Ashwini Kalsekar on Alcoholic: अश्विनी काळसेकर यांनी त्यांच्या बेपर्वाईसाठी मद्यपानाला दोष देणाऱ्या लोकांबद्दल तीव्र मत मांडले आहे. वाईट वर्तनासाठी नशा हे निमित्त म्हणून वापरता कामा नये आणि वैयक्तिक जबाबदारी महत्त्वाची आहे असे तिचे मत आहे.
हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत या मुद्द्यावर बोलताना अभिनेत्री म्हणाली, “आज मी त्या सर्व लोकांना काहीतरी सांगू इच्छिते जे म्हणतात की, ‘मी नशेत असल्याने माझा ताबा सुटला. मी दारू प्यायलो होतो किंवा मी ड्रग्ज घेत होतो किंवा मी काही औषधांच्या नशेत होतो आणि मी माझा ताबा गमावला.’ असं म्हणणाऱ्या मी त्या सर्व पुरुषांना सर्वात वाईट पद्धतीने मारेन, कारण तुम्ही कितीही मद्यपान केले असलात तरी तुम्ही तुमच्या आईजवळ जाऊन झोपत नाही. तुम्ही तुमच्या बायकोकडे जाता. “तू तुझ्या मुलीच्या बाजूला झोपत नाहीस, ना तुझ्या बहिणीच्या, आईच्या अंगावर पाय टाकून नाही झोपत ना?”
ती पुढे म्हणाली, “हे कारण देऊ नकाच. तुम्हारे आत शैतान है, उसको मारो (तुमच्या आत हैवान आहे, त्याला मार). मद्याचा आधार घेऊ नका. मद्याने तुमचे काहीही केलेले नाही. ते तुमच्या मनात आधीच होते; मद्याने तुमच्यातील जंगलीपणा बाहेर काढला. मराठीत याला विकृती म्हणतात – तुमच्या आत असलेली आणि नशेनंतर बाहेर पडणारी विकृती. तिने यावर भर दिला की, जे लोक असे करतात त्यांनी मानसिक आरोग्य समर्थनाचा पर्याय निवडला पाहिजे, हा एक आजार आहे,” असेही ती म्हणाली.
तिच्या विधानामुळे एक महत्त्वाचा वाद निर्माण होतो : अल्कोहोल व्यक्तींमध्ये आवेग नियंत्रण आणि निर्णय घेण्यावर कसा परिणाम करतो आणि वर्तनावरील त्याचा प्रभाव पूर्णपणे नाकारणे योग्य आहे का?
कॅडॅबम्स हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ मानसशास्त्रज्ज्ञ आणि कार्यकारी संचालक नेहा कॅडॅबम indianexpress.com ला सांगतात, “अल्कोहोल मेंदूच्या फ्रंटल लोबवर परिणाम करते हे ज्ञात आहे – हा भाग आवेग नियंत्रण आणि निर्णय घेण्यास जबाबदार आहे. जेव्हा अल्कोहोलचे सेवन केले जाते, तेव्हा ते मेंदूच्या आवेगांचे नियमन करण्याची, परिणामांचे मूल्यांकन करण्याची आणि आत्म-नियंत्रण करण्याची क्षमता कमी करते. याचा अर्थ असा की, प्रभावाखाली व्यक्ती परिणामांचा पूर्णपणे विचार न करता अचानक इच्छांवर कृती करू शकतात.
तथापि, ती पुढे म्हणते की, “अल्कोहोल प्रतिबंध कमी करते आणि निर्णय घेण्यास अडथळा आणू शकते, परंतु फक्त ते एखाद्याच्या कृतींसाठी जबाबदार नाही. व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये, शिकलेले वर्तन आणि पर्यावरणीय घटक हे सर्व महत्त्वाची भूमिका बजावतात.” अल्कोहोलचा शारीरिक परिणाम ओळखणे महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर व्यक्तींमध्ये आव्हानात्मक परिस्थितीतही त्यांच्या कृती मॅनेज करण्याची क्षमता असते हे देखील ओळखणे महत्त्वाचे आहे, म्हणून अल्कोहोलचा प्रभाव पूर्णपणे नाकारल्याने जीवशास्त्र आणि वैयक्तिक जबाबदारी यांच्यातील गुंतागुंतीचा परस्परसंवाद जास्त सुलभ होतो.
काही लोक मद्यप्राषनानंतर आक्रमक किंवा निर्भय वर्तन का दाखवतात, तर काही शांत का राहतात?
मद्यपानानंतर वर्तनातील बदल अनेक घटकांमुळे प्रभावित होतात. कॅडॅबम सांगतात की, अनुवांशिक पूर्वस्थिती, वैयक्तिक स्वभाव आणि अगदी भूतकाळातील अनुभव हे सर्व प्रभावाखाली व्यक्ती कशी प्रतिक्रिया देते यावर परिणाम करतात. काही व्यक्तींमध्ये अल्कोहोलची सहनशीलता कमी असू शकते किंवा आक्रमकतेची प्रवृत्ती असू शकते, जी त्यांचा प्रतिबंध कमी केल्यावर वाढू शकते.
“याव्यतिरिक्त, ज्या संदर्भात अल्कोहोल सेवन केले जाते – जसे की सामाजिक परिस्थिती, ताणतणाव पातळी आणि सांस्कृतिक अपेक्षा – ते वर्तणुकीच्या प्रतिक्रियांवर अधिक परिणाम करू शकतात. काहींसाठी अल्कोहोल एक उत्प्रेरक म्हणून काम करू शकते, जे अंतर्निहित गुणधर्मांना समोर आणते, तर काहींसाठी ते आक्रमक आवेगांना चालना न देता त्यांना आराम देऊ शकते. “हे वैयक्तिक फरक अधोरेखित करतात की अल्कोहोलचे परिणाम एकसारखे नसून ते व्यक्तिपरत्वे लक्षणीयरीत्या बदलतात,” असे त्या नमूद करतात.