‘बंदिश बँडिट्स’मध्ये भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रेया चौधरीने अलीकडेच तिचे ३० किलो वजन कमी करण्याचा प्रेरणादायी प्रवास शेअर करण्यासाठी एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. “मी जेव्हा १९ वर्षांचे होते तेव्हा मी खूप गोष्टींमधून जात होते. त्या काळात माझं वजन खूप वाढलं आणि त्याचा माझ्या फिटनेस व आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. मी कोणतीही शारीरिक हालचाल करणं बंद केलं आणि त्यामुळे गोष्टी आणखी वाईट झाल्या. त्या लहान वयात मला स्लिप डिस्क होणं हा माझ्यासाठी मोठा धक्का होता,” असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.

“आयुष्य नेहमीच आपल्याला आव्हानं देतं; आपल्याला फक्त पुढे जाणं आणि लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं, असं मला वाटतं. ‘टचवूड’ मी आता माझ्या सर्वोत्तम स्थितीत आहे. स्लिप डिस्क असलेली मुलगी ते आता बॉक्सिंग करणारी मुलगी यात खूप बदल झाला आहे. तसंच मी नाचू शकते, शूटिंगदरम्यान तासन् तास माझ्या दोन पायांवर उभी राहू शकते आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा सेटवर माझ्या शरीराला जितका जास्त होईल तितका स्ट्रेस देऊ शकते,” असे तिने लिहिले.

Larsen & Toubro (L&T) loses a significant Rs 70,000 crore submarine deal after CEO's controversial 90-hour workweek statement.
L&T ला धक्का, सरकारने रद्द केली ७० हजार कोटींची निविदा; कर्मचाऱ्यांनी ९० तास काम करावे म्हणाल्याने कंपनी चर्चेत
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
cardamom water benefits
वेलचीचे अशाप्रकारे सेवन केल्यास शरीरात दिसतील ‘हे’ आश्चर्यकारक बदल, तज्ज्ञांनी सांगितले जबरदस्त फायदे
Ram Kapoor followed this eating pattern to lose 55 kg
Weight Loss: ५५ किलो वजन कमी करायला अभिनेत्याने वापरला ‘हा’ फंडा; फक्त टाळा ‘या’ चुका; वाचा डॉक्टर काय सांगतात
Yoga Centre Descent Into Sex Cult Woman Told The Story
Sex Racket : १००० कुमारिकांशी शय्यासोबत करण्याची भोंदू योग गुरूची मनिषा; सेक्स रॅकेट उघड
Rajul Patel join eknath Shinde Shiv Sena
Rajul Patel : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?

स्लिप डिस्कमधून बरे होत असताना वजन कमी कसे करावे हे समजून घेण्यासाठी, indianexpress.com ने द क्लेफ्ट अ‍ॅण्ड क्रॅनिओफेशियल सेंटर आणि श्री बालाजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, चेन्नई येथील नोंदणीकृत आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी स्पष्ट केले की, स्लिप डिस्कचे व्यवस्थापन करताना वजन कमी करण्यासाठी, मणक्याचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी संतुलित दृष्टिकोन आवश्यक आहे. “अतिरिक्त वजनामुळे मणक्यावर अतिरिक्त ताण पडतो आणि त्यामुळे स्लिप डिस्कमुळे समस्या अधिक वाढतात. वजन कमी केल्याने, स्पायनल डिस्कवरील दबाव कमी होतो आणि त्यामुळे वेदना कमी होण्यास व बरे होण्यास मदत होते.

दीपलक्ष्मी यांच्या मते, पोषक घटकांनी युक्त, दाहकविरोधी आहार हा वजन व्यवस्थापन, तसेच डिस्क रिकव्हरी या दोन्हीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. “फळे, भाज्या, पातळ प्रथिने आणि सॅल्मन व अक्रोडमध्ये आढळणारे ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड यांसारखी दाहकविरोधी संयुगांनी समृद्ध असलेले अन्न जळजळ कमी करण्यास मदत करू शकते,” असं त्या म्हणाल्या.

दीपलक्ष्मी यांनी असेही सांगितले की, इतर बाबींप्रमाणेच हायड्रेशनही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण- पाणी इंटरव्हर्टेब्रल डिस्कचे आरोग्य आणि लवचिकता राखते. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त स्नॅक्स आणि अनारोग्यकारक फॅट्स टाळल्यामुळे जळजळ कमी होऊन, बिघडलेले आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

आहारतज्ज्ञांनी आहारातील समायोजनासोबत जीवनशैलीतील बदल समाविष्ट करण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. “चालणे किंवा पोहणे यांसारख्या कमी परिणामकारक क्रियाकलापांमुळे मणक्याला ताण न देता, कॅलरी बर्न करण्यास मदत होते. परंतु, कोणत्याही व्यायामाची पथ्ये सुरू करण्यापूर्वी आरोग्य सेवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे,” असं त्या म्हणाल्या.

समतोल आहार, योग्य शारीरिक हालचाली व जीवनशैलीतील बदल यांद्वारे स्लिप डिस्कमधून सुधारत असलेली व्यक्ती केवळ शाश्वत वजन कमी करू शकण्यासह त्यांची बरी होण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते.

Story img Loader