Vicky Kaushal on Overcoming Anxiety : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. विशेषत: कामाच्या अति तणावामुळे आपले मानसिक आरोग्य खराब होत आहे. त्यासाठी मानसिक आरोग्याच्या समस्या ओळखून, त्यावर वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.
हार्पर बाजार इंडियाला (Harper’s Bazaar India) दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता विकी कौशलने एंग्झायटीबाबत त्याचा वैयक्तिक अनुभव सांगितला आहे. तो सांगतो, “एंग्झायटीसाठी सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे आपण ती स्वीकारणे. एका ज्येष्ठ अभिनेत्याने मला सांगितले होते की, एंग्झायटीला तुझा मित्र बनव. आपल्याला त्यावर मात करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी स्वीकारणे ही पहिली पायरी आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

एंग्झायटी का जाणवते?

दिल्लीच्या माइंडग्लास वेलबिंग (MindGlass Well-being) येथील मानसशास्त्रज्ञ आशुतोष तिवारी सांगतात, “एंग्झायटी ही खरं तर तणावाची एक प्रतिक्रिया असते. यादरम्यान शरीर विशिष्ट मागण्या किंवा दबावांना प्रतिक्रिया देतो. कठीण परिस्थिती, अचानक मोठा बदल किंवा मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे एंग्झायटी निर्माण होते. काही प्रकरणांमध्ये कोणतेही कारण नसताना एंग्झायटी दिसून येते. कधी कधी भीती किंवा चुकीच्या विचारांमुळेसुद्धा एंग्झायटी जाणवते.”

हेही वाचा : Coconuts Are Not Allowed On Planes : विमान प्रवासात नारळ घेऊन जाण्यावर का आहे बंदी? वाचा नियम, तोटे अन् तज्ज्ञांचे मत

खरंच एंग्झायटी प्रेरणादायक ठरू शकते?

समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ सृष्टी वत्स सांगतात, “जेव्हा वैद्यकीय उपचाराची गरज भासत नाही तेव्हा एंग्झायटी ही प्रेरणादायक ठरू शकते. परीक्षा किंवा मुलाखतीपूर्वी एंग्झायटी जाणवणे आपल्याला चांगली तयारी करण्यास प्रोत्साहन देते. मनातील भावना ओळखल्याने आपला अनुभव वाढतो आणि आपल्या विचारांमध्ये सुधारणा दिसून येते.”

एंग्झायटीचे परिणाम

तिवारी सांगतात की, एंग्झायटी तणावाप्रमाणेच हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम करते. त्यामुळे आपले हृदयाचे ठोके वाढतात, आपला चेहरा लाल होतो, शरीराचे तापमान वाढते, आपल्याला जेवण करण्याची इच्छा होत नाही, खूप घाम येऊन गोंधळाची स्थिती निर्माण होते. त्याशिवाय शरीरात सुन्नपणा जाणवतो आणि अंगावर काटा येऊ शकतो.

ते पुढे सांगतात, “एंग्झायटी ही तणावासारखी नसते. कारण- कोणतेही कारण नसतानासुद्धा एंग्झायटी उद्भवू शकते. त्यामुळे तुम्हाला नकारात्मक गोष्टींमुळे एंग्झायटी जाणवत असेल, तर त्यामुळे काहीही परिणाम होत नाही. विशेष बाब म्हणजे तुम्ही एंग्झायटी स्वीकारली, तर त्याचे अनेक फायदे आहेत.”

हेही वाचा : जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…

एंग्झायटी स्वीकारल्यामुळे तुम्हाला एकटेपणा किंवा लाज वाटत नाही. एंग्झायटी ओळखल्याने तुम्ही त्यावर कशी मात करायची हे तुमच्या लक्षात येऊ शकते. त्यामुळे संबंधित भीतीदेखील कमी होते. तेव्हा ही बाब स्वीकारणे हे निरोगी जीवनशैलीकडे टाकलेले पहिले पाऊल आहे हे लक्षात घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor vicky kaushal shared experience about how to overcome anxiety read what expert told ndj