे शरीराला घातक अशा तणावापासून दूर ठेवले पाहिजे, असा सल्ला डाॅक्टर्स देतात.