Boiled Eggs Vs Omelettes Which Option Is Healthier : अंडी हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. काही जण उकडलेले अंडे खातात तर काही जण गरम ऑम्लेट, तर काही जण त्याच्या आणखीन काही रेसिपी बनवून खातात. कारण अंडी व्हर्सटाईल (versatile) आणि पौष्टिकतेने समृद्ध असे अन्न आहे, म्हणून जगभरातील अनेक आहारांमध्ये एक प्रमुख पदार्थ म्हणून अंडी खाल्ली जातात.

तर अंडी तयार करण्याचे अनेक लोकप्रिय मार्ग आहेत, त्यातला एक म्हणजे उकडणे आणि ऑम्लेट बनवणे (Boiled Eggs Vs Omelettes) पण, कोणता पर्याय तुमच्यासाठी आरोग्यदायी आहे? तर याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह शिक्षक कनिक्का मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली. कनिक्का मल्होत्रा यांनी पोषण प्रोफाइल, आरोग्य फायदे, फरक आणि कोणाला फायदा होऊ शकतो किंवा कोणी हे टाळण्याची गरज आहे, हे सुद्धा समजावून सांगण्यास मदत केली.

१. उकडलेली अंडी –

पौष्टिक प्रोफाइल : एक मोठे उकडलेले अंड पौष्टिक पॅकेजने समृद्ध असते. यामध्ये कॅलरी ७८, प्रथिने ६.३ ग्रॅम (उच्च दर्जाचे प्रथिने), चरबी ५.३ ग्रॅम, कर्बोदके मिनिमल, न्यूट्रिएंट्स (Nutrients) जीवनसत्त्वे बी १२, डी, ए आणि लोह आणि झिंकसारख्या खनिजांनी समृद्ध आहे. कनिक्का मल्होत्रा यांनी सांगितले की, उकडलेली अंडी कोणतीही अतिरिक्त चरबी किंवा कॅलरी न जोडता त्यांचे नैसर्गिक पोषक घटक टिकवून ठेवतात, ज्यामुळे ते कमी कॅलरीसह न्यूट्रिएंट डेन्स (nutrient-dense) पर्याय बनतात.

२. ऑम्लेट –

ऑम्लेटचे पौष्टिक मूल्य त्याच्या घटकांवर अवलंबून असते. कनिक्का मल्होत्रा यांनी नमूद केले की प्रथिने, कॅलरी सामग्रीच्या (कंटेंटच्या) बाबतीत प्लेन अंडी, ओन्ली ऑम्लेट यांची उकडलेल्या अंड्यांशी तुलना होऊ शकते. ऑम्लेटमध्ये भाज्या घातल्याने फायबर, जीवनसत्त्वे (जसे की व्हिटॅमिन सी) आणि खनिजे (उदाहरणार्थ लोह) वाढतात. पण, चीज किंवा जास्त तेलामुळे कॅलरीज आणि चरबी वाढू शकतात.

हेही वाचा…Slow Walking Vs Fast Walking : वेगात की हळू? कशाप्रकारे चालण्याने तुमच्या आरोग्याला होईल फायदा? जाणून घ्या

उकडलेली अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

कमी कॅलरी किंवा वजन व्यवस्थापन आहार असलेल्यांसाठी हा आदर्श पर्याय आहे.
पचनाशी संबंधित इतर समस्यांसाठी हा पर्याय योग्य आहे.
कमी कॅलरी किंवा वजन व्यवस्थापनासाठी फायदेशीर आहे.
उच्च प्रथिने, स्नायूंच्या दुरुस्ती आणि वाढीस समर्थन देते.
हाडांच्या आरोग्यासाठी (व्हिटॅमिन डी) आणि मेंदूच्या कार्यासाठी (व्हिटॅमिन बी १२) उकडलेली अंडी महत्त्वपूर्ण पोषक तत्त्वे प्रदान करतात.

ऑम्लेट खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

ऑम्लेटबरोबर भाज्या आणि हेल्दी फॅट्स जोडल्यास पोषक विविधता वाढवण्यासाठी मदत होते.
फायबरसमृद्ध भाज्या टाकल्यास अतिरिक्त फायदे मिळतील.
ज्यांना एकाच डिशमध्ये संतुलित जेवणाची गरज आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय अगदी योग्य आहे.

उकडलेली अंडी आणि ऑम्लेटमध्ये फरक काय आहे (Boiled Eggs Vs Omelettes)

  • तयार करण्याची पद्धत – उकडलेली अंडी चरबीशिवाय पोषक द्रव्ये टिकवून ठेवतात, तर ऑम्लेटला अनेकदा तेल किंवा बटर लागते.
  • उकडलेल्या अंड्यांमध्ये कमी कॅलरी असतात.
  • पौष्टिक विविधता : ऑम्लेटबरोबर जे घटक जोडले जातात, त्यांच्यावर पौष्टिक विविधता अवलंबून असते.

उकडलेली अंडी की ऑम्लेट काय बेस्ट आहे? (Boiled Eggs Vs Omelettes)

उकडलेली अंडी किंवा ऑम्लेट यापैकी एकही इन्हेरेंटली श्रेष्ठ (inherently superior) नाही. पण, निवड आपल्या आहारातील उद्दिष्टे आणि प्राधान्यांवर अवलंबून असते.

१. कमी कॅलरी, उच्च प्रथिने, मिनिमल प्रिपरेशन (Minimal preparation) म्हणजे तयारीला प्राधान्य आणि चरबीच्या सेवनाचे बारकाईने निरीक्षण करत आहात, तर तुम्ही उकडलेली अंडी हा पर्याय निवडू शकता.

२. भरपूर जेवण, भाज्या घालून अधिक फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे, चव आणि टेक्स्चर हवे असल्यास तुम्ही चीज ऑम्लेट हा पर्याय निवडू शकता.

उकडलेली अंडी, ऑम्लेट कोणी खाणे टाळावे (Boiled Eggs Vs Omelettes)?

ज्यांना अंड्याची ॲलर्जी आहे किंवा ज्यांना कोलेस्ट्रॉलचे काटेकोर निरीक्षण करणे आवश्यक आहे, त्यांनी उकडलेली अंडी खाणे टाळावे. तर कॅलरी किंवा चरबीचे सेवन व्यवस्थापित करणाऱ्या व्यक्तींनी चीज, प्रक्रिया केलेले मांस किंवा जास्त तेलकट ऑम्लेट खाणे टाळावे.

Story img Loader